name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): marathi language
marathi language लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi language लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी माझे विचार l My thoughts for the prosperity of Marathi language

मराठी ज्ञानभाषा समृद्धी साठी माझे विचार
My thoughts for the prosperity of Marathi language

Marathi bhasha samrudhisathi maze vichar

मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी मोठमोठ्या समुदायाला व्यापक प्रमाणात  मराठी  भाषा  वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी अंगीकारावी वाटत नाही. तोपर्यंत ती ज्ञानभाषा होऊ शकत नाही. 

अभिजात भाषेचा दर्जा

   जगात दहा कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या वीस भाषांमध्ये मराठी बोलली जाते. तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नव्हता. आता तो मिळाला आहे. 

मराठीचा जास्तीत जास्त वापर

  एखाद्या भाषेत करियर करायचं झाल तर इंग्रजी भाषेत होऊ शकत तसं ते मराठी भाषेत होत नाही. म्हणून मराठी ज्ञानभाषा समृद्ध मराठीचा जास्तीत जास्त वापर जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात होणे गरजेचे वाटते. 

भाषेची आवश्यकता

 राज्यातल्या मोठमोठ्या शहरात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या अनेक परप्रांतीयांना मराठी येत नाही. तरीही व्यवसाय करतात. कारण मराठी भाषा न शिकताही त्यांचे चालते. भाषेची अनिवार्यता आडवी येत नाही परंतु तामिळनाडू, बंगाल, कोलकत्ता या शहरात ही परिस्थिती नाही. तिथे तुम्हाला तामिळ भाषा न येता तुम्ही चेन्नईत राहूच शकत नाही. एवढी भाषेची आवश्यकता आपल्याकडे झाली पाहिजे तरच मराठी भाषा समृद्ध होईल.    

पाठ्यपुस्तके दर्जेदार व्हावी

 आज मराठी शाळेमधलं आकर्षण संपलं आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत मराठीच स्थान शोधावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे. मराठी  ज्ञानभाषा समृद्धीसाठी,  मराठी भाषा टिकवण्यासाठी या शाळांचा दर्जा उंचावला पाहिजे असे माझे मत आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तके दर्जेदार झाली पाहिजेत. 

वाचन संस्कृतीवर आघात

 पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक चुका, दोष आढळतात. त्यामुळे भाषेची वाट लागते. त्यामुळे मराठी भाषेच्या जाणकारांकडून पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रिया निरपेक्ष व्हावी. राजकीय लोकांचा हस्तक्षेप टाळावा. टी.व्ही. व मोबाईलमुळे वाचन संस्कृतीवर आघात झाला आहे. पूर्वी मराठी वाचनाची गोडी लागायची. दैनिके, साप्ताहिके, मासिके पूर्वी आवडीने वाचली जात. परंतु आज वाचन संस्कृती कमी झाली आहे. 

दर्जेदार साहित्यनिर्मिती

 मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी मराठी भाषेचे वाचन होणे गरजेचे आहे. मराठी भाषेत दर्जेदार साहित्यनिर्मिती झाली पाहिजे. मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी एकच एक मराठी भाषा संपूर्ण राज्याला जोडून ठेवू शकलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. दर दहा किलोमीटरवर  भाषा बदलते. स्थानिक बोलीभाषेतले अनेक शब्द शोधून ते प्रमाण मराठीतले आहे यासाठी प्रयत्न अभ्यासक, संशोधकांनी करणे गरजेचे वाटते. 

आधुनिक मराठी शब्दकोश व्हावा

 आज इंटरनेटवर म्हणजे आंतरजालावर शब्दशोध करायला गेले तर फारसे पर्याय नाहीत. त्यामुळे आंतरजालावर मराठी लेखन मोठ्या प्रमाणात व्हावे. आधुनिक मराठी शब्दकोश तयार केला पाहिजे. तरच आपण मराठी ज्ञानभाषा समृद्ध करू शकू. इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठी शब्द आहेत. तो वापरणे म्हणजे मराठी भाषेचे सौंदर्य टिकवण्यासारखे आहे. मराठी समजणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर केला पाहिजे.

Marathi bhasha samrudhisathi maze vichar

 २७ फेब्रुवारी : मराठी भाषा दिन

 महाराष्ट्रातील प्रतिभावंत ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. मायभाषा ही ज्ञानभाषा  होण्यासाठी प्रयत्न केले आहे. 

मराठी भाषेची समृद्धी

 संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातल्या ओवीतून  बंधू  निवृत्तीनाथ यांना मातेच्या रुपात पाहून मराठी भाषेची समृद्धी व विपुलता व्यक्त केली आहे. अनेक संतवचनातून व वाणीतून मराठी भाषा समृद्ध झाली आहे. सातशे वर्ष परंपरा लाभलेल्या वारकरी सांप्रदायाने मराठी भाषेचा विकास केला. अनेक संतानी आपपल्या बोलीभाषेप्रमाणे तिला अभंगवाणीतून प्रकट केले. त्याचा अभ्यास प्रत्येक मराठी भाषिकांनी केला पाहिजे. तरच  मराठी  भाषा अधिकाधिक समृद्ध होईल. बोली भाषेतील गोडवा, भावुकता, रांगडेपणा, आदरतिथ्य दिसून येते. 

 कवी गझलकार सुरेश भट यांच्या गझलेत मराठीच्या सामर्थ्याचे दर्शन  घडते.

 पाहुणे जरी असंख्य पोसते  मराठी 
आपुल्या घरात हाल सोसते मराठी 
हे असते कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

व्यवहारामध्ये मराठी  भाषा व माणूस यांना प्राधान्य  

  मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी समोरची व्यक्ती ओळखीची असो कि अनोळखी, बोलण्याची सुरुवात मराठीतून करावी. अमराठी प्रश्न आला तरी उत्तर मराठीत द्यावे. मराठीत सेवा मागाव्या. नसतील तर त्याबद्दल तक्रार करावी. व्यापार आणि व्यवहारामध्ये मराठी  भाषा  आणि मराठी माणूस यांनाच प्राधान्य द्यावे. तरुणांनी काय आणि वयस्कर माणसांनी काय, ज्यांना मराठी भाषा ही आपली भाषा वाटते त्यांनी ती स्वतः व्यवहारात आणावी आणि आपसात बोलायला सुरुवात करावी असे मला वाटते. 

 मराठीच्या संवर्धनासाठी   चतु:सुत्री 

 मराठी बोला! मराठी लिहा! मराठी वाचा! मराठीत व्यवहार करा! ही चतु:सुत्री मराठीच्या संवर्धनासाठी, समृद्धीसाठी वापरणे गरजेचे आहे.
    मराठी जागवायची असेल तर तिला ज्ञानभाषा बनवणे. तिच्यापासून पैसा मिळेल याची सोय करणे. मित्र मैत्रिणींचा वाढदिवस असेल तर मराठीतून शुभेच्छा देणे, सोशल मीडियातून मराठीतून संवाद साधावा. 

मराठीला प्राधान्य

 मराठी साहित्य वाचावे. मराठी चित्रपटाला, नाटकाला प्राधान्य द्यावे. याचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी भाषांवर बहिष्कार टाकावा. ती भाषा बोलूच नये असा होत नाही. या भाषा नोकरी, व्यापार यासाठी जरूर शिकाव्यात. त्यांचा अभ्यास करावा पण मराठीला प्राधान्य द्यावे. अशा पद्धतीने  मराठी  भाषा समृद्धीसाठी प्रत्येकाने पेटून उठले पाहिजे. 

माझा खारीचा वाटा आणि निरंतर प्रयत्न 

 मराठीचा सार्वत्रिक वापर करून, मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करून संशोधन, साहित्यनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे. मी स्वत: मराठी भाषेतील आशयपूर्ण दीड हजार कविता, ५ शेतीची पुस्तके, ५० मराठी उद्योजकांच्या मुलाखती तसेच लेख, बातम्या, साहित्य आदि लिखाण केले आहे. मराठी राजभाषा व्हावी म्हणून कवितेद्वारे पत्रप्रपंच केला आहे.  मराठी  भाषा समृद्धीसाठी माझा हा खारीचा वाटा आहे. आणि हाच निरंतर प्रयत्न करत राहणार यात शंका नाही.

© दीपक केदू अहिरे 

 नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

मराठी असे आमुची मायबोली...(Marathi is our language)

मराठी असे आमुची मायबोली
Marathi is our language 

Marathi ase aamuchi mayaboli

मराठी असे आमुची मायबोली 
प्राचीन कालखंडाची भाषा, 
शिलालेख, कोरीव लेख आदि 
आहे आधुनिक भाषेची दिशा..
 

मराठी असे आमुची मायबोली 
बाराव्या शतकापासून प्राचीनतेचे पुरावे, 
प्रगत रचना व लेखन दर्जासाठी 
मराठी मायबोलीचे बोट आम्ही धरावे...

मराठी असे आमुची मायबोली 
मराठी संस्कृतीचा अस्सल आधार, 
भाषेला मिळाला अभिजात दर्जा 
म्हणून आम्ही लढलोय आरपार...

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

Marathi ase amuchi mayboli

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

चला बोलूया मराठी, चला लिहूया मराठी! | मराठी भाषेचा अभिमान | Chala boluya marathi,Chala lihuya marathi

चला बोलूया मराठी, चला लिहूया मराठी!
Chala boluya marathi, Chala lihuya marathi

Speaking and writing marathi

“मराठी माझी मायबोली, मराठी माझा अभिमान!”

    भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते; ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची, विचारांची आणि भावविश्वाची ओळख असते. आपल्या मनातील भावना ज्या भाषेत सहज व्यक्त होतात, ती आपली मातृभाषा. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, संतांच्या अभंगांनी समृद्ध झालेल्या आणि साहित्यिकांच्या लेखणीने बहरलेल्या मराठी भाषेचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाने जपला पाहिजे.

    आजच्या डिजिटल युगात इंग्रजी आणि इतर भाषांचा वापर वाढला आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामध्ये अनेकदा इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. इतर भाषा शिकणे नक्कीच चांगले आहे; मात्र त्या शिकताना आपली मातृभाषा मागे पडता कामा नये.

    म्हणूनच आज गरज आहे एका छोट्याशा पण प्रभावी संकल्पाची—
“चला बोलूया मराठी, चला लिहूया मराठी!”
मराठी बोलण्याचा अभिमान बाळगूया

    आपण मित्रांशी, कुटुंबीयांशी किंवा समाजातील व्यक्तींशी मराठीत सहज संवाद साधू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवणे ही मराठी संवर्धनाची सर्वात सोपी सुरुवात आहे.

    मराठी बोलताना कमीपणा वाटण्याचे कोणतेही कारण नाही. उलट आपल्या मातृभाषेतून व्यक्त होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

    घरात मुलांशी मराठीत बोला. आजी-आजोबांच्या गोष्टी मराठीत ऐका. मित्रांशी मराठीत गप्पा मारा. कार्यक्रमांमध्ये मराठीचा वापर करा.
भाषा जिवंत राहते ती तिच्या वापरामुळे.
चला लिहूया मराठी!

    बोलण्याबरोबरच मराठी लिहिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे लिहिण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. फेसबुक पोस्ट, व्हॉट्सॲप संदेश, ब्लॉग, कविता, कथा, लेख, शुभेच्छा संदेश किंवा सोशल मीडिया कॅप्शन—या प्रत्येक माध्यमातून आपण मराठी लिहू शकतो.

    देवनागरी लिपीत मराठी लिहिण्याची सवय लावूया. मराठी टायपिंग शिकूया. आपल्या विचारांना मराठी शब्द देऊया. आपण जितके मराठीत लिहू, तितकी मराठी डिजिटल जगात अधिक सक्षम होईल.

मराठी साहित्याची समृद्ध परंपरा

    मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यापासून आधुनिक काळातील असंख्य साहित्यिकांपर्यंत समृद्ध साहित्यपरंपरा लाभली आहे.

    ज्ञानेश्वरी, तुकारामांची अभंगगाथा, संत साहित्य, शिवकालीन इतिहास आणि आधुनिक मराठी साहित्य ही आपल्या भाषेची वैभवशाली परंपरा आहे.
ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

    मुलांना मराठी पुस्तके वाचायला देऊया. मराठी कविता वाचूया. कथा आणि कादंबऱ्या वाचूया. चांगले मराठी लेख इंटरनेटवर वाचूया आणि इतरांनाही वाचायला प्रोत्साहित करूया.

डिजिटल युगात मराठी

    आज मराठी भाषा केवळ पुस्तकांच्या पानांवर मर्यादित राहिलेली नाही. ब्लॉग, YouTube, Facebook, Instagram, WhatsApp आणि इतर डिजिटल माध्यमांवर मराठी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.

आपणही या डिजिटल विश्वात मराठीचा वापर वाढवू शकतो.
  • मराठीत ब्लॉग लिहा.
  • मराठीत व्हिडिओ तयार करा.
  • मराठीत पॉडकास्ट करा.
  • मराठीत सोशल मीडिया पोस्ट लिहा.
  • मराठी पुस्तकांची माहिती शेअर करा.
  • मराठीतील चांगले साहित्य इतरांपर्यंत पोहोचवा.
  • यातून मराठी भाषा नव्या पिढीशी आणि नव्या तंत्रज्ञानाशी जोडली जाईल.
  • मराठी शिकूया आणि इतर भाषांचाही सन्मान करूया
  • मराठीचा अभिमान म्हणजे इतर भाषांचा द्वेष नव्हे.
    आपल्याला इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषा शिकायच्या असतील तर नक्की शिकूया. अनेक भाषा येणे ही ज्ञानाचीच श्रीमंती आहे. मात्र इतर भाषा शिकताना आपली मातृभाषा विसरू नये, एवढेच.
आपली भाषा जपणे आणि इतर भाषांचा सन्मान करणे—हीच खरी भाषिक समृद्धी.
प्रत्येकाने एक छोटा संकल्प करूया...

    मराठी संवर्धनासाठी मोठी चळवळ उभी करण्यापूर्वी आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो.
  • दररोज काही वेळ मराठीत वाचा.
  • मराठीत लिहा.
  • मराठीत बोला.
  • मराठी पुस्तक विकत घ्या.
  • मुलांना मराठी साहित्याची ओळख करून द्या.
  • सोशल मीडियावर मराठीचा वापर करा.
    आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—
    मराठी बोलताना आणि लिहिताना अभिमान बाळगा!
    चला, मराठीचा उत्सव साजरा करूया!
    
    मराठी ही केवळ भाषा नाही; ती आपल्या भावनांची भाषा आहे. आपल्या मातीतल्या आठवणींची भाषा आहे. आईच्या मायेची भाषा आहे. संतांच्या विचारांची भाषा आहे. साहित्यिकांच्या सर्जनशीलतेची भाषा आहे.

म्हणून आज आपण एक संकल्प करूया—
चला बोलूया मराठी!
चला लिहूया मराठी!
चला वाचूया मराठी!
चला जपूया मराठी!

आपल्या घरापासून, आपल्या मित्रपरिवारापासून आणि आपल्या लेखणीतून मराठीचा प्रवास सुरू करूया.
मराठी बोलूया, मराठी लिहूया आणि मराठी जगूया!
जय मराठी! 🚩

               चला बोलुया मराठी, चला लिहूया मराठी...


                           चला बोलुया मराठी 
चला लिहूया मराठी,
बांधू या मराठी भाषेच्या 
जन्मोजन्मीच्या गाठी...

चला बोलुया मराठी 
चला लिहूया मराठी,
शाबूत ठेवू या 
आमच्या मराठीची काठी...

चला बोलुया मराठी 
चला लिहूया मराठी,
वापरू आम्ही भाषा मराठी 
आमच्या दैनंदिन व्यवहारासाठी...

© दीपक केदू अहिरे | नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

******************************************

मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...