कौशल्य
Skill
सातत्याने एकाच क्षेत्रात कार्यरत
सारी ऊर्जा एकत्रित करा,
यामुळे कौशल्य येते कमवता
बुद्धिकौशल्य वापरून काम करा...
आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ओळखा
करावी कौशल्य आत्मसात,
आत्मसात केलेलं कुठलंही कौशल्य
वाया कधीच नाही जात...
कौशल्य तुम्हाला वाचवतं नी टिकवतं
बनवतं अधिक वेगवान,
सत्य तपासून देतं कौशल्य
कोणतंही कौशल्य नसतं लहान सहान...
कौशल्य करावी आत्मसात
अवलंबून राहण्याची नाही येत वेळ,
कौशल्य बनवतं सामर्थ्यशाली
येते अंगी काम करण्याचे बळ...
© दीपक केदू अहिरे, नाशिक