अंदाज पायवाटांचा
अंदाज पायवाटांचा
जीवनी घ्यायचा असताे,
पायवाटाच गवसून
मुख्य रस्ता तयार हाेताे...
अंदाज पायवाटांचा
अनेकांनी आयुष्यात घेतला,
खऱ्या अर्थाने आयुष्य समृद्ध
जेव्हा पायवाटा मळवल्या...
अंदाज पायवाटांचा
चाेखाळावा लागताे,
अंदाज खरे ठरतात
आपण प्रवाहीत हाेताे...
अंदाज पायवाटांचा
सूत्र आयुष्याचे बनवले,
छोट्या छोट्या पायवाटातून
आयुष्य मला समजले...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा