एका शब्दाची जादू The magic of a word
एका शब्दाची जादू
वेळोवेळी दिसते,
झुकून माना आभार
भावना त्या पाेहचवते...
एका शब्दाची जादू
बाेला शब्द गाेड गाेड,
जगात नाही याला
हेच वागणं बिनताेड...
एका शब्दाची जादू
चलचित्रांना नाही सर,
नम्रतेने आदराने झुका
सर्व हाेईल बरोबर...
एका शब्दाची जादू
जग पालटून जातं,
माणुसकी,नम्रतेशिवाय
काेण काय घेऊन जातं...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment