name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): मदतीचे हात....

मदतीचे हात....

मदतीचे हात

मदतीचे हात कुठून कुठून मिळतात, 
रूग्ण व नातेवाईकांना माेफत डबे, 
अनेक व्यक्ती व संस्था पाेहाेच करतात... 
मदतीचा हात रतनजी टाटांनी देवू केला
दाेन हजार काेटींची अनलिमिटेड मदत करून, 
जनतेचे मनाेबल व आत्मविश्वास वाढवला...
मदतीचा हात अनेक जनसामान्यांनी दिला
ऑक्सीजन सिंलेडर त्वरीत मिळावे म्हणून, 
एकाने पंचवीस लाखाच्या गाडीचा विक्रय केला.... 
मदतीचा हात अनेक स्वयंसेवी संस्थानी  दिला
बेड, रेमडीसिव्हर,औषधे, मास्क, सॅनिटाइजर देवून, 
अनेकांनी जीवाची बाजी लावून मदतीचा हात दिला..

© दीपक अहिरे, नाशिक

;


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी (Udyog swamini)

उद्योगस्वामिनी   Udyog swamini  १. सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले  sou.  Shraddha Chaitanya Dhormale     सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले यांनी दुग्ध व्...