साप
Snake
साप हा शत्रू नाही
तर आपला मित्र,
समाजात सापाविषयी
गैरसमजाचे सत्र
जागतिक सर्प दिन
साजरा होतो १६ जुलैला,
निसर्गसृष्टीतील त्याचे महत्व
कळावे आता मानवाला
शेतकऱ्याचा मित्र म्हणून
तीन प्रकारात नामकरण,
बिनविषारी, अर्धविषारी
विषारी असे वर्गीकरण
पर्यावरणाच्या संतूलनात
सापाची भूमिका महत्वाची,
साप दिसल्यावर नका मारू
मदत घ्या सर्पमित्राची
© दीपक केदू अहिरे, नाशिक