name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): With darkness as a companion
With darkness as a companion लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
With darkness as a companion लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अंधार साेबतीला घेऊन (With darkness as a companion)

अंधार सोबतीला घेऊन...
With darkness as a companion

Andhar sobtila gheun


अंधार सोबतीला घेऊन 
करावी जगण्याची वाटचाल, 
तेव्हा कुठे आपण मार्ग शोधू
बदलेल हा जीवनाचा काळ...

अंधार सोबतीला घेऊन 
जगण्याचा मार्ग आपण शोधावा, 
तेव्हा कुठे सापडेल आपल्याला 
मार्गदर्शक चमकणारा काजवा... 

अंधार सोबतीला घेऊन 
येथपर्यंत मजल मारली, 
अजून गाठायचं आहे ध्येय 
आसमान आहे सात मजली... 

अंधार सोबतीला घेऊन 
जमिनीत माझे बीज अंकुरले, 
आता घट्ट गाडतोय मुळे
रोपट्याचा जणू वृक्ष जाहले... 

@ दीपक अहिरे, 
नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...