name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): पालवी
पालवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पालवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हिरवंगार झाडांसारखं (Like green trees)

हिरवंगार झाडांसारखं...
Like green trees

Like green trees

हिरवंगार झाडांसारखं 
असावं आपलं जीवन, 
पालापाचोळयासारखं का 
भरकटावे आपलं मन... 

हिरवंगार झाडांसारखं 
सदा राहावं टवटवीत, 
दुःखाची गाणी बदलून 
सुखाची गाणी गावीत... 

हिरवंगार झाडांसारखं 
असावा आपला बहर, 
करावी आनंदाची लूट 
शाश्वत सुखाचा कहर... 

हिरवंगार झाडांसारखं 
असावं संसारी अलिप्त, 
फुटावी सुखाची पालवी 
दुःख,वेदना व्हाव्या लुप्त... 

© दीपक अहिरे, नाशिक



करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...