साहित्य सुट्टीवर गेले
Sahitya went on vacation
साहित्य सुट्टीवर गेले
अशी परिस्थिती आता,
शब्दांनी घेतली सुट्टी
निशब्द केले कितीदा...
साहित्य सुट्टीवर गेले
आता काहीच सुचत नाही,
भाेवतालचा घेताे अंदाज
शब्दाचं गाणं वाजत नाही...
साहित्य सुट्टीवर गेले
काळजी हे शब्दच काेरले,
बातम्या झाले साहित्य
सर्व साहित्य ठप्प पडले..
साहित्य सुट्टीवर गेले
वाचकही फिरकत नाही,
लाईक,काॅमेन्टच्या भाेवती
साहित्य शेअर हाेत नाही...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment