name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): ऑगस्ट 2024

श्रीकृष्ण जन्माष्टमी : भक्ती, प्रेम आणि कर्मयोगाचा उत्सव | Shrikrishna Janmashtami

श्रीकृष्ण जन्माष्टमी : भक्ती, प्रेम आणि कर्मयोगाचा उत्सव
Shrikrushna Janmashtami 


Shrikrushna Janmashtami


   श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून हा उत्सव देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे प्रेम, करुणा, बुद्धिमत्ता, धैर्य आणि कर्मयोगाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून माणसाला जीवन जगण्याची एक नवी दिशा मिळते.

 भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा आयोजित केला जातो.

श्रीकृष्ण जन्माची कथा

   मथुरेचा राजा कंस हा अत्यंत क्रूर आणि अत्याचारी होता. त्याची बहीण देवकी हिचा विवाह वसुदेव यांच्याशी झाला. विवाहानंतर आकाशवाणी झाली की, देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून कंसाचा वध होईल.

   हे ऐकल्यानंतर कंसाने देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात कैद केले. देवकीच्या सात अपत्यांचा कंसाने वध केला. मात्र आठव्या अपत्याच्या जन्माच्या वेळी दैवी शक्तीने वसुदेवांना गोकुळात जाऊन त्या बालकाला नंद-यशोदेच्या घरी सोपवण्याची संधी मिळाली.

   वसुदेवांनी यमुना नदी पार करून बालकृष्णाला गोकुळात नेले. तेथे यशोदा आणि नंद यांच्या घरी कृष्णाचे बालपण फुलले. पुढे श्रीकृष्णांनी कंसाचा वध करून मथुरेतील जनतेला अत्याचारातून मुक्त केले.

गोकुळातील कृष्ण

   बालकृष्णाचे बालपण अत्यंत रम्य आणि प्रेमळ होते. गोकुळातील कृष्णाच्या खोड्या, गोपाळ मित्रांसोबतचे खेळ, गायींचे पालन आणि लोण्याची चोरी यांचे वर्णन भारतीय संस्कृतीत अनेक कथा, अभंग, भजने आणि लोकगीतांमधून आढळते.

 ‘माखनचोर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाच्या बाललीला आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करतात. कृष्णाच्या या बालरूपातून निरागसता, आनंद आणि प्रेमाचा संदेश मिळतो.

श्रीकृष्ण आणि भगवद्गीता

 श्रीकृष्णांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे भगवद्गीतेचा संदेश. महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुन संभ्रमात पडला असताना श्रीकृष्णांनी त्याला कर्म, धर्म, आत्मज्ञान आणि कर्तव्याची जाणीव करून दिली.

  “कर्म करीत राहा आणि फळाची चिंता करू नका” हा गीतेतील कर्मयोगाचा संदेश आजच्या जीवनातही अत्यंत महत्त्वाचा आहे.

 आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे, संकटांमध्ये खचून न जाणे आणि योग्य मार्गावर ठाम राहणे, ही श्रीकृष्णांच्या शिकवणीची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

जन्माष्टमीचा उत्सव कसा साजरा केला जातो?

  जन्माष्टमीच्या दिवशी घराघरांत श्रीकृष्णाची पूजा केली जाते. मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली जाते. बालकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून जन्मसोहळा साजरा केला जातो.

   भजन, कीर्तन, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित देखावे उभारले जातात.

  महाराष्ट्रात जन्माष्टमीसोबत दहीहंडी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडतात. हा उत्सव एकता, संघभावना, धैर्य आणि परस्पर सहकार्याचे प्रतीक मानला जातो.

दहीहंडीचा उत्साह

 श्रीकृष्ण बालपणी मित्रांसोबत दही आणि लोणी चोरत असत, अशी लोकप्रिय कथा आहे. त्यावरून दहीहंडीची परंपरा विकसित झाली.

   उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके मानवी मनोरे तयार करतात. “गोविंदा आला रे!”च्या जयघोषात परिसर दुमदुमून जातो.

   आज दहीहंडी हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूपही धारण करत आहे.

श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारे संदेश


 श्रीकृष्णांचे जीवन आपल्याला अनेक मौल्यवान शिकवणी देते.

कर्तव्याला प्राधान्य द्या : 

परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे.

संकटांना घाबरू नका : 

 संकटे ही जीवनाचा भाग आहेत. त्यांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा कृष्णचरित्रातून मिळते.

प्रेम आणि मैत्री जपा : 
कृष्ण आणि सुदामा यांची मैत्री आजही आदर्श मानली जाते.
बुद्धीचा योग्य वापर करा : प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी विवेक आणि बुद्धिमत्ता आवश्यक आहे.
कर्म करत राहा : 
 यश-अपयशाची चिंता न करता प्रामाणिक प्रयत्न करणे हीच खरी कर्मयोगाची शिकवण आहे.
आधुनिक काळातील जन्माष्टमी
  आजच्या डिजिटल युगातही श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट सोशल मीडिया, ऑनलाइन कार्यक्रम आणि डिजिटल माध्यमांमुळे कृष्णाचा संदेश अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचत आहे.

   मात्र उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी, ध्वनीप्रदूषण टाळणे, सुरक्षित दहीहंडी आणि सामाजिक बांधिलकी यांचा विचार करणेही आवश्यक आहे.

   जन्माष्टमीच्या निमित्ताने गरजू व्यक्तींना मदत करणे, अन्नदान करणे, वृक्षारोपण करणे किंवा समाजोपयोगी उपक्रम राबवणे ही श्रीकृष्णांच्या मानवतावादी विचारांना साजेशी कृती ठरू शकते.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा खरा अर्थ

  श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे केवळ एका धार्मिक उत्सवाचा दिवस नाही. हा धर्म, कर्म, प्रेम, मैत्री, बुद्धिमत्ता आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा उत्सव आहे.

    श्रीकृष्णांचा जन्म अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय होतो, हा विश्वास या उत्सवातून दृढ होतो.

  आजच्या धावपळीच्या जीवनात श्रीकृष्णांची शिकवण आपल्याला शांतपणे, बुद्धीने आणि धैर्याने जीवन जगण्याची प्रेरणा देते.

“श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

जय श्रीकृष्ण! 🙏💙

श्रीकृष्ण जन्माष्टमी

भगवान श्रीकृष्णाचा जन्म
जन्माष्टमी म्हणून ओळखतात,
यालाच गोपाळकाला,दहीकाला
दहीहंडी असेही म्हणतात...


भगवान श्रीकृष्णाचा
जन्म झाला द्वापार युगात,
जन्माष्टमीचा सण भक्तीभावाने
साजरा होतो विविध प्रांतात...


श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे
आठवे मानवी अवतार,
प्रसादामध्ये मिळतो दहीकाला
रंगतो दहीहंडीचा थरार...


बंधुभाव, एकात्मतेसाठी
जन्माष्टमी साजरी करतात,
जन्माष्टमीच्या दिवशी
लोक उपवास करतात...


© दीपक के.अहिरे

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

विचारांच्या गर्दीतून... (Crowd of thoughts)

विचारांच्या गर्दीतून...
crowd of thoughts
 


Crowd of thoughts


विचारांच्या गर्दीतून 

बाहेर कसा येताे,

विचारांच्या कुपीचे 

अत्तर मी शिंपडताे...


विचारांच्या गर्दीतून

नेमके विचार मांडताे,

विचारांचा आनंद

ओसंडून वाहताे...


विचारांच्या गर्दीतून

देत राहताे सुविचार,

अडल्या नडलेल्यांना

मिळताे त्यातून उपचार...


विचारांच्या गर्दीतून

विचारांची हाेते काेंडी,

विचारच माझे सर्वस्व

मांडताे विचार ताेंडी...


© दीपक अहिरे, नाशिक


संत तुलसीदास (sant Tulsidas)

संत तुलसीदास 
Sant Tulsidas


Goswami Tulsidas

गोस्वामी तुलसीदास 

युगप्रवर्तक महाकवी झाले,

बालपण फारच कष्टात

अनाथ म्हणून वाढले...


राम व हनुमानावर

त्यांची श्रद्धा अपार, 

रसिक आणि विनम्र वृत्तीने

मनाने कोमल, स्वभावाने उदार... 


रामचरितमानस, कृष्णगितावली 

यासारखे बारा ग्रंथ लिहिले,

तुलसीदासांचे सर्वच लिखाण

लोकप्रिय असे साहित्य झाले...


तुलसीदासांनी शिकवला 

समस्त मानवतावादी धर्म,

उच्च नीतिमूल्यांचे संस्कार 

कर्तव्य आणि मर्यादा कर्म...


© दीपक केदू अहिरे

नाशिक


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

*****************************************

मराठा महासंघाचे नाशिकमध्ये १० व ११ ऑगस्टला राष्ट्रीय अधिवेशन National Convention of Maratha Federation in Nashik on 10th and 11th August

मराठा महासंघाचे नाशिकमध्ये १० व ११ ऑगस्टला राष्ट्रीय अधिवेशन
National Convention of Maratha Federation in Nashik on 10th and 11th August

National convention

नाशिक : अखिल भारतीय मराठा महासंघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. शहरातील लंडन पॅलेस या हॉटेलमध्ये १० व ११ ऑगस्टला हे अधिवेशन होईल. 

    राज्यातील मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करणे आणि समाजघटकांचे उद्योग, सहकार, क्रीडा, शिक्षण, कृषी क्षेत्रात प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरिता हे अधिवेशन होणार आहे. तसेच मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक ठराव मंजूर केले जातील अशी माहिती मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   अधिवेशनाची माहिती देताना श्री. कोंढरे म्हणाले, की राज्यातील सर्वांत प्रगत जिल्ह्यांमध्ये नाशिक चौथ्या क्रमांकावर आहे. कृषी, पर्यटन, सहकार, क्रीडा, कला या क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचे मार्गदर्शन मराठा समाजातील युवकांना मिळेल. 

 अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सातला विविध क्षेत्रांतील २०० नामवंत व्यक्तींची गोलमेज परिषद होणार आहे. 'नाशिक आजचे, उद्याचे आणि मराठा समाज' हा या परिषदेचा विषय राहील. 

 राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हे अधिवेशन होत असल्याने राज्यातील नेत्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे. 

     अधिवेशनाची मुख्य परिषद ही रविवारी (ता. ११) राहणार असून, यात समाजातील नामवंत व्यक्ती विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. नाशिकमधील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, उद्योजक शशिकांत जाधव, अर्थतज्ज्ञ गिरीश चकोरिया आदी मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. तसेच 'शिक्षण, महिला व युवकांचे भवितव्य' या विषयावरही विचारमंथन होईल. परिषदेने मंजूर केलेले ठराव राज्य शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.

        यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, कोशाध्यक्ष प्रमोद जाधव, युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, राजेंद्र शेळके, अशोक कदम, नानासाहेब बच्छाव, स्वाती जाधव, शोभा सोनवणे, ॲड. स्वप्नाली राऊत, संजय पडोळ, दीपक पाटील, राजेंद्र जाधव, राम निकम, रोहिणी उखाणे, सुवर्णा पाटील, अनिता डेमसे, शैलजा चव्हाण, रूपाली सोनवणे, वंदना कदम आदी उपस्थित होते.

उपयुक्त पशुमित्र मोबाईल ॲप : पशुपालकांसाठी डिजिटल मार्गदर्शक | Informative Pashumitra Mobile App

उपयुक्त पशुमित्र मोबाईल ॲप : पशुपालकांसाठी डिजिटल मार्गदर्शक | Informative Pashumitra Mobile App

upyukta pashumitra mobile App

केंद्रीय मंत्री गडकरींकडून नाशिकच्या युवकाचे कौतुक


    पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन  हे पशुपालक, पशुवैद्यक, पशुसहाय्यक, पशुउद्योजकासाठी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे असून, याचा उपयोग पशुपालकांनी आपला व्यवसाय, तांत्रिक ज्ञान अद्ययावत करण्यासाठी घ्यावा असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. 

 पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन जयगुरु विमा आणि कृषीपूरक व्यवसायाचे उद्‌घाटन मंत्री गडकरी यांच्या हस्ते नुकतेच नागपूर येथे करण्यात आले. नाशिकमधील युवक व कंपनीचे संचालक हेमंत महाजन यांनी पशुमित्र मोबाइल ॲप्लिकेशनबाबत विस्तृत माहिती दिली.

 पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास अत्यंत सोपे असल्याने पशुपालक व नवीन व्यवसाय करू इच्छिणारे युवकांना सहज रीतीने वापरता येईल. यावेळी नितीन गडकरी यांनी पशुंची किंवा उत्पादनाची खरेदी-विक्री करतांना फसवणूक होणार नाही. याची दक्षता घेणेबाबत सूचित केले. तसेच पशुपालक, खरेदीदार यांनी प्रत्यक्ष खात्री करून आर्थिक व्यवहार करावेत, असा मोलाचा सल्ला दिला. 

  पशुपालक यांना लागणारी सर्व माहिती देणारे असे एकमेव ॲप असून हे ॲप व जय गुरु विमा आणि कृषीपूरक कंपनी पशुसंवर्धन विभागाची क्रांती करेल व बेरोजगार तरुणांना पशु उद्योजक तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करून यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.

   या पशुमित्र ॲप्लिकेशनमुळे  गोपालकांना चांगल्या जातीची जनावरे शोधण्यासाठी पशुंचे आठवडे बाजारात जाण्याची गरज पडणार नसून, पशुपालक यांचे गोठ्यातील जनावरांची माहिती मिळणार आहे. तसेच चारा, वैरण, मुरघास. पशुखाद्य विक्रेत्यांना सुध्दा त्याच्या जाहिरातीतून सर्वांपर्यंत पोहोचण्याची सोय होणार आहे.  

   पशुपालक यांना विविध नोंदणीकृत पशुवैद्यक, पशुमित्र, पशुंची औषधी विक्रेते, रोग निदान प्रयोगशाळा, शासकीय व खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, पशु वाहतूकदार, प्रशिक्षण संस्था, गोशाळा, स्वयंसेवी संस्था, उद्योगासाठी लागणारे साहित्य, उपकरणे विक्रेते, पशुविषयक शासकीय योजना, उत्कृष्ट डेअरी फार्म्स, शेळी, मेंढी फार्म्स, पोल्ट्री फार्म्स यांची माहिती, पशु ग्रंथालय, व्यवसाय कारण्यासाठी माहिती, पुस्तके तसेच अनुभव देवाण घेवाणमध्ये पशुवैद्यक यांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ या ॲपद्वारे मिळणार आहे.

 पशुपालक यांना अत्यंत फायदेशीर असे हे ॲप असून यामुळे बेरोजगारी कमी होईल, पशुसंवर्धनविषयक व्यवसाय वृध्दींगत होतील, असा विश्वास प्रो. एस. पी. सिंह बघेल यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येक राज्यात पशुपालक, पशुवैद्यक यांचे होणाऱ्या चर्चासत्रात याची माहिती द्यावी अशी सूचना केली. 

  यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. नरवाडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक तसेच मत्स्य विकास विभागाचे उपआयुक्त प्रदीप जगताप हजर होते. 

  संचालक हेमंत महाजन यांनी ॲपबाबत सविस्तर माहिती दिली व आभार व्यक्त केले. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...