name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): शिड
शिड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ते दिवस आठवतात....

ते दिवस आठवतात...    

ते दिवस आठवतात        
येते डाेळ्यातून पाणी,        
गरीबीत राहूनसुध्दा            
गायचाे श्रीमंतीची गाणी    

ते दिवस आठवतात
गळायची आमची घरं, 
शिडात कुठे घुसायचं
आडदांडपणे हे वारं

ते दिवस आठवतात          
खायला नव्हते काेरकू,        
कुपाेषित बालक आम्ही      
म्हणूनच म्हणायचे बारकू   

ते दिवस आठवतात
शेळ्या चारत हुंदडायचाे, 
घरच्या ओढीने परत
राहुटीत येऊन बसायचाे

@ दीपक अहिरे, नाशिक

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...