काहीतरी हरवलंय...
Something is missing
काहीतरी हरवलंय
कुठेतरी दडलंय,
सल या मनाची
पुढे काय वाढलंय...
काहीतरी हरवलंय
कोपऱ्यात बसलंय,
लक्ष नाही कुणाचं
अचानकच प्रकटलंय...
काहीतरी हरवलंय
नातं ते ताेडलंय,
खंत या ह्दयाची
जुनंच बाहेर काढलंय...
काहीतरी हरवलंय
कुणा नाही सापडलंय,
सर्वासमक्ष त्यांनी
आम्हाला असं ताेडलंय...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment