name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): दबाव
दबाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दबाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आयुष्य असं असायला पाहिजे...(This is how life should be)

आयुष्य असं असायला पाहिजे
This is how life should be


Aayusha

आनंदाने जगता आलं पाहिजे,
कुणाचा दबाव नसला पाहिजे, 
कुणाचा प्रभाव नसला पाहिजे, 
आयुष्य असं असायला पाहिजे....

खेळीमेळीचे वातावरण पाहिजे,
राजकारण तर नसायला पाहिजे,
एकमेकाविषयी आदर असला पाहिजे, 
आयुष्य असं असायला पाहिजे...

सोहाद्र स्नेहभाव जपला पाहिजे, 
सहकार्याची वीण असली पाहिजे,
माणुसकीची जाण असली पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे...

जगण्यापुरताच पैसा असायला पाहिजे, 
ध्येयाचा बाण सुटलाच पाहिजे,
जास्त हव्यास नसायला पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे...
आयुष्य असं असायला पाहिजे...

© दीपक केदू अहिरे, नाशिक 




करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...