नागपंचमी
Nagpanchami
श्रावण महिन्यात येतो
नागपंचमीचा सण,
करावे आजच्या घडीला
नागाचे संवर्धन...
शंकर देवाच्या गळ्यातील
नागाला हाराचं स्थान,
भगवान विष्णूची शय्या
म्हणून नागाला आहे मान...
कंस राजाने श्रीकृष्ण वधासाठी
पाठवले कालिया नागाला,
श्रीकृष्णाने केला पराभव
विजय साजरा होतो नागपंचमीला...
शेतातील उंदीर,घुशी खाऊन
नाग नुकसानीपासून वाचवतो,
शेतकऱ्याचा मित्र म्हणून
आजही नागाला पुजतो...
नागपंचमीच्या दिवशी
नागाला दूध पाजतात,
पण ही आहे चुकीची प्रथा
त्यामुळे नागाचे मृत्यु होतात... .
नागपंचमीच्या दिवशी नागांची
सुरक्षा करण्याचा संकल्प करा
नागपंचमीचं पर्व
आनंदाने करा साजरा
© दीपक केदू अहिरे, नाशिक