name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Agricultural Prices Commission
Agricultural Prices Commission लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Agricultural Prices Commission लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी दीपक पगार यांची निवड (Deepak Pagar elected as member of Agricultural Prices Commission)

कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी दीपक पगार यांची निवड 
Deepak Pagar elected as member of Agricultural Prices Commission

Krushi mulya aayogachya sadasyapad deepak pagar yanchi nivadi

  रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख उत्राणे गावचे भूमिपुत्र दीपक पगार यांची राज्य सरकारने नुकतीच राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल नामपूर बाजार समिती संचालकांच्या वतीने त्यांचा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 
  
  दीपक पगार हे महाविद्यालयीन जीवनापासून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने झटत आहेत. आजपर्यंत त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत असंख्य आंदोलने केली आहेत. शरद जोशी, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी आजपर्यंत शेतकरी संघटनेत काम केले आहे. 
     
    त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पणनमंत्री जयकुमार रावल, सदाभाऊ खोत यांनी त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळवून दिली आहे. आगामी काळात या पदाच्या माध्यमातून भुसार कडधान्य, कापूस तसेच कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सत्कारप्रसंगी नामपूर बाजार समिती संचालक विलास सावंत, सयाजी देवरे, के. पी. कापडणीस, गुलाब भामरे उपस्थित होते. शेतकरी वर्गातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...