name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): झालर
झालर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
झालर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रत्येक शब्द (Every word)

प्रत्येक शब्द...
Every word


Every word

प्रत्येक शब्द 

माझा असताे खरा, 

बाेलल्यापेक्षा 

न बाेललेलाच बरा...


प्रत्येक शब्द

सत्याची झालर त्याला,

खरा उतरताे

भिडतात शब्द मनाला...


प्रत्येक शब्द

माझा ताेलूनमापून,

ढवळताे अंतरंग

येताेय ताे हृदयातून...


प्रत्येक शब्द

बसते थेट सांगड,

शब्दाच्या या झाडाला

शब्द फळांचीच लगड...


© दीपक अहिरे, नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...