name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): शेती
शेती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पावसाच्या खंडात सोयाबीन उत्पादकांनी घाबरू नये; कृषी संशोधन केंद्राचा महत्त्वाचा सल्ला | 25 जुलैनंतर कोणते पर्यायी पीक घ्यावे? | Soybean Farmers Should Not Panic During Dry Spell: Agricultural Research Center Advisory | Alternative Crops After July 25

 


पावसाच्या खंडात सोयाबीन उत्पादकांनी घाबरू नये; कृषी संशोधन केंद्राचा महत्त्वाचा सल्ला

Soybean Farmers Should Not Panic During Dry Spell: Agricultural Research Center Advisory | Alternative Crops After July 25


Soyabean pik salla


   अमरावती जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये जून अखेरीस पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाला सध्या 12 ते 15 दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्राने शेतकऱ्यांना घाबरून न जाता योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे.

पावसाचा अल्प खंड असल्यास महागड्या फवारण्या करू नका

  तज्ज्ञांच्या मते, 3 ते 4 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास कोणत्याही प्रकारचे टॉनिक किंवा 19:19:19 खताची फवारणी करण्याची आवश्यकता नाही. अशा वेळी अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे.


जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी काय करावे?

जर जमीन वाफशावर असेल तर खालील उपाय करावेत:

  • उथळ डवरणी व कोळपणी करावी.
  • जमिनीवरील पापुद्रा फोडून तणांचे नियंत्रण करावे.
  • जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकवून ठेवावा.
  • मुळांची वाढ चांगली होण्यासाठी जमिनीची हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

संरक्षित सिंचन उपलब्ध असल्यास

   जर शेतात संरक्षित सिंचनाची सुविधा असेल आणि रोपे दुपारी कोमेजू लागली असतील, तर:

  • हलक्या प्रमाणात स्प्रिंकलरद्वारे सिंचन करावे.
  • जास्त पाणी देणे टाळावे.

पाण्याचा ताण 7 ते 10 दिवसांपेक्षा जास्त झाल्यास

जर पावसाचा खंड वाढून 7 ते 10 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला तर:

  • 1% पोटॅशियम नायट्रेट फवारणी करावी किंवा
  • 19:19:19 विद्राव्य खताची सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.

महत्त्वाची सूचना: तीव्र उष्णता आणि जास्त पाण्याचा ताण असताना तणनाशकांची फवारणी करू नये.


अद्याप पेरणी झाली नसेल तर...

ज्या भागात अत्यल्प पावसामुळे अद्याप सोयाबीन पेरणी झालेली नाही, तेथे 23 जुलैपर्यंत पेरणी करता येऊ शकते. मात्र, उशिरा पेरणीमुळे उत्पादनात 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

लवकर येणारे सोयाबीन वाण

उशिरा पेरणीसाठी खालील वाणांची निवड करावी.

  • JS 20-34
  • JS 95-60
  • PDKV अंबा
  • MAUS 725

पेरणी करताना घ्यावयाची काळजी

  • दोन ओळींमध्ये 30 सें.मी. अंतर ठेवावे.
  • हेक्टरी योग्य रोपसंख्या राखण्यासाठी बियाण्याचा दर वाढवावा.
  • बीबीएफ (BBF) किंवा पट्टा पद्धतीने पेरणी करावी.
  • सोयाबीनमध्ये तूर आंतरपीक घेतल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

25 जुलैनंतर सोयाबीनची पेरणी टाळा

जर 25 जुलैपर्यंत सोयाबीन पेरणी शक्य झाली नाही, तर कृषी तज्ज्ञांनी सोयाबीनऐवजी पर्यायी पिकांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे.

पर्यायी पिके

  • 🌻 सूर्यफूल
  • 🌽 मका

ही पिके उशिरा पेरणीसाठी अधिक योग्य ठरू शकतात आणि आर्थिक जोखीमही कमी होऊ शकते.


निष्कर्ष

  पावसातील काही दिवसांच्या खंडामुळे घाबरून जाऊन महागड्या फवारण्या करण्याऐवजी जमिनीतील ओलावा टिकवणे, योग्य मशागत करणे आणि कृषी विद्यापीठाच्या शिफारशींचे पालन करणे अधिक फायदेशीर ठरेल. परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतल्यास उत्पादनातील नुकसान कमी करता येते आणि खर्चावरही नियंत्रण ठेवता येते.

सल्ला: आपल्या परिसरातील कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून स्थानिक परिस्थितीनुसार मार्गदर्शन घ्या.


            © दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

शेत वाचवा अभियान : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळा | Khet Bachao Abhiyan: Reduce Excessive Chemical Fertilizer Use for Sustainable Farming

शेत वाचवा अभियान : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळा, शाश्वत शेतीकडे वळा!
 | Khet Bachao Abhiyan: Reduce Excessive Chemical Fertilizer Use for Sustainable Farming


Shet vachava Abhiyan image

   महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. आपल्या काळ्या आईची सुपीकता टिकवून ठेवणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित राखणे ही आजच्या काळाची मोठी गरज बनली आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून ही चिंतेची बाब ठरत आहे.

  याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘शेत वाचवा अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांमध्ये संतुलित खत वापराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे.


रासायनिक खतांच्या वापराची सद्यस्थिती

राज्यात गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या वापरात सातत्याने वाढ दिसून आली आहे. उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करत आहेत. मात्र याचा दीर्घकालीन परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होत आहे.

विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या खतांचा अतिरेकी वापर मातीची गुणवत्ता कमी करतो. त्यामुळे उत्पादन वाढण्याऐवजी भविष्यात घट होण्याची शक्यता वाढते.


रासायनिक खतांच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम

1) जमिनीचे आरोग्य बिघडते

रासायनिक खतांच्या अति वापरामुळे मातीतील सेंद्रिय घटक कमी होतात. जमिनीची सुपीकता घटते आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.

2) पाणी प्रदूषण

खतांमधील रसायने पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन भूजल आणि नदी-नाल्यांमध्ये मिसळतात. त्यामुळे जलप्रदूषण वाढते.

3) आरोग्यावर परिणाम

रासायनिक अंश असलेले अन्न आणि दूषित पाणी यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

4) उत्पादन खर्च वाढतो

अति खत वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढून नफा कमी होतो.


‘शेत वाचवा’ अभियानाचे मुख्य उद्देश

  • रासायनिक खतांचा संतुलित वापर
  • मातीचे आरोग्य सुधारणे
  • सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढवणे
  • बनावट खते आणि कीटकनाशकांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण
  • शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार


अभियानांतर्गत महत्त्वाचे उपक्रम

  • मृदा आरोग्य पत्रिका (Soil Health Card)
  • शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे. मातीला कोणत्या अन्नद्रव्यांची गरज आहे हे समजल्यास खतांचा योग्य वापर करता येतो.
  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM)
  • रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा संतुलित वापर करून उत्पादन आणि जमिनीची गुणवत्ता दोन्ही टिकवता येते.

पर्यायी खतांचा वापर

  • नॅनो युरिया
  • जैविक खते
  • सेंद्रिय खते
  • हिरवळीची खते


शाश्वत शेती हाच पर्याय

  आज काळाची गरज म्हणजे उत्पादनाबरोबरच जमिनीचे आरोग्य जपणे. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि पर्यावरणाचे संरक्षण होते.

  शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवर संपूर्ण अवलंबून न राहता संतुलित व वैज्ञानिक पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे.


निष्कर्ष

   ‘शेत वाचवा अभियान’ हे केवळ एक सरकारी अभियान नसून भविष्यातील शेती वाचवण्याचा महत्त्वाचा प्रयत्न आहे. जमिनीचे आरोग्य, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

चला, रासायनिक खतांचा वापर कमी करूया…

  सेंद्रिय आणि शाश्वत शेती स्वीकारून आपली जमीन पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवूया! 🌱🚜

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************


नारोळ्या ते केळदोडी: आनंदपूरच्या गावरान आंब्यांच्या रसाळ आठवणी | Memories of Gavran Mangoes


नारोळ्या ते केळदोडी: माझ्या गावच्या रसाळ आठवणी
Memories of Gavran Mangoes

"Anandpur Gavran Amba Memories"

    माझं गाव आनंदपूर! तसं तर गाव खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध असेल, पण माझ्यासाठी आनंदपूरची ओळख म्हणजे तिथले नामांकित आंबे. आमच्या गावात पूर्वी 'लांघी' नावाचा एक भाग होता, जिथे दाट आमराई असायची. त्या काळच्या आंब्यांची चव आणि रूप खरोखरच 'एक से एक बढकर' असे. आजच्या चकचकीत बाजारात मिळणाऱ्या आंब्यांपेक्षा त्यांची सर कशालाच येणार नाही.

| आमची आगळीवेगळी 'आंबा-नामावली'

  आमच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात आनंदपूरचे आणि शेजारच्या चुडापूरचे आंबे घेण्यासाठी लांबून व्यापारी येत असत. तेव्हा आंब्याला फक्त 'आंबा' म्हणून ओळखलं जायचं नाही, तर त्यांच्या आकारानुसार आणि गुणानुसार त्यांना विशिष्ट नावे होतीः

  नारोळ्या, घोट्या, सुपाऱ्या, केळदोडी, झावळ्या, लोणच्या, खारोट्या, दोडी यातल्या 'नारोळ्या'चे नाव तर तो नारळासारखा दिसायचा म्हणून पडले होते. ही नामावली खूप मोठी आहे, जी आजच्या पिढीला ऐकून नवल वाटेल.

"Anandpur Gavran Amba Memories"

| बालपण आणि आंब्याचा घमघमाट

  लहानपणीच्या आठवणींमध्ये आंब्याचा वास आजही ताजा आहे. घरातल्या खोलीत आंब्याच्या अडीचा जो घमघमाट यायचा, तोच भूक चाळवायला पुरेसा असे. झाडावरून उतरवलेले सर्व आंबे एकत्र असायचे. एखादा आंबा चाखून पाहिला आणि तो थोडा आंबट लागला की तो लगेच टोपलीत जायचा. मग सुरू व्हायची शोधयात्रा 'मधाळ आणि गोड आंबा कोणत्या टापूत मिळेल?' हे शोधण्यातलं सुख काही वेगळंच होतं.

एक ऐतिहासिक आठवणः

   जेव्हा आमच्या गावचे डी. जी. पाटील (ज्यांनी नाशिकमध्ये डीजीपी नगर वसवले आणि जे 'बागलाणची वाघीण' म्हणून ओळखले जात) जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी संपूर्ण गावाला पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण दिले होते. विशेष म्हणजे, त्यासाठी वापरलेले सर्व आंबे आमच्या गावचेच अस्सल गावरान आंबे होते. त्यांची ती मधुर चव आजही लोकांच्या जिभेवर रेंगाळतेय.

शाक, पेम आणि अस्सल गावरान चव

  नैसर्गिक पद्धतीने झाडावर पिकलेल्या आंब्याला आम्ही 'शाक' म्हणायचो. हा शाक खाण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडला आहे. आंबे पिकवण्यासाठी ते पाचटात घालून ठेवले जायचे. कधी कधी आम्ही मित्रमंडळी आंब्याचे 'पेम' लपवून ठेवायचो आणि चार-पाच दिवसांनी ते आंबे पिकल्यावर चोरून खायचो.

"Anandpur Gavran Amba Memories"

"तुम्ही गावरान आंबे पहिले, आम्ही आता हायब्रीड कलमी बघतो..."

 नुकतंच आखाजीच्या (अक्षय्यतृतीया) निमित्ताने आंबे आणले होते. रस करण्यासाठी मिक्सरमध्ये तीन वेळा फिरवावे लागले, तेव्हा कुठे तो तयार झाला. आमच्या पिढीने गावठी आंब्याचा जो नैसर्गिक रस चाखलाय, त्याची चव या हायब्रीड आंब्यांना कधीच येणार नाही. हेच आंबे एकेकाळी सातासमुद्रापारही गेले होते, याचा सार्थ अभिमान वाटतो.

एक खंत आणि साद...

    आज मन खंतावते जेव्हा लांघीची ती दाट आमराई विरळ होताना पाहतो. अनेक नामांकित आंबे आता नामशेष झाले आहेत. आपला हा वारसा आपण जपला पाहिजे. फळांच्या राजाने माझ्या मनावर जे गारूड केलंय, तेच प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं. आजही माझं मन त्या आंब्याच्या डहाळीवर बसून बालपणाच्या आठवणीत रमतंय.

   तुमच्याकडे आनंदपूरच्या किंवा तुमच्या गावच्या आंब्यांच्या काही आठवणी असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा!

"Anandpur Gavran Amba Memories"
आनंदपूर गावातील चारूदत्तराजे यांची उस्फुर्त प्रतिक्रिया 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

गारपीट : बळीराजाच्या स्वप्नांवर कोसळलेले संकट (Hailstorm | Garpit)

🌨️

 गारपीट (Hailstorm

| Garpit) : बळीराजाच्या स्वप्नांवर कोसळलेले संकट

निसर्गाचा कोप आणि शेतकऱ्यांची वेदना


Garpit


    शेती हा निसर्गावर आधारित व्यवसाय आहे. पाऊस, ऊन, वारा या नैसर्गिक घटकांवरच शेतकऱ्यांचे जीवन उभे आहे. पण जेव्हा निसर्गच अचानक रौद्ररूप धारण करतो, तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका बसतो तो बळीराजाला.

गारपीट (Hailstorm / Garpit) ही अशीच एक आपत्ती आहे जी काही क्षणांत शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे कष्ट उद्ध्वस्त करते.


🌾 गारपिटीचे भीषण परिणाम

  • उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
  • कांदा, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांचे पूर्ण नुकसान
  • भाजीपाला आणि फळबागांचा नाश
  • आर्थिक तोटा आणि कर्जबाजारीपणा
  • शेतकऱ्यांच्या मानसिक तणावात वाढ

गारपीट म्हणजे फक्त बर्फाचे गोळे नाहीत, तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा आहे.


💔 शेतकऱ्यांच्या वेदनेतून उमटलेले शब्द

माझी  ही कविता शेतकऱ्यांच्या मनातील वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते 👇

गारपीट
Hailstorm

© दीपक केदू अहिरे, नाशिक

Garpit

असी कसी देवा, 
गारपीट तू केली, 
उन्हाळ्यात पाडतो पाऊस, 
हातची पिके वाया गेली... 

महागामोलाचे कांदा बियाणे, 
लावले ते शेतात, 
गारपीट पाडून तू, 
सडवले आता पोंग्यात... 

सारा जीव लावून 
आम्ही शेतमाल पिकवतो, 
गारपीट पाडून 
तोंडचा घास हिसकावून नेतो... 

रात्री, दिवसा आणि पहाटे 
आम्हीच का तुला सलतो, 
अवकाळी गारपीट कसी चुकवावी 
याच काळजीत सदा आम्ही असतो...

लाखमोलाचे पीक, 
तू करतो बेभरवश्याचे, 
दोन पैसे येतील गाठी, 
कसे निघावे उत्पादन खर्चाचे... 

मातीमोल असतो भाव, 
बियाणे, रोपातही भेसळ, 
त्यात तुझी अवकाळी, 
किती सोसावी आम्ही कळ...

Garpit

🌱 गारपिटीमागील कारणे

  • हवामानातील अचानक बदल
  • वातावरणातील अस्थिरता
  • ढगांतील तापमानातील तफावत
  • हवामान बदलाचा वाढता प्रभाव

आजच्या काळात गारपिटीचे प्रमाण वाढत चालले आहे, ही शेतीसाठी गंभीर बाब आहे.


⚠️ उपाययोजना

  • पिक विमा (Crop Insurance) घेणे
  • हवामान अंदाजावर लक्ष ठेवणे
  • फळबागांवर संरक्षक जाळी (Net) वापरणे
  • नुकसान झाल्यास तात्काळ पंचनामा करणे
  • शासनाच्या मदतीसाठी अर्ज करणे

🌼 निष्कर्ष

    गारपीट ही शेतकऱ्यांसाठी केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर भावनिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर मोठा आघात आहे.

तरीही, बळीराजा प्रत्येक संकटानंतर पुन्हा उभा राहतो, नव्या आशेने पेरणी करतो आणि जीवनाची गुढी पुन्हा उभारतो. 🌱

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

दोन महिलांचा ध्यास, शेती आणि द्राक्ष निर्यातीचा यशस्वी प्रवास! (Two women's passion, a successful journey of farming and grape export)

दोन महिलांचा ध्यास, शेती आणि द्राक्ष निर्यातीचा यशस्वी प्रवास!
Two women's passion, a successful journey of farming and grape export

Don mahilancha dhyas, sheti aani draksh niryaticha yashsvi pravas

   आजच्या काळात शहरात सरकारी नोकरी करणाऱ्या पतींसोबत सुखाचं आयुष्य सहज मिळू शकतं. पण मनीषा दीपक जाधव आणि सविता बबन जाधव या दोन महिलांनी वेगळा मार्ग निवडला. शेतीची माती आणि परिश्रमावर विश्वास ठेवत त्यांनी द्राक्ष शेतीसह द्राक्ष निर्यातीचं स्वप्न साकार केलं.


   मनीषा आणि सविता – दोघींना प्रत्येकी दोन मुले आहेत. मनीषांचे पती एस.टी. महामंडळात तर सवितांचे पती एम.एस.इ.बी.मध्ये कार्यरत आहेत. कुटुंबातील तिसरे दीर प्राध्यापक असून त्यांची पत्नी शिक्षिका आहे. म्हणजे घरातील सर्व पुरुष सरकारी नोकरीत होते. तरीही शेतीची जबाबदारी या दोन महिलांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.


     २०१८ साली त्यांनी द्राक्षबाग लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०२२ मध्ये मनीषांच्या पतींना मुंबई येथे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली, तेव्हा परिस्थिती कठीण होती. द्राक्षबाग नव्यानेच उभी राहत होती आणि अनुभवही कमी होता. अशा वेळी मनीषांनी ठाम शब्दांत सांगितले – "तुम्ही निर्धास्त नोकरीला जा, शेती कोणीच खोदून नेणार नाही, जबाबदारी आम्ही सांभाळू."


    यानंतर दोघींनी खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू केला. मजूर न मिळाल्यास स्वतः शेतात काम केलं. तज्ञांचे मार्गदर्शन घेतलं, चुका करून शिकल्या आणि दिवसेंदिवस पारंगत होत गेल्या. मेहनतीच्या जोरावर बाग फुलत गेली. २०२० पासून त्यांनी सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात सुरू केली आणि सभासदत्वही घेतलं.


   त्यांच्या परिश्रमाचे फळ लवकरच दिसू लागले.

२०२२ मध्ये २५.२३ टनातून १८.१६ लाख रुपये उत्पन्न.

२०२३ मध्ये २९.४४ टनातून २२.९६ लाख रुपये.

२०२४ मध्ये १५.५० टनातून १३.४८ लाख रुपये.

२०२५ मध्ये २०.३८ टनातून १६.७० लाख रुपये.


    विशेष म्हणजे २०२२-२३ साली विक्रमी एकरी १२ टन उत्पादन घेऊन १०० टक्के द्राक्ष निर्यात करण्याचा मानही मिळवला. सध्या त्यांच्या ७ एकर शेतीत २.५ एकर थॉम्पसन, १.५ एकर क्रिमसन आणि उर्वरित क्षेत्रात फ्लॉवर आहे.


   आज त्यांची द्राक्षबाग पाहण्यासाठी तालुक्यातील लोक येतात आणि मार्गदर्शन घेतात. लोक विचारतात – "सर्व पुरुष नोकरीला आहेत, मग एवढी मेहनत कशाला?" तेव्हा या ‘लेडी जय-वीरू’ हसून उत्तर देतात – "कष्टाला पर्याय नाही."


     जाधव कुटुंबाची खरी ताकद म्हणजे त्यांचं एकत्र राहणं. पतींनी महिलांवर विश्वास दाखवला, त्यांना मुभा दिली, आणि महिलांनी कष्ट, जिद्द व कल्पकतेने शेतीतून आर्थिक बळकटी निर्माण केली.


       आज मनीषा आणि सविता या फक्त शेतकरी नाहीत, तर निर्यातदार महिलांचा प्रेरणादायी चेहरा आहेत. त्यांनी सिद्ध केलं की, शहरातील आरामशीर आयुष्य सोडून संघर्षाचा मार्ग निवडला तर शेतीही लाखोंचं उत्पन्न देऊ शकते.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2026 : तीन वर्षांची मुदतवाढ, पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया / Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Scheme 2026: 3-Year Extension, Eligibility, Benefits & Application Process

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Schem...