name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): समाजसुधारक
समाजसुधारक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाजसुधारक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

थोर संत गाडगेबाबा पुण्यतिथी २० डिसेंबर | स्वच्छता, समाजसेवा आणि समतेचे प्रतीक | Sant Gadge Baba Punyatithi 20 December

थोर संत गाडगेबाबा पुण्यतिथी २० डिसेंबर | 
Sant Gadge Baba Punyatithi 20 December

thor sant gadgebaba

    स्वच्छता म्हणजेच खरी ईश्वरसेवा” — हा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी दरवर्षी २० डिसेंबर रोजी श्रद्धेने साजरी केली जाते.

    संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत, समाजसुधारक आणि संतपरंपरेतील दीपस्तंभ होते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, समानता, शिक्षण आणि समाजसेवा यासाठी कार्य केले. हातात झाडू, डोक्यावर फडकं आणि मुखात नामस्मरण — अशी त्यांची ओळख होती.

    त्यांनी कधीच मंदिर, मठ किंवा धनसंपत्ती गोळा केली नाही. उलट, गावोगावी फिरून लोकांना स्वच्छतेचे महत्व, मद्यपान व वाईट सवयींपासून दूर राहण्याचा संदेश दिला. समाजातील गरीब, उपेक्षित आणि शोषित घटकांसाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले.

    आजच्या काळात स्वच्छ भारत अभियान, सामाजिक समता आणि लोकजागृती या संकल्पनांचे मूळ संत गाडगेबाबांच्या विचारांत दिसते. त्यांची पुण्यतिथी ही केवळ स्मरणदिन नसून, त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.

    या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनी —

  • स्वच्छतेची शपथ घ्यावी

  • अंधश्रद्धांना नकार द्यावा

  • समाजसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा

  • समानता व माणुसकी जपावी

🙏 थोर संत गाडगेबाबांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

संत गाडगेबाबा 
Sant GadgeBaba

संत गाडगेबाबा 
अनोखे कर्ते संत, 
निष्काम कर्मयोगी
समाज केला दुःखमुक्त... 

फुटलेल्या गाडग्याचे खापर 
म्हणून ओळख गाडगेबाबा,  
अडचणी, समस्यांशी झुंज
समाजकार्याचा घेतला वसा...

गाडगेबाबांचे मूळ नाव
डेबूजी झिंगराजी जानोरकर, 
त्यांनी दिला समाजाला
वास्तव व विज्ञानवादी विचार...

गाडगेबाबांचे आवडते भजन
गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपाला,
साध्या सोप्या उपदेशातून
जागे केले त्यांनी समाजाला... 

गाडगेबाबांनी कीर्तनातून 
अनेक भूमिका वठवल्या, 
स्वच्छतेकडून समृद्धीकडे
कल्पना डोक्यात मुरवल्या...

संत गाडगेबाबा होते
चालते- बोलते विद्यापीठ,
माणसांच्या भल्यासाठी
त्यांनी गाजवले व्यासपीठ... 

समाजाच्या मनावर
त्यांनी छाप सोडली,
पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
निमित्ताने माझी काव्यांजली...

Thor Sant GadgeBaba

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************

Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...