विस्तव वास्तवातलं...
In real life fire
विस्तव वास्तवातलं
दाखवतं आक्राळ रूप,
जवळचीच माणसं
अनंतात गेली खूप...
विस्तव वास्तवातलं
वाईट घटना ऐकू येतात,
काळजी घ्या,सुरक्षित राहा
यावर त्या पाणी फेरतात...
विस्तव वास्तवातलं
ह्रदयाचा जळता निखारा,
कसा लागेल आता
जीवनी शांत वारा...
विस्तव वास्तवातलं
कसं आम्ही स्विकारू,
काहीही झालं तरी
वास्तवाला कसं नाकारू...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment