वकृत्व
Speaking
अनेकांनी घडवलं नेतृत्व,
प्रभावी बोलणं हेच सामर्थ्य,
सिद्ध केले हे कर्तृत्व...
बोलून विचार करण्यापेक्षा
विचार करून बोलणं महत्वाचे,
बोलतांना नये चुकू, चुकीचं बोलू नये,
हे नियम यशस्वीतेचे...
वकृत्वासाठी वाचावे अफाट
निरिक्षणातून शब्दसंग्रह वाढवावा,
स्वतंत्र विचारशैलीने,भाषासौंदर्याने
वकृत्वाचा अनुभव घ्यावा...
लोकरुची,प्रसंगाचे भान जो राखतो
तोच प्रभावी बोलू शकतो,
सातत्याने उत्तम बोलत राहणे,
© दीपक केदू अहिरे, नाशिक