name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Sheti Margadarshan
Sheti Margadarshan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sheti Margadarshan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माती परीक्षण : शेतीतील अचूक निर्णयांसाठी वैज्ञानिक मार्गदर्शन I Soil Testing for Accurate Farming Decisions

 

माती परीक्षण
 Soil Testing

Mati parikshan

      आपल्याला ताप आला. अंग दुखतंय की आपण डॉक्टरकडे जातो ना ? कारण आपल्याला ठाऊक असतं आजाराचं बरोबर निदान झालं तरच योग्य औषध मिळतं. तसंच आपल्या शेतीचंही आहे. पण येथे डॉक्टर कोण तर ती आहे मातीपरीक्षण... 

    माती परीक्षण म्हणजे शेतातील मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे, ज्यातून मातीतील पोषकद्रव्यांची पातळी (नत्र, स्फुरद, पालाश – NPKसूक्ष्म अन्नद्रव्ये (गंधक, जस्त, लोह, मॅंगनीज, बोरोन इ.), pH (अम्लता/क्षारता), सेंद्रिय कर्बाचे प्रमाण,मातीची प्रकारवार ओळख याची अचूक माहिती मिळते.



माती परीक्षण का करावे?

  माती परीक्षण केल्याने खताचा योग्य वापर  होतो. अंदाजाऐवजी अचूक गरजेनुसार खत टाकल्याने खर्च कमी होतो. पिकांची उत्पादन वाढ होते. योग्य पोषणामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि रोग-कीड कमी लागते. मातीचे आरोग्य टिकते. म्हणजे  जास्त खतांचा वापर टाळून जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवता येते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळते. कमी रासायनिक आणि अधिक सेंद्रिय द्रव्य वापर करता येतो. पर्यावरण संरक्षण होत असून खतांचे जास्त प्रमाण भूजलात जाणे थांबते.

माती परीक्षण कधी कराल. 

  प्रत्येक २-३ वर्षांनी मातीची तपासणी करणे योग्य असते. पिक लावण्यापूर्वी, विशेषत: खरीप किंवा रब्बी हंगाम सुरू होण्याआधी माती परीक्षण करावे. नवे शेत खरेदी केल्यावर किंवा जमिनीचा वापर बदलल्यानंतर माती परीक्षण करावे.

Mati parikshan

मातीचे नमुने कसे घ्याल

    शेत २-३ एकसारख्या भागात विभागा. ०-१५ से.मी. खोलीपर्यंत मातीचा नमुना घ्या (पेरणीसाठी) आणि बागायतीसाठी ३० से.मी. पर्यंत मातीचा नमुना घ्यावा. झाडांच्या मुळाजवळून नमुना घेऊ नका तर अंतरावरून घ्यावा. वेगवेगळ्या ठिकाणचे नमुने एकत्र करून मिश्रित नमुना तयार करावा. मातीचा नमुना स्वच्छ पॉलिथिन पिशवीत भरून त्यावर  नाव, गाव, गट नंबर, पिकाचा प्रकार लिहून प्रयोगशाळेत पाठवावा. 

माती परीक्षण अहवालात काय मिळते?

माती परीक्षण अहवालात पुढील माहिती दिली जाते. त्यात मातीतील एन.पी.के.प्रमाण कमी, मध्यम, किंवा जास्त असू शकते. मातीचे पी.एच.मूल्य जे आम्लयुक्त, क्षारयुक्त की तटस्थ राहू शकते. सेंद्रिय कार्बन टक्केवारी कळते. सूक्ष्म पोषकद्रव्यांची पातळी कळत असून पिकासाठी शिफारस केलेला खतांचा डोस कळतो. 

माती परीक्षणाचे फायदे 

  माती परीक्षणामुळे अनेक फायदे होत असून खतांचा खर्च २५ ते ३०% कमी होतो. उत्पन्न २०-२५% जास्त मिळते. माती परीक्षणामुळे माती व पाण्याचे संवर्धन होते. पिकांसाठी शास्त्रीय नियोजन शक्य होते.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 


Mati parikshan


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

संकरित बियाण्यांचे वाण—कृषी क्षेत्राला देईल नवी जान! Hybrid Seed Varieties Will Boost Indian Agriculture

संकरित बियाण्यांचे वाण—कृषी क्षेत्राला देईल नवी जान!
Hybrid Seed Varieties Will Boost Indian Agriculture

Sankrit biyananche wan

    भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात अन्नधान्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक बियाण्यांनी ही गरज पूर्ण करणे कठीण होत चालले आहे. अशा वेळी संकरित (Hybrid) आणि सुधारित बियाण्यांचा वापर ही काळाची गरज बनली आहे. योग्य तंत्रज्ञान आणि दर्जेदार बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनवाढ, गुणवत्तावाढ आणि रोजगारनिर्मिती तीनही घडू शकतात.

    हा ब्लॉग तुम्हाला संकरित बियाण्यांचे प्रकार, उत्पादन प्रक्रिया, मानके, प्रक्षेत्र तपासणी आणि बीज प्रक्रिया या सर्वांचा पूर्ण मार्गदर्शक देतो.


संकरित बियाण्यांचे महत्त्व

    बियाणे हे उत्पादनवाढीचे पहिले पाऊल आहे. चांगल्या दर्जाचे, स्वच्छ, रोगमुक्त आणि निरोगी बियाणे वापरल्यास शेतातील उत्पादनात आश्चर्यकारक वाढ दिसून येते.
    उच्च उगवणशक्ती, अनुवंशिक व भौतिक शुद्धता आणि रोगप्रतिबंधक क्षमता असलेले बियाणे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे भांडवल आहे.

  विविध कृषी विद्यापीठांतून अनेक उच्च-उत्पादनक्षम वाण विकसित झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांपर्यंत या वाणांचे गुणधर्म टिकवून बीजगुणन होणे अत्यंत आवश्यक आहे.


बीजोत्पादनाचे महत्त्व

Sankrit biyananche wan

    शेतीत नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित बीजांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे हेच शेतीव्यवसायाचे उद्दिष्ट आहे.
    प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या सोपे असल्याने अनेक शेतकरी आता यामध्ये सहभागी होत आहेत.

    महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम आणि इतर कंपन्या बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांची निवड करून करारनामा करतात. यामुळे बियाण्यांना निश्चित बाजारपेठ मिळते.


बीजोत्पादनाचे प्रमुख टप्पे

१) केंद्रक बियाणे (Nucleus Seed)

    नवीन वाण तयार झाल्यावर पैदासकाराकडे असलेले बियाणे केंद्रक म्हणून ओळखले जाते.
याची शुद्धता आणि गुणवैशिष्ट्ये तपासूनच प्रमाणित केंद्रक बियाणे घोषित केले जाते.

२) मूलभूत बियाणे (Breeder Seed)

    केंद्रक बियाण्यापासून बीजगुणन केलेले बियाणे म्हणजे मूलभूत किंवा Breeder Seed.
यासाठी ५००–१००० झाडे योग्य गुणधर्मांनुसार निवडून त्यांचे स्वतंत्र बीजगुणन केले जाते.

३) पायाभूत बियाणे (Foundation Seed)

    कृषी विद्यापीठे व शासकीय संस्थांमार्फत याचे उत्पादन केले जाते.
बीज प्रमाणीकरण अधिकारी २–३ वेळा प्रक्षेत्र तपासणी करून शुद्धतेची खात्री करतात.

४) प्रमाणित/सत्यप्रत बियाणे (Certified Seed)

    शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वापरासाठी दिले जाणारे बियाणे.
यासाठी पायाभूत बियाणे वापरून बीजोत्पादन केले जाते.


बीजोत्पादनासाठी आवश्यक गोष्टी

Sankrit biyananche wan

जमिनीची निवड

  • पूर्वी त्याच पिकाचे उत्पादन झाले नसावे

  • समतल, मध्यम खोल, चांगला निचरा असलेली जमीन

  • तणरहित आणि स्वच्छ क्षेत्र निवडावे

विलगीकरण अंतर

    बियाण्यांची अनुवंशिक शुद्धता टिकवण्यासाठी वाणानुसार योग्य परागीकरण अंतर आवश्यक असते.

पेरणीची पद्धत

    संकरित पिकांमध्ये नर व मादी वाणांसाठी योग्य ओळीचे प्रमाण ठेवावे.
उदा.:

  • ज्वारी: 2:4 किंवा 1:2

  • बाजरी: 2:4

  • मका: 2:5

पेरणी करताना पिशवीचे लेबल जतन करणे आवश्यक आहे.


प्रक्षेत्र तपासणी (Field Inspection)

    बीज प्रमाणीकरण अधिकारी पिकांच्या विविध अवस्थांमध्ये २ ते ४ वेळा तपासणी करतात.
भेसळयुक्त झाडे काढणे, रोगट झाडांची ओळख आणि योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाते.


बीज प्रक्रिया (Seed Processing)

    उत्पादन केलेले बियाणे पुढील प्रक्रिया केंद्रांवर तपासले जाते:

  1. बियाण्याचे चाळण व स्वच्छता

  2. कीड आणि रोगप्रतिबंधक औषध उपचार

  3. निश्चित वजनानुसार पिशव्यामध्ये भरून सील करणे

  4. नमुने प्रयोगशाळेत पाठविणे

  5. मानकानुसार प्रमाणपत्र देणे

    बीजाची गुणवत्ता कायम ठेवल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात थेट वाढ होते.


© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

शेतीतील अचूक निर्णयांसाठी स्मार्ट मार्गदर्शक : महाविस्तार-AI | Smart Guide for Accurate Decisions in Agriculture

    शेतीतील अचूक निर्णयांसाठी स्मार्ट मार्गदर्शक!

महाविस्तार-AI | Smart Guide for Accurate Decisions in Agriculture

Shetitil achuk nirayasathi smart margdarshak: mshavistar AI

    आजच्या जलदगती डिजिटल युगात शेतीदेखील तंत्रज्ञानासोबत वेगाने बदलत आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले “महाविस्तार-AI” हे ॲप म्हणजे आधुनिक शेतीकडे घेऊन जाणारे एक स्मार्ट तंत्रज्ञान साधन आहे.
    
    केंद्र शासनाच्या राष्ट्रीय विस्तार फ्रेमवर्क (National Extension Framework) अंतर्गत तयार करण्यात आलेले हे ॲप शेतकऱ्यांना हवामान, मृदा, बाजारभाव, कीड-रोग नियंत्रण आणि शासकीय योजनांविषयी एकत्रित, विश्वासार्ह आणि रिअल टाइम माहिती उपलब्ध करून देते.


🌾 महाविस्तार-AI : शेतकऱ्यांसाठी स्मार्ट मार्गदर्शक

Shetitil achuk nirnayansathi smart margdarshakk

    या ॲपची खासियत म्हणजे यात उपलब्ध असलेला मराठी व इंग्रजी भाषेतील चॅटबोट. या चॅटबोटमुळे शेतकऱ्याला त्याच्या शेतातील परिस्थितीनुसार, स्थानिक हवामानानुसार आणि पिकांच्या गरजेनुसार अचूक व व्यक्तिगत सल्ला मिळतो.
    शेतीतील योग्य निर्णय वेळेत घेण्यासाठी हे ॲप एक विश्वासू साथीदार ठरते.


⭐ महाविस्तार-AI ॲपची महत्त्वाची वैशिष्ट्ये

✔ 1. हवामान माहिती (Weather Updates)

  • स्थानिक हवामानाचा अंदाज

  • पाऊस, तापमान, आर्द्रता याबाबत सतत माहिती

  • पेरणी, कापणी आणि फवारणीसाठी योग्य वेळ

✔ 2. मृदा आरोग्य पत्रिका (Soil Health Card)

  • जमिनीच्या सुपीकतेची तपशीलवार माहिती

  • पोषक तत्त्वांची उपलब्धता

  • शिफारस केलेली खत मात्रा

✔ 3. खत मात्रा गणक (Fertilizer Calculator)

  • पिक, क्षेत्र आणि पोषकतत्त्वांच्या आधारावर अचूक खत गणना

  • सुरक्षित फवारणी मार्गदर्शन

  • पेरणीपासून काढणीपर्यंत तंत्रज्ञान आधारित सल्ला

✔ 4. पीक सल्ला (Crop Advisory)

    तृणधान्य, कडधान्य, नगदी पिके, भाजीपाला, फळे, मसाला पिकांसाठी —

  • जमिनीची पूर्व मशागत

  • पेरणी

  • सिंचन पद्धती

  • कीड व रोग व्यवस्थापन

  • कापणी व मळणी

  • साठवणूक तंत्रज्ञान

सर्व सल्ला प्रमाणित कार्यपद्धती (Standard Practices) वर आधारित.

✔ 5. किड व रोग नियंत्रण (Pest & Disease Management)

  • पिकनिहाय रोगांची ओळख

  • उपाययोजना

  • योग्य फवारणी तंत्र

✔ 6. बाजारभाव (Market Prices)

  • जिल्हानिहाय व पिकनिहाय बाजारभाव

  • रिअल टाइम भाव अपडेट्स

  • योग्य विक्री वेळ निश्चित करण्यास मदत

✔ 7. डिजिटल शेती शाळा (Digital Farming School)

  • झूम लिंक

  • तज्ज्ञांचे व्हिडिओ

  • ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम

✔ 8. गोदाम उपलब्धता (Warehouse Availability)

  • जिल्हानिहाय गोदामांची माहिती

  • संपर्क क्रमांक

  • उपलब्धतेची स्थिती


📲 महाविस्तार-AI ॲप कसे डाउनलोड कराल?

Google Play Store वर जा →
🔍 Search करा: MAHAVISTAAR-AI
→ ॲप Install करा
→ लॉगिन केल्यानंतर वरील सर्व सुविधा पाहता येतील.


🌱 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त का?

  • अचूक निर्णय वेळेत घेता येतात

  • चुकीचे तंत्रज्ञान टाळता येते

  • पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते

  • खर्च कमी, नफा जास्त

  • प्रत्येक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध


📢 कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार-AI ॲप डाऊनलोड करून शास्त्रशुद्ध, अचूक आणि वेळेत मार्गदर्शन मिळवावे आणि डिजिटल शेतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...