name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Agriculture Business
Agriculture Business लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Agriculture Business लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शेतकऱ्यांसाठी वन-स्टॉप सोल्युशन–ॲग्रिएक्स्पर्टस ॲग्रो मॉल | Agriexperts Agro Mall: One Stop Solution for Farmers

 


ग्रिएक्स्पर्टस ग्रो मॉल : श्री. बाळासाहेब ठोंबरे यांचे शेतकरीहिताचे बहुआयामी स्वप्न

Agriexperts Agro Mall: One Stop Solution for Farmers


Shetkaryansathi one stop solution

प्रस्तावना

    भारतीय शेती हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून आपल्या संस्कृतीचा कणा आहे. शेतकरी आणि कृषी उद्योजक यांच्या प्रगतीशिवाय देशाची अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकत नाही. या कृषिप्रधान भूमीतून घडलेले श्री. बाळासाहेब सयाजीराव ठोंबरे हे नाव आज शेतकरी, कृषी उद्योजक आणि खत उद्योगासाठी आशेचा किरण ठरले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ व्यावसायिकच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा सर्व अंगांनी समृद्ध आहे.


लहान खेड्यातील मोठी सुरुवात 🌾

    १९७० साली नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिंदे या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुटुंब मध्यमवर्गीय व अशिक्षित असले तरी दूरदृष्टी मात्र प्रखर होती. प्राथमिक शिक्षण शिंदे येथे, माध्यमिक वडाळीभोई येथे आणि उच्च शिक्षण चांदवड व नाशिक येथे घेतले.

    कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन ठोंबरे परिवारातील पहिले पदवीधर ठरले. त्यांनी शिक्षणाचा वारसा पुढील पिढ्यांमध्ये रुजवला. मुली प्राध्यापक झाल्या, जावई प्राध्यापक व चार्टर्ड अकाउंटंट झाले, मुलगा अभिजित कृषी पदवीधर होऊन एमबीए करत आहे व स्वतःची कंपनी चालवत आहे. त्यामुळे ठोंबरे परिवार आज शिक्षण, व्यावसायिकता आणि प्रगतीचे प्रतीक बनले आहे.


कायद्याऐवजी शेतकरीसेवेचा मार्ग 🚜

    कायद्याची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला –
“मी शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो?”

    या विचारातून १९९३ साली पिंपळगाव बसवंत येथे अल्फा बायो प्रॉडक्ट्स इंडस्ट्रीजची स्थापना झाली. व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू झाला, पण शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे तो झपाट्याने वाढला.

    शास्त्रीय ज्ञानाची गरज लक्षात घेऊन त्यांनी बी.एस्सी. (ग्री) पूर्ण केले. यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक विश्वासार्ह व वैज्ञानिक झाला.


खत कायद्याचा सखोल अभ्यास 📊

२०१९ साली दिल्ली येथे स्थापन झालेल्या सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्रीज असोसिएशनमध्ये त्यांनी महाराष्ट्र व गोव्याचे राज्याध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली:

  • खत कायद्यात सुधारणा
  • नव्या ग्रेडचा समावेश
  • उद्योजकांच्या समस्या सरकारसमोर मांडणे
    यासारखी महत्त्वाची कामे झाली.

शेतकरी, संशोधक व पत्रकारांचा गौरव 🏆

संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी कृषी पत्रकार, वैज्ञानिक व संशोधकांना सन्मानित केले जाते. यामुळे शेतीविषयक ज्ञानाचा प्रसार वाढतो. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खत उद्योग प्रदर्शन व परिसंवाद आयोजित करून आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली जाते.


ग्रिएक्स्पर्टस ग्रो मॉल” – शेतकऱ्यांसाठी वन-स्टॉप सोल्युशन 🌱


shetkaryansathi one stop solution


शेतकऱ्यांच्या सर्व गरजा एका ठिकाणी पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने अॅग्रिएक्स्पर्टस अॅग्रो मॉल प्रा.ली.ची स्थापना करण्यात आली.

या मॉलमध्ये उपलब्ध सुविधा:

  • खते, औषधे व बियाणे
  • शेती यंत्रसामग्री व वॉटर मॅनेजमेंट सिस्टिम
  • पॉलीहाऊस व शेडनेट
  • माती, पाणी व पिक तपासणी प्रयोगशाळा
  • तज्ज्ञ शेती सल्ला व प्रशिक्षण
  • सरकारी योजना व बँकिंग सुविधा

शेतकऱ्यांना ग्राहक कार्ड देऊन सवलतीच्या दरात वस्तू दिल्या जातात. तसेच पिक परिसंवाद, शेतदौरे आणि आधुनिक शेती प्रशिक्षण मोफत दिले जाते.


फ्रान्चायझी मॉडेल – तरुणांसाठी मोठी संधी 💼

ग्रो मॉलची फ्रान्चायझी:

  • शेतकरी उत्पादक कंपन्यांना
  • महिला बचत गटांना
  • कृषी पदवीधर तरुणांना

यामुळे तरुणांना स्वावलंबनाची संधी मिळते आणि शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन मिळते.


वारकरी संप्रदायाशी नाळ 🙏

व्यावसायिक यशाबरोबरच ठोंबरे वारकरी संप्रदायाशी जोडले गेले आहेत. नामसंकीर्तन, कीर्तन आणि आध्यात्मिक मूल्ये त्यांच्या कार्यात सेवा व नम्रता आणतात.


आजवरचा वारसा आणि पुढची दिशा 🚀

    गेल्या ३३ वर्षांपासून गुणवत्तेची परंपरा जपत त्यांनी शेतकरीहिताचा नवा अध्याय लिहिला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी पदवीधर आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली आहे.

    एका छोट्या खेड्यात जन्मलेला मुलगा आज राष्ट्रीय पातळीवर खत उद्योगाचे नेतृत्व करतो आहे. श्री. बाळासाहेब सयाजीराव ठोंबरे यांचे कार्य शेतकरी, संशोधक, उद्योजक आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व भविष्यातील कृषी उद्योजकांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

११ माजी सैनिकांची सेंद्रिय शेती आंतरराष्ट्रीय पातळीवर | वेंकटेश्वरा ॲग्रो फार्मची प्रेरणादायी यशोगाथा | Organic Farming Success Story India

 


११ माजी सैनिकांची सेंद्रिय शेती आंतरराष्ट्रीय पातळीवर – वेंकटेश्वरा ॲग्रो फार्मची प्रेरणादायी यशोगाथा

Organic Farming Success Story India


11 sainikanchi sendriya sheti

   

    भारतामध्ये शेती ही केवळ उपजीविकेचा व्यवसाय नसून ती संस्कृती, परंपरा आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल या गावात सुरू झालेली एक छोटी कल्पना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली आहे. ही कथा आहे ११ माजी सैनिकांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीच्या यशोगाथेची.

    या उपक्रमामागे आहेत डॉ. शिवाजीराव डोळे (Ex Army Black Cat Commando), ज्यांनी निवृत्तीनंतर केवळ स्वतःसाठी नाही तर शेकडो सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली.


सेंद्रिय शेतीचा छोटा प्रयोग ते ५२२ एकरांचा प्रकल्प

11 maji sainikanchi sendriya sheti

    मालेगावपासून सुमारे किलोमीटर अंतरावर असलेली खडकाळ आणि शेतीसाठी अवघड जमीन डॉ. शिवाजी डोळे यांनी भाडेतत्त्वावर घेतली. सुरुवातीला त्यांनी १० एकरांवर विषमुक्त सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला.

आज हीच जमीन वाढत वाढत ५२२ एकरांपर्यंत पोहोचली आहे, जिथे शेतीसोबत अनेक पूरक व्यवसायही सुरू आहेत.

या प्रकल्पामुळे ४५० पेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आहे.


माजी सैनिकांसाठी रोजगाराचा नवा मार्ग

11 maji sainikanchi sendriya sheti

    सेनेत सेवा दिल्यानंतर अनेक माजी सैनिकांना रोजगाराच्या समस्या येतात. याची जाणीव ठेवून डॉ. डोळे यांनी काही सैनिक मित्रांसोबत मिळून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला ११ सदस्यांपासून सुरू झालेली संस्था आज माजी सैनिक आणि शेतकरी मिळून जवळपास लाख सदस्यांपर्यंत पोहोचली आहे.

त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे
जय जवान – जय किसान”


शेती आणि शेतीपूरक व्यवसाय

11 maji sainikanchi sendriya sheti

    वेंकटेश्वरा ॲग्रो फार्ममध्ये विविध प्रकारच्या शेती आणि उत्पादन प्रकल्प चालतात.

फळ शेती

पशुपालन

  • १५०० गिर गायींचे संगोपन

  • दुधापासून तूप उत्पादन

  • गोशाळेतून शेणखत आणि पंचगव्य उत्पादने


सेंद्रिय उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग

11 maji sainikanchi sendriya sheti

    संस्थेने शेतीसोबत अनेक प्रक्रिया उद्योगही सुरू केले आहेत.

सेंद्रिय खते

पंचगव्य उत्पादने

  • पंचगव्य अगरबत्ती

  • औषधी उत्पादने

इको फ्रेंडली उत्पादने

  • शेणापासून बनवलेले नैसर्गिक रंग (Natural Paints)


प्रक्रिया केलेली उत्पादने

काजू प्रक्रिया उद्योग

कर्नाटकातील बेळगाव येथे संस्थेचा मोठा काजू प्रक्रिया कारखाना असून दररोज २० क्विंटल काजू प्रक्रिया केली जाते.

इतर उत्पादने

  • गिर गायीचे शुद्ध तूप

  • सेंद्रिय हळद

  • हर्बल मध

  • जेरॅनियम ऑइल (Geranium Oil)


11 maji sainikanchi sendriya sheti


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यश

वेंकटेश्वरा अॅग्रो फार्मचे उच्च दर्जाचे द्राक्ष जर्मनी आणि नेदरलँडसारख्या युरोपियन देशांमध्ये निर्यात केले जातात.

याशिवाय

  • शरबती गहू

  • लोकवन गहू

  • केसर आंबा

  • पेरू

  • डाळिंब

  • केळी

  • सिताफळ

अशा अनेक फळांचे उत्पादन येथे घेतले जाते.

11 maji sainikanchi sendriya sheti


नाविन्यपूर्ण प्रकल्प

    संस्थेने शेतीमध्ये अनेक आधुनिक उपक्रम सुरू केले आहेत.

माती, पाणी आणि पान-देठ परीक्षण केंद्र
11 maji sainikanchi sendriya sheti


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

11 maji sainikanchi sendriya sheti

    या प्रकल्पाला भेट देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते.

    या कार्यक्रमात निवृत्त सैनिक आणि शेतकऱ्यांचे सहकारिता संमेलन आयोजित करण्यात आले होते.


पंतप्रधानांनीही केले कौतुक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमामध्ये या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. यामुळे या प्रकल्पाला देशभरातून ओळख मिळाली.

11 maji sainikanchi sendriya sheti


प्रेरणादायी संदेश

डॉ. शिवाजीराव डोळे यांची कथा सांगते की
जर इच्छाशक्ती आणि ध्येय स्पष्ट असेल तर खडकाळ जमीनही सोन्याची होऊ शकते.

११ माजी सैनिकांनी सुरू केलेली ही छोटी कल्पना आज हजारो लोकांसाठी रोजगार आणि लाखो लोकांसाठी प्रेरणा बनली आहे.

ही कथा फक्त शेतीची नाही, तर आत्मनिर्भर भारताची आहे.

11 maji sainikanchi sendriya sheti

शेतकरी उत्पादक कंपनी : स्थापना, फायदे आणि योजना | Farmer Producer Company Guide

शेतकरी उत्पादक कंपनी : स्थापना,फायदे आणि योजना
Farmer Producer Company Guide

Shetkari utpadak company : sthapana, fayade ani yojna

शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी: फार्मर प्रोड्युसर कंपनी) स्थापन करण्याची प्रक्रिया कंपनी कायदा २०१३  नुसार केली जाते. ही कंपनी शेतकऱ्यांनी स्वतः स्थापन करून चालवायची असते आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे हा आहे. 

    प्रक्रिया, साठवण, विक्री यामधून अधिक नफा मिळवणे हा उद्देश आहे. एक एकट्या शेतकऱ्याने प्रयत्न करण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मिळून प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. निविष्ठा खरेदी, यंत्राचा वापर, काढणी, प्रक्रिया, साठवणूक, पॅकिंग, ब्रॅण्डिंग, विपणन सुविधा लाभ शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना मिळतो. 


Shetkari utpadak company: sthapana, fayade aani yojana


शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

  शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्यासाठी किमान १० व्यक्ती (शेतकरी) किंवा २ प्रोड्युसर इन्स्टिट्यूशन्स (उत्पादक संस्था) सदस्य असणे आवश्यक आहे. सर्व सदस्य शेतकरी किंवा कृषी उत्पादनाशी संबंधित असावेत. नोंदणीसाठी किमान ५ संचालक लागतात. वैयक्तिक उत्पादक शेतकरी अथवा उत्पादक संस्था  फक्त कंपनीचे सभासद होऊ शकतात. अधिकृत भांडवल साधारण एक लाखापासून सुरुवात करता येते.

आवश्यक कागदपत्रे

  शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागतात त्यात सदस्य / संचालकांची कागदपत्रात आधार कार्ड, पॅन कार्ड, २ पासपोर्ट साईज फोटो, राहण्याचा पुरावा (विज बिल/ रेशन कार्ड /मतदान ओळखपत्र), जमीन ७/१२ उतारा (शेतकरी असल्याचा पुरावा) कंपनीसाठी : कंपनीचे नाव (३ पर्याय तयार ठेवावेत), नोंदणीसाठी पत्ता पुरावा (विज बिल / मालमत्ता कर पावती / भाडे करार) ही कागदपत्रे लागतात. 

नोंदणीची प्रक्रिया

  कंपनीचे नाव आरक्षण पोर्टलवर रिझर्व्ह युनिक नेमद्वारे करावे लागते  नंतर डिजिटल सिग्नेचर मिळवणे  गरजेचे आहे.  हे सर्व संचालकांसाठी आवश्यक असते, त्यानंतर डीन म्हणजेच डायरेक्टर आयडेंटीफिकेशन नंबर मिळवणे गरजेचे असते. नंतर इनकॉर्पोरेशन फॉर्म भरून सबमिट करावा यात एमओए (मेमोरँडम ऑफ असोसिएशन) आणि एओए (आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) तयार करतात. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडून प्रमाणपत्र मिळते. यानंतर कंपनी कायदेशीररीत्या अस्तित्वात येते. कंपनीसाठी कर विभागाकडून पॅन व टॅन काढता येतो. कंपनीच्या नावाने बँक खाते उघडता येते. 

स्थापनेनंतर करावयाच्या गोष्टी

  शेतकरी उत्पादक कंपनीची जीएसटी नोंदणी (जर व्यवहार ४० लाखांपेक्षा जास्त किंवा उत्पादन प्रक्रियेशी संबंधित असेल तर) करावी. कृषी विभाग, नाबार्ड, एसएफएसी इ. संस्थेकडून अनुदान / योजना अर्ज करावा. व्यवसाय योजना (बिझनेस प्लॅन) तयार करावा जसे कि  उत्पादन खरेदी, प्रक्रिया, विक्री, मार्केटिंग याविषयी करावा. 

एफपीसी स्थापनेचे फायदे

  शेतकरी उत्पादक कंपनी सदस्यांना मिळणारा नफा डिव्हिडंड स्वरूपात वाटला जातो.कर्ज, अनुदान, प्रशिक्षण, मार्केट लिंकेज यामध्ये सरकारी मदत मिळते. उत्पादन प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून जास्त दरात विक्री करता येते.शेतकरी उत्पादक कंपनीसाठी (एफपीसी) केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक विशेष सहाय्य योजना उपलब्ध आहेत. या योजनांमधून आर्थिक अनुदान, कर्ज, प्रशिक्षण, मार्केटिंग व इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी मदत मिळते.

शेतकरी उत्पादक कंपनीसाठी प्रमुख योजना

१) एसएफएसी (स्मॉल फार्मर्स ऍग्री बिझनेस कॉन्सोर्टियम) केंद्र शासनाकडून इकॉनॉमिक असिस्टन्स स्कीम या अंतर्गत एफपीसीला १५ लाखांपर्यंत मॅचिंग इक्विटी ग्रांट मिळते. क्रेडिट ग्यारंटी फंड स्कीम अंतर्गत कोलॅटरल-फ्री कर्जाची हमी मिळते.याचा उद्देश हा लहान व सीमांत शेतकऱ्यांना एकत्र आणून व्यवसायात मदत करणे हा आहे. अधिक माहितीसाठी कृषी मंत्रालय भारत सरकारच्या sfacindia.com या वेबसाईटला भेट द्यावी. 

२) नाबार्ड सहाय्य योजना अंतर्गत एफपीसी स्थापन व चालवण्यासाठी प्रोत्साहन निधी दिला जातो. प्रशिक्षण, क्षमता विकास, व्यवसाय योजना तयार करणे, इन्फ्रास्ट्रक्चर बांधणे यासाठी आर्थिक मदत केली जाते. ही मदत नाबार्ड प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेन्ट फंड (पीओडीएफ) अंतर्गत केली जाते. 

३) कृषी मंत्रालय – केंद्र शासनामार्फत फॉर्मेशन अँड प्रोमोशन ऑफ १०,००० एफपीओ  स्कीम (२०२०-२५) अंतर्गत देशभर १०,००० FPO स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक एफपीओला ५ वर्षेपर्यंत वार्षिक ₹१८ लाख पर्यंतचे आर्थिक सहाय्य (व्यवस्थापन, पगार, भाडे इत्यादीसाठी) देण्यात येणार असून अतिरिक्त ₹२ कोटीपर्यंत कार्यभांडवल व पायाभूत सुविधा कर्ज मिळणार आहे. 

४) महाराष्ट्र शासनाच्या  योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी उत्पादन संस्था योजना राबविण्यात येते. राज्यातील एफपीसीला नोंदणी शुल्क, प्रशिक्षण व व्यवसाय योजना तयार करण्यासाठी मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. महाराष्ट्र कृषी व्यवसाय विकास प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत मार्केट लिंकेज, प्रोसेसिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग यासाठी अनुदान मिळते. राज्य कृषी विभागाचे क्लस्टर विकास कार्यक्रम अंतर्गत  विशेष पिकांसाठी गट आधारित मदत मिळते. 

५) नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनसीडीसी) तर्फे कृषी प्रक्रिया उद्योग, गोदाम, कोल्ड स्टोरेज, वाहतूक यासाठी कर्ज व अनुदान मिळते.   

६) इतर योजना व मदत स्रोत लक्षात घेता अपेडातर्फे निर्यातक्षम कृषी उत्पादनांसाठी प्रक्रिया, पॅकेजिंग व निर्यात प्रोत्साहन मिळते. एमआयडीएच तर्फे बागायती उत्पादक एफपीसीला पायाभूत सुविधा अनुदान मिळत असून पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड इंटरप्रिंसेस तर्फे  एफपीसीला ३५ टक्के पर्यंत कॅपिटल सबसिडी मिळते. 

काही यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या

१) नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना २०१० मध्ये झाली असून एकात्मिक फळे व भाज्या मूल्य साखळी प्रणाली: ताज्या आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज कॉम्प्लेक्स, सॅप बेस्ड ट्रेसीबिलिटी प्रणाली यांसह संपूर्ण व्हॅल्यू चेन विकसित केली आहे. या कंपनीत ३०,००० हून अधिक शेतकरी सदस्य असून सुमारे ३०,००० एकर क्षेत्र आहे. यात विविध फळभाजी उत्पादन (द्राक्ष, टोमॅटो, इ.) यावर आधारित उत्पादन प्रणाली विकसित केली असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची उलाढाल १५३० कोटींपर्यंत वाढली आहे. भारतातील ही अग्रगण्य एफपीसी म्हणून ओळखली जाते. 

२) बुलढाणा येथील जय सरदार फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच त्यांनी कामगिरीने खास स्थान प्राप्त केले.त्यांनी मार्केट बेस्ड इन्स्ट्रुमेंट्सचा उपयोग करून मूल्य जोखीम (price risk) हाताळण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू केले. तसेच कंपनीची सदस्यसंख्याही वाढवली. भविष्यात नाबार्डकडून २००० चौ फूट गोदाम बांधण्यासाठी मदत मिळवली. 

३)पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धांगरवाडी येथील कृषिजीवन ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असून महाराष्ट्रातील पहिली अशी  एफपीओ जी  पीपीपी (पब्लिक–प्रायव्हेट- पार्टनरशिप) मॉडेलवर कार्य करते. हे मॉडेल सरकार, खाजगी संस्थांसह कार्य करून विकास करत आहे. 

४) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील सावित्रीबाई फुले फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना ६ मे २०१६ रोजी झाली असून युवा मित्र संस्थेच्या पुढाकाराने नाबार्डच्या आर्थिक साहाय्याने ही एफपीसी सुरू करण्यात आली. महिलांना शेळीपालनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सबल करणे हा या एफपीसीचा उद्देश आहे. या कंपनीत २,००० महिला सदस्य आणि ६८८ भागधारक असून १५,००० शेळ्या आहेत, ज्यामध्ये मुख्यतः उस्मानाबादी आणि संगमनेरी जातींचा समावेश आहे. शेळ्यांचे दूध व अन्य उत्पादनांची विक्री ब्रँड “सावि”अंतर्गत विकली जातात 

       याव्यतिरिक्त वनश्री फार्मर्स प्रोड्युसर कं.(नंदुरबार), ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कं.(अहिल्यानगर), कृषी नवकल्पना फार्मर प्रोड्युसर कं. (जुन्नर, पुणे), इगतपुरी तालुका फार्मर्स  प्रोड्युसर कं.(इगतपुरी), पुरंदर हायलँड्स फार्मर प्रोड्युसर कं (पुरंदर, पुणे), विरांगणा महिला शेतकरी उत्पादक कंपनी (मालेगाव), वनराज फार्मर प्रोड्युसर कं (पेठ,नाशिक), कृषक स्वराज स्पाईसेस शेतकरी उत्पादक कंपनी लि.(चंद्रपूर), आदर्श ऍग्री फार्मर प्रोड्युसर कं (शिरूर,पुणे) या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत १५ महिला एफपीसी स्थापन केल्या आहेत. 

   महाराष्ट्रातील या प्रातिनिधिक शेतकरी उत्पादक  कंपन्या कशा स्वरूपात काम करतात, त्यांची उद्दिष्टे कशी साध्य करतात आणि शेतकरी सदस्यांसाठी कशा लाभदायक ठरतात हे स्पष्ट करतात. जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हे संघटन होऊन शेतकरी सक्षम होऊ शकतो याचा मला विश्वास वाटतो.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...