name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिक्षक दिन (Teachers Day) : गुरुजनांना मानाचा मुजरा | शिक्षक दिनाचे महत्त्व, इतिहास आणि शुभेच्छा

शिक्षक दिन (Teachers Day) : गुरुजनांना मानाचा मुजरा | शिक्षक दिनाचे महत्त्व, इतिहास आणि शुभेच्छा

Shikshak din

    भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. 

    डॉ. राधाकृष्णन यांना अध्यापनाची फार आवड होती. एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर त्यांनी नम्रपणे सांगितले, “माझा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यापेक्षा तो दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला, तर मला अधिक आनंद होईल.”तेव्हापासून भारतात ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो.

   शिक्षक हा फक्त ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचा शिल्पकार असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा, नैतिक मूल्ये, शिस्त आणि समाजासाठी जबाबदारीची जाणीव करून देतात.“गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः” या संस्कृतीत गुरुंना देवासमान स्थान दिलेले आहे. 

    शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथे विशेष कार्यक्रम होतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आदर, शुभेच्छा, भेटवस्तू देतात. सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, कविता, नाटक, शिक्षकांचा गौरव समारंभ अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा कृतज्ञभाव व्यक्त होतो. सरकारतर्फे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ देऊन शिक्षकांचा सन्मान केला जातो.

  विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक हा प्रेरणेचा दीपस्तंभ असतो.शिक्षकांमुळे विद्यार्थी केवळ परीक्षेत यशस्वी होत नाही, तर जीवनातही सक्षम होतो.त्यामुळे शिक्षक दिन हा दिवस आपल्याला आपल्या आयुष्यातील गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.शिक्षक दिन म्हणजे गुरुंना वंदन करण्याचा दिवस. ज्ञान, संस्कार आणि मूल्ये यांची शिदोरी देणाऱ्या शिक्षकांविना समाज प्रगत होऊ शकत नाही.

Shikshak din

शिक्षक दिन
 Teachers day

भारतात ५ सप्टेंबर रोजी
शिक्षक दिन साजरा होतो,
शिक्षकांप्रती असते कृतज्ञता
त्यांचे योगदान आपण पाहतो...

उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 
यांचा जन्मही पाच सप्टेंबरचा,
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे
हा दिवसही त्यांचा वाढदिवसाचा...

अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक
विद्यार्थ्यांना करत असतात खंबीर,
शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्याला दिशा
शाळाबाह्य  जगात धरावा लागतो धीर...

जडणघडण करण्यात गुरूचा वाटा मोठा
जिथे शिक्षण तिथेच होतो विकास,
शिल, क्षमा आणि कलेचा संगम 
शिक्षक, गुरूत असतो हमखास... 

© दीपक केदू अहिरे, 
नाशिक

Shikshak din

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************

Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...