name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): संगत
संगत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संगत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संगत (Accompaniment)

संगत
Accompaniment


Sangat


   मानवी जीवन हा केवळ व्यक्तीगत प्रवास नसून तो सतत इतरांबरोबर, समाजाबरोबर आणि निसर्गाबरोबर असलेल्या संगतीचा प्रवास आहे. "संगत" या शब्दाचा अर्थ सोबत, सहवास किंवा साथ असा होतो. इंग्रजीत त्याला Accompaniment असे म्हटले जाते. पण केवळ शाब्दिक अर्थाने मर्यादित न ठेवता, संगत हा जीवनात एक महत्त्वपूर्ण सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक घटक आहे.

संगतीचे प्रकार 

  संगतीचे प्रकार पुढीलप्रमाणे असून त्यात सामाजिक संगत असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती काही ना काही गटात राहते. मित्र, कुटुंब, शेजारी, शाळा किंवा कार्यक्षेत्र  ही सर्व सामाजिक संगतीची उदाहरणे आहेत. उदाहरणादाखल घ्यायचे म्हटले तर एक विद्यार्थी जेव्हा अभ्यासात मागे राहतो, तेव्हा योग्य मित्रांची संगत मिळाल्यास तो प्रगती करतो. उलट चुकीची संगत त्याला वाईट सवयींकडे नेऊ शकते.

   सांस्कृतिक संगत प्रकारात नृत्य, संगीत, नाटक अशा कलांमध्ये Accompaniment हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. मुख्य कलाकाराला स्वर, ताल किंवा वाद्यसंगती दिली जाते, ज्यामुळे मुख्य सादरीकरण अधिक प्रभावी होते.याचे उदाहरण म्हणजे गायकाला तबला-हार्मोनियमची संगत मिळाली तर गाण्याची लय आणि माधुर्य वाढते.

  मानसिक व भावनिक संगतीत एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य संगत महत्त्वाची असते. कठीण प्रसंगी कुटुंबीय, मित्र किंवा मार्गदर्शकाची साथ आत्मविश्वास देणारी ठरते. याचे उदाहरण म्हणजे आजारपणात जवळच्या व्यक्तीची साथ रुग्णाच्या लवकर बरे होण्यात महत्त्वाची ठरते.

संगतीचा परिणाम

  सकारात्मक संगतीचा परिणाम हा योग्य व्यक्तींची सोबत व्यक्तिमत्त्व विकासास मदत करते, मूल्ये व नैतिकता जोपासते, तसेच आत्मविकासाच्या संधी निर्माण करते.

 नकारात्मक संगतीचा परिणाम हा वाईट संगतीत व्यक्ती चुकीच्या सवयी अंगीकारते. दारू, तंबाखू, गुन्हेगारी वर्तन या सर्वांचा प्रारंभ चुकीच्या संगतीतूनच होतो.

शैक्षणिक दृष्टिकोनातून संगत

   शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य संगत देणे महत्त्वाचे आहे. शिक्षक व पालक हे मार्गदर्शक संगतीचे प्रमुख घटक आहेत. एकाच वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये peer group influence प्रबळ असतो. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना चांगल्या कृतींकडे नेणारी संगत उपलब्ध करून दिली पाहिजे.

दैनंदिन जीवनातील संगतीचे महत्त्व

  आरोग्य क्षेत्राचा विचार केल्यास  व्यायाम करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिल्यास आपणही आरोग्यदायी सवयी आत्मसात करतो.आर्थिक क्षेत्राचा विचार केल्यास यशस्वी उद्योजक किंवा सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या संगतीत राहणारा माणूस स्वतःही प्रगतीकडे वाटचाल करतो. सामाजिक क्षेत्राचा विचार केल्यास चांगल्या संगतीतून सहकार्यभाव, समाजसेवा आणि एकोप्याचे धडे शिकायला मिळतात.

  संगत ही फक्त "सोबत" नसून ती व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे. योग्य संगत म्हणजे आत्मविकासाचा मार्ग, तर चुकीची संगत म्हणजे अध:पतनाचा आरंभ. म्हणूनच संत कबीरांनी म्हटले आहे.  “संगत कीजे साधुकी, मिले सुरति हरि नाम।” यावरून स्पष्ट होते की जीवनात योग्य संगतीचा शोध घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

Sangat


संगत फार महत्वाची गोष्ट,

तुम्ही कोणाच्या सानिध्यात,

यावर भविष्य अवलंबून,

संगतीवर यशापयश जोखतात...


योग्य संगत माणसाला घडवते,

संगतीचा प्रभाव पडतो,

चुकीच्या कृतीचा प्रभाव,

अयोग्य संगतीने माणूस बिघडतो..


संगत असते सामर्थ्यवान, 

सकारात्मक माणसं सोबतीला,

सर्वोत्तम माणसाच्या सहवासाने,

झळाळी येते व्यक्तित्वाला...


तुम्ही कुणाची निवड करता,

यावर तुमचं ठरतं यश-अपयश,

चुका होऊ नये म्हणून रहा दक्ष,

याच मार्गाने मिळते सुयश...


© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

Sangat


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2026 : तीन वर्षांची मुदतवाढ, पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया / Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Scheme 2026: 3-Year Extension, Eligibility, Benefits & Application Process

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Schem...