name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): on my mind today
on my mind today लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
on my mind today लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझ्या मनात आज...(on my mind today)

माझ्या मनात आज 
on my mind today

Mazya manat aaj

माझ्या मनात आज 
विचाराचं काहूर उठलं,
असं कसं वादळ
अचानकच घडून आलं...

माझ्या मनात आज 
काळजीचं सावट उमटलं,
कधी नाही ते एवढं
पोटात धस्स झालं...

माझ्या मनात आज 
अनेक विचारांची पेरण, 
उगवतील चांगले विचार 
हेच माझं खरं धन...

माझ्या मनात आज 
विचार फिरतात दाही दिशा,  
मनाचे करतो मी व्यायाम
विचारच फिरवतील दशा... 

©दीपक केदू अहिरे, नाशिक 



मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...