name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Hearing
Hearing लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Hearing लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

श्रवणशक्ती (Hearing)

श्रवणशक्ती
Hearing


Shravan shakti



    मानवी जीवनात पाच ज्ञानेंद्रियांचे विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये श्रवणशक्ती ही अत्यंत महत्त्वपूर्ण क्षमता मानली जाते. श्रवणशक्ती म्हणजे ध्वनी ऐकून त्याचा मेंदूपर्यंत संदेश पोहोचवण्याची प्रक्रिया होय. आवाजाच्या कंपनांपासून ते अर्थ समजण्यापर्यंतचा हा प्रवास अत्यंत सूक्ष्म व अद्भुत आहे.

    श्रवणशक्तीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला कानाची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. कान तीन भागांत विभागलेले असतात. बाह्य कान, मध्यकर्ण आणि अंतःकर्ण असे तीन भाग असतात. बाह्य कानातून आवाज आत प्रवेश करतो. मध्यकर्णातील सूक्ष्म हाडे आवाजाचे कंपन वाढवतात. अंतःकर्णातील ‘कॉक्लिया’ नावाच्या रचनेत हे कंपन विद्युत संदेशामध्ये बदलतात. श्रवण नस हे संदेश मेंदूपर्यंत पोहोचवते आणि मेंदू त्याचा अर्थ लावतो.

   आपल्या जीवनात श्रवणशक्तीचे खूप महत्त्व आहे. श्रवणशक्तीमुळेच आपण संवाद साधू शकतो, शिकू शकतो आणि सामाजिक जीवन जगू शकतो. भाषेचा विकास, संगीताचा आनंद, निसर्गातील गाणी, पक्ष्यांचे किलबिल, तसेच इशारे देणारे आवाज हे सर्व श्रवणशक्तीमुळेच अनुभवता येते. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही क्षमता अत्यंत आवश्यक आहे.

    श्रवणशक्ती कमी होण्याची अनेक कारणे असून वाढते वय, मोठ्या आवाजाचा सतत संपर्क, कानातील संसर्ग, जन्मजात दोष, अपघात किंवा इजा इ. कारणाने श्रवणशक्ती कमी होऊ शकते. 

   श्रवणशक्ती जपण्याचे उपायांमध्ये मोठ्या आवाजापासून कानांचे संरक्षण करणे, हेडफोन व इअरफोनचा मर्यादित वापर, कानांची स्वच्छता राखणे, लहानसहान समस्या असल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे, नियमित श्रवण तपासणी करून आपण श्रवण शक्ती जोपासू शकतो. 

   श्रवणशक्ती ही केवळ आवाज ऐकण्याची क्षमता नसून, ती आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची, सामाजिकतेची आणि जीवनाचा आनंद घेण्याची किल्ली आहे. त्यामुळे श्रवणशक्ती ही अनमोल देणगी जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Hearing


श्रवणशक्ती
Hearing


उत्तमपणे जे ऐकतात

तेच उत्तमपणे बोलतात,

नीट ऐकण्याची शक्ती 

यशाचं पीक उगवतात...


उत्तम कानसेन झाल्याशिवाय

तानसेन नाही होता येत,

श्रवणशक्तीच्या बळावर माणसं

बदलतात परिपक्वतेत...


चांगलं ऐकणं हे

मन घडवतं,

चुकीचं ऐकणं हे

सारं बिघडवतं...


मोजक बोलून पुष्कळ ऐकणं

हे सूत्र सर्वोत्तम यशाचे,

इतरांना बोलू न देता स्वतः बोलणे

हे बोलणे अहंकाराचे...

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...