name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): अलग
अलग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अलग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

लहान सहान तक्रार...( Small complaint )

लहान सहान तक्रार...
Small complaint


Small complaint


लहान सहान तक्रार 

करत नाही मी कधी,

ही माझी गाेष्ट अनाेखी 

इतरांपेक्षा अलग साधी...

लहान सहान तक्रार 

जीवनात खूप माेठी हाेते,

तक्रारींचा पाढा वाचण्याची 

सवय बनून राहते...

लहान सहान तक्रार 

करा जागेवरच निपटारा,

त्यानेच उघडेल जीवनात 

आनंदी जीवनाचा पेटारा...

लहान सहान तक्रार 

हिरावते स्थिर आयुष्य,

हेलकावे खात बसताे 

जीवनात हा मनुष्य...

© दीपक अहिरे, नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...