name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

एका शब्दाची जादू (The magic of a word)

एका शब्दाची जादू 
 The magic of a word

Shabdachi jadu

एका शब्दाची जादू
वेळोवेळी दिसते,
झुकून माना आभार
भावना त्या पाेहचवते...

एका शब्दाची जादू
बाेला शब्द गाेड गाेड, 
जगात नाही याला
हेच वागणं बिनताेड...

एका शब्दाची जादू
चलचित्रांना नाही सर,
नम्रतेने आदराने झुका
सर्व हाेईल बरोबर...

एका शब्दाची जादू
जग पालटून जातं,
माणुसकी,नम्रतेशिवाय
काेण काय घेऊन जातं... 

© दीपक अहिरे, नाशिक

.


एक परिचारिका (A Nurse)

एक परिचारिका
A Nurse


Ek Paricharika


एक परिचारिका
सेवा हाच धर्म,
नेटाने पुढे नेऊ
आमचे ते सत्कर्म...

एक परिचारिका
कार्यप्रवण तारा, 
रूग्णांच्या जीवनात
फुलवतात गार वारा...

एक परिचारिका
आशेचा किरण,
आपली सेवा
हेच आमचे धन...

एक परिचारिका
नसते तिची अपेक्षा, 
तरीही हाेत राहते
सदैव तिची उपेक्षा... 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

साहित्य सुट्टीवर गेले (Sahitya went on vacation)

साहित्य सुट्टीवर गेले 
Sahitya went on vacation
 

Sahitya Suttivar gele
  

साहित्य सुट्टीवर गेले
अशी परिस्थिती आता,
शब्दांनी घेतली सुट्टी
निशब्द केले कितीदा...

साहित्य सुट्टीवर गेले
आता काहीच सुचत नाही, 
भाेवतालचा घेताे अंदाज
शब्दाचं गाणं वाजत नाही...

Sahitya Suttivar gele

साहित्य सुट्टीवर गेले
काळजी हे शब्दच काेरले,
बातम्या झाले साहित्य
  सर्व साहित्य ठप्प पडले..   

साहित्य सुट्टीवर गेले
वाचकही फिरकत नाही,
लाईक,काॅमेन्टच्या भाेवती 
साहित्य शेअर हाेत नाही... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

मायेची सावली (The shadow of love)   

      मायेची सावली  
  The shadow of love

Mayechi savali

मायेची सावली
आजन्म शिरावरी,
विसरू नका तिला
कायम लक्ष पिलावरी...

मायेची सावली
जन्मभराची शिदोरी,
नक्कीच त्याला लाभते
तिच्या प्रेमाची दाेरी...

मायेची सावली
ज्याला ती मिळाली,
भाग्यशाली ताे जीव
असताे ताे शक्तिशाली...  


मायेची सावली  
ज्याने ती नाकारली, 
जीवन असते व्यर्थ
साेडत नाही त्याला कली... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

काहीतरी हरवलंय (Something is missing)

काहीतरी हरवलंय... 
Something is missing

Kahitari harvalaya

काहीतरी हरवलंय
कुठेतरी दडलंय,
सल या मनाची
पुढे काय वाढलंय...

काहीतरी हरवलंय
कोपऱ्यात बसलंय, 
लक्ष नाही कुणाचं
अचानकच प्रकटलंय...

काहीतरी हरवलंय
नातं ते ताेडलंय,
खंत या ह्दयाची
जुनंच बाहेर काढलंय...

काहीतरी हरवलंय
कुणा नाही सापडलंय, 
सर्वासमक्ष त्यांनी 
आम्हाला असं ताेडलंय... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

रक्तदान (Blood Donation)


रक्तदान – जीवन वाचवणारी महान सेवा | Importance of Blood Donation

     रक्तदान ही केवळ एक वैद्यकीय गरज नाही, तर ती मानवी संवेदनांची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. कोणालाही अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती, कर्करोग उपचार, रक्ताचे आजार इत्यादी कारणांमुळे तातडीने रक्ताची गरज भासू शकते. अशावेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीचे दिलेले रक्त जीवदान ठरते. म्हणूनच रक्तदानाला “सर्वोच्च दान”, “जीवनदान” असे म्हटले जाते.


रक्तदान का गरजेचे आहे?

1. दर वर्षी लाखो लोकांना रक्ताची गरज

भारतासारख्या मोठ्या देशात दररोज हजारो रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया, थॅलेसिमिया, डेंग्यू यांसारख्या स्थितींमध्ये रक्ताशिवाय उपचार शक्य नसतात.

2. रक्ताचा पर्याय नाही

आजच्या प्रगत वैद्यकीय जगातही रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय नाही. दुसऱ्या व्यक्तीचे रक्तच रुग्णाला जीवदान देऊ शकते.

3. रक्त साठा कायम ठेवल्यास जीव वाचतात

रक्तदानामुळे रक्तबँकांमध्ये सुरक्षित साठा उपलब्ध राहतो. जेव्हा अचानक मागणी वाढते, तेव्हा हा साठा अनेकांचे प्राण वाचवतो.


रक्तदानाची प्रक्रिया – सोपी, सुरक्षित आणि विश्वासार्ह

रक्तदान करणे अत्यंत सोपे आहे.
१०–१५ मिनिटे एवढाच वेळ लागतो.
प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सर्व सुई व साधने पूर्णपणे नवीन आणि एकदाच वापरण्यात येणारी असतात, त्यामुळे संसर्गाचा धोका शून्य असतो.

रक्तदानाच्या आधी

  • हलका आहार घ्यावा

  • पुरेसे पाणी प्यावे

  • तब्येत ठणठणीत असावी

रक्तदानानंतर

  • थोडा वेळ विश्रांती घ्यावी

  • द्रव्यपदार्थ (ज्यूस, पाणी) घ्यावेत

  • दिवसभर जड व्यायाम टाळावा


रक्तदान कोण करू शकतो?

साधारणपणे

  • वय 18 ते 60 वर्षे

  • वजन किमान 50 किलो

  • तब्येत चांगली
    असलेली कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते.

विशेष वैद्यकीय अटी मात्र तपासल्या जातात, जसे—हिमोग्लोबिन पातळी, रक्तदाब, ताप, संसर्ग इत्यादी.


रक्तदानाचे फायदे – केवळ दुसऱ्यालाच नाही तर स्वतःलाही

1. आरोग्य तपासणी मोफत होते

रक्तदानापूर्वी तुमची तपासणी केली जाते—हीमो ग्लोबिन, रक्तदाब, वजन, ताप इत्यादी.

2. नवीन रक्त निर्मिती वेगाने होते

रक्तदानानंतर शरीरात नवीन रक्तकणांची निर्मिती जलद होते, जे आरोग्यास फायदेशीर असते.

3. मानसिक समाधान मिळते

एखाद्या माणसाचा जीव तुमच्या छोट्याशा कृतीमुळे वाचला—हे समाधान अनमोल आहे.


रक्तदानाबद्दलचे काही सामान्य गैरसमज

“रक्त कमी पडेल किंवा कमजोरी येईल”

✔ रक्तदानानंतर काही तासांतच शरीरात रक्ताचे प्रमाण भरून येते.

“वारंवार रक्तदान केले तर शरीराला त्रास होतो”

✔ पुरुष दर 3 महिन्यांनी आणि महिला दर 4 महिन्यांनी सुरक्षितपणे रक्तदान करू शकतात.

“आजारी पडण्याचा धोका असतो”

✔ प्रक्रिया पूर्णपणे निर्जंतुक आणि सुरक्षित असते.


रक्ताचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व

मानवी रक्ताचे 8 प्रमुख गट आहेत—
A+, A-, B+, B-, AB+, AB-, O+, O-
यातील O- (युनिव्हर्सल डोनर) आणि AB+ (युनिव्हर्सल रिसिपियंट) गट विशेष महत्त्वाचे मानले जातात.


सामाजिक उत्तरदायित्व – रक्तदान हा आपल्या देशासाठी योगदान

प्रत्येक युवक आणि नागरिकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान केले, तर देशात रक्तटंचाईसारखे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.

कारण—
एक रक्तदाते 3 लोकांचे जीव वाचवू शकतो!


विश्व रक्तदाता दिन – रक्तदानाचे महत्त्व जनतेपर्यंत

दरवर्षी १४ जून रोजी “विश्व रक्तदाता दिन” साजरा केला जातो.
उद्दिष्ट – रक्तदात्यांच्या योगदानाचा गौरव आणि रक्तदानाबद्दल जनजागृती.


समारोप : रक्तदान करा – जीवन वाचवा, समाज वाचवा

रक्तदान ही खरी समाजसेवा आहे.
ती निस्वार्थ, मानवतेने परिपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाची आहे.

आजचा तुमचा निर्णय
👉 कोणाच्यातरी आयुष्यात “उद्या” देऊ शकतो.
👉 कोणत्यातरी कुटुंबाचे जगणे बदलू शकतो.
👉 एखाद्या रुग्णासाठी शेवटची आशा ठरू शकतो.

रक्तदान करा… कारण तुमच्या 15 मिनिटांत एखाद्याचे संपूर्ण जीवन बदलू शकते!

रक्तदान 
Blood Donation 


Raktadan


रक्तदान हे एक 
महान दान,
रक्तदात्याला मिळताे
     जगात श्रेष्ठ मान...        

रक्तदान करायला 
असावा निराेगी रक्तदाता, 
रक्त देवून वाचवा जीवन
हाेतात तुम्ही त्यावेळी त्राता... 

Raktadan

रक्तदान करा
शिबीरात स्वेच्छेने,
त्रास व इजा हाेत नाही
रक्तदान केल्याने... 
  
Raktadan
       
भारतात हाेते केवळ
सहा टक्के रक्तदान, 
रक्त न मिळाल्यामुळे
वाढतात मृत्यूचे प्रमाण..

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


मदतीचे हात....(Helping hands)

मदतीचे हात
Helping hands

Madtiche haat


मदतीचे हात कुठून कुठून मिळतात, 
रूग्ण व नातेवाईकांना माेफत डबे, 
अनेक व्यक्ती व संस्था पाेहाेच करतात... 
मदतीचा हात रतनजी टाटांनी देवू केला
दाेन हजार काेटींची अनलिमिटेड मदत करून, 
जनतेचे मनाेबल व आत्मविश्वास वाढवला...
मदतीचा हात अनेक जनसामान्यांनी दिला
ऑक्सीजन सिंलेडर त्वरीत मिळावे म्हणून, 
एकाने पंचवीस लाखाच्या गाडीचा विक्रय केला.... 
मदतीचा हात अनेक स्वयंसेवी संस्थानी  दिला
बेड, रेमडीसिव्हर,औषधे, मास्क, सॅनिटाइजर देवून, 
अनेकांनी जीवाची बाजी लावून मदतीचा हात दिला...

© दीपक अहिरे, 
नाशिक

;


अंदाज पायवाटांचा...(Estimated trails)

अंदाज पायवाटांचा
 Estimated trails

Payvat

अंदाज पायवाटांचा
जीवनी घ्यायचा असताे,
पायवाटाच गवसून
मुख्य रस्ता तयार हाेताे...

अंदाज पायवाटांचा
अनेकांनी आयुष्यात घेतला, 
खऱ्या अर्थाने आयुष्य समृद्ध
जेव्हा पायवाटा मळवल्या...

अंदाज पायवाटांचा
चाेखाळावा लागताे,
अंदाज खरे ठरतात
आपण प्रवाहीत हाेताे...

अंदाज पायवाटांचा
सूत्र आयुष्याचे बनवले, 
छोट्या छोट्या पायवाटातून
आयुष्य मला समजले...

© दीपक अहिरे, 
नाशिक

अंधार साेबतीला घेऊन (With darkness as a companion)

अंधार सोबतीला घेऊन...
With darkness as a companion

Andhar sobtila gheun


अंधार सोबतीला घेऊन 
करावी जगण्याची वाटचाल, 
तेव्हा कुठे आपण मार्ग शोधू
बदलेल हा जीवनाचा काळ...

अंधार सोबतीला घेऊन 
जगण्याचा मार्ग आपण शोधावा, 
तेव्हा कुठे सापडेल आपल्याला 
मार्गदर्शक चमकणारा काजवा... 

अंधार सोबतीला घेऊन 
येथपर्यंत मजल मारली, 
अजून गाठायचं आहे ध्येय 
आसमान आहे सात मजली... 

अंधार सोबतीला घेऊन 
जमिनीत माझे बीज अंकुरले, 
आता घट्ट गाडतोय मुळे
रोपट्याचा जणू वृक्ष जाहले... 

@ दीपक अहिरे, 
नाशिक


पुन्हा कशी सुरूवात करू...(How to start again)

पुन्हा कशी सुरूवात करू...
How to start again

Suruvat


पुन्हा कशी सुरूवात करू 
असा प्रश्न घाेंघावताेय,
एवढंच हाेतं का आयुष्य
पुन्हा हेच उत्तर सापडतंय...

पुन्हा कशी सुरूवात करू 
अचानक असे प्रश्न दाटले,
ज्या प्रश्नांचे उत्तर काेणी
मनातल्या मनातच दिले... 


पुन्हा कशी सुरूवात करू
जायचं बदलाला सामाेरे,
माझ्यापुढे अनेक प्रश्न
कशी काढू त्याची उत्तरे...

पुन्हा कशी सुरूवात करू
तुम्ही दाखवली होती वाट,
त्या वाटेवरूनच चालून
सुटेल अडचणीची गाठ...

© दीपक अहिरे, 
नाशिक


एक गोष्ट अनेक पात्र.... (One thing deserves many)

एक गोष्ट अनेक पात्र...
One thing deserves many


Ek goshta anek Patra

एक गोष्ट अनेक पात्र, 
एक पात्र हलवतात कळसुत्र, 
अनेक पात्र असतात निमित्तमात्र, 
अशा पात्रांचे असते एक विशिष्ट गाेत्र, 
त्या अनेकविध पात्रांचे भरवावे एक सत्र.... 

एक गोष्ट अनेक पात्र, 
अनेक पात्रांचे वाजवावे स्तोत्र, 
कधी कधी हाेतात शिथिल गात्र,
एखादी गोष्ट ठरते निमित्ताला मात्र, 
या अनेकविध पात्रांच्या गोष्टींचे लिहावे पत्र.... 

@ दीपक अहिरे, नाशिक

© 

अवकाळी पाऊस...(Unseasonal rain)

अवकाळी पाऊस
Unseasonal rain

Avkali paus

अवकाळी पाऊस
संकटात घालताे भर,
शेतकरी राजा हतबल
कसा आता धीर धर...

अवकाळी पाऊस
साेबत येते गारपीट, 
क्षणार्धात करताे नव्हते
आलाय त्याचा नुसता वीट..

अवकाळी पाऊस
शेतात आहे कांदा,
पाऊस पडला आता
झालाय त्याचा वांदा...

अवकाळी पाऊस 
नासाडी खूप करताे, 
बरसताे ताे खूप
काेणी त्याचा हात धरताे... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

अस्तित्वाची लढाई...(A battle for survival)

अस्तित्वाची लढाई
A battle for survival


Astivatichi ladhai

अस्तित्वाची लढाई
लढताेय प्रत्येकजण,
जीवन आणि श्वास
हेच आजचे  धन...

अस्तित्वाची लढाई
प्रत्येकाला लढावी लागेल
करावा संकटाचा पाडाव
अस्तित्व टिकवावं लागेल... 

अस्तित्वाची लढाई
पुढ्यात येऊन ठेपली,
जाणीव जागृतीने
तुम्हां आम्हां कळाली

अस्तित्वाची लढाई
बनला जगण्याचा श्वास,
अस्तित्व टिकवणं
हाच राहिला ध्यास...

© दीपक अहिरे, 
नाशिक


विस्तव वास्तवातलं...( In real life fire)

 विस्तव वास्तवातलं...
In real life fire

Vistav vastavatlan

विस्तव वास्तवातलं
दाखवतं आक्राळ रूप,
जवळचीच माणसं
अनंतात गेली खूप...

विस्तव वास्तवातलं
वाईट घटना ऐकू येतात, 
काळजी घ्या,सुरक्षित राहा
यावर त्या पाणी फेरतात...

विस्तव वास्तवातलं
ह्रदयाचा जळता निखारा,
कसा लागेल आता
जीवनी शांत वारा...

विस्तव वास्तवातलं
कसं आम्ही स्विकारू, 
काहीही झालं तरी
वास्तवाला कसं नाकारू...

© दीपक अहिरे, 
नाशिक

मी रुग्णवाहिका...( I Ambulance)

मी रुग्णवाहिका 
I Ambulance

Mi rugnavahika

मी रुग्णवाहिका
काळजी असते रूग्णांची,
अपेक्षित रूग्णालयात
घाई करते पाेहचवण्याची...

मी रुग्णवाहिका
चाेवीस तास सदा सेवेसाठी, 
मी ओळखली जाते
नियाेजनात्मक तत्परतेसाठी... 
Mi rugnavahika

मी रुग्णवाहिका
सायरन हीच ओळख माझी, 
मला पाहताच द्या वाट
काळजी वाहते मी सर्वांची... 

मी रुग्णवाहिका
जीवदान देणं माझं काम, 
वापरा माझं माध्यम
अखंड सेवेसाठीच माझं नाम... 

© दीपक अहिरे, 
नाशिक
Mi rugnavahika

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2: Milk Processing Unit Scheme, Eligibility, Benefits & Application Process

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi ...