पुन्हा कशी सुरूवात करू...
How to start again
पुन्हा कशी सुरूवात करू
असा प्रश्न घाेंघावताेय,
एवढंच हाेतं का आयुष्य
पुन्हा हेच उत्तर सापडतंय...
पुन्हा कशी सुरूवात करू
अचानक असे प्रश्न दाटले,
ज्या प्रश्नांचे उत्तर काेणी
मनातल्या मनातच दिले...
पुन्हा कशी सुरूवात करू
जायचं बदलाला सामाेरे,
माझ्यापुढे अनेक प्रश्न
कशी काढू त्याची उत्तरे...
पुन्हा कशी सुरूवात करू
तुम्ही दाखवली होती वाट,
त्या वाटेवरूनच चालून
सुटेल अडचणीची गाठ...

No comments:
Post a Comment