name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): डोळ्यांचा कोरडेपणा
डोळ्यांचा कोरडेपणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डोळ्यांचा कोरडेपणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डोळ्यांचा कोरडेपणा (Dry Eye Disease)

 डोळ्यांचा कोरडेपणा 

(Dry Eye Disease)

 डोळे,अश्रू किंवा डोळ्यातील पाणी  हे नेहमीच सुंदरता किंवा कवि कल्पना व शायरीचे विषय समजले जातात. व त्यामुळेच डोळ्यांचा कोरडेपणा ही समस्या किंवा त्याचे निदानही फारसे कोणी करून घेत नाही तर डोळे, अश्रू व डोळ्यांचा ओलावा या नेहमीच रोमँटिक गोष्टी नसून ६० ते ७० टक्के लोकसंख्येत कोरड्या डोळ्यांची समस्या आता वेगवेगळ्या प्रमाणात आढळते. कोरडे डोळे तुमच्या रोजच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर किंवा आनंदावर परिणाम करू शकते व हा त्रास दिर्घकाळ राहू शकतो. 

Dry Eye Disease
अश्रू तयार करण्यास सहभागी संरचना 


माझ्या ओपीडीत येणाऱ्या रुग्णात ३० ते ४० टक्के रुग्ण हे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यात कचरा गेल्यासारखे वाटणे, खाज येणे, लालसरपणा, थकवा, अचानक खूप पाणी येणे, दृष्टी कमी जास्त होणे ज्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो तर काही जण काम थांबवतात. डोळ्यांवर गार पाण्याचा शिपका मारतात किंवा चक्क डोळे बंद करून बसतात. बऱ्याच वेळा हे त्रास दुर्लक्षिले जातात. किंवा काही जण सहज मिळतील असे औषधाचे थेंब टाकतात. 

डोळयांचा कोरडेपणा हा अनेक गोष्टीमुळे होऊ शकतो. डोळ्यांच्या नैसर्गिक अवस्थेतील बदल किंवा काही डोळ्यांच्या आजारामुळे ४०-५० वर्षावरील व्यक्ती, सहसा मेनोपॉजड स्रिया, कोरडे किंवा उष्ण वातावरण, वारा, ऊन, प्रदूषण या पर्यावरणीय गोष्टी  तसेच एअर कंडिशनची थंड व कोरडी हवा, स्क्रीन टाइम, काही शारीरिक आजार जसे संधिवात, थायोरॉईड ग्रंथीचा आजार, मधुमेह किंवा हार्मोनल बदल किंवा आजार, ऑटो इम्यून आजार, व काही प्रकारच्या औषधांचा साईड इफेक्ट या सर्वसामान्य गोष्टीमुळे कोरडेपणा ही समस्या उद्भवते. 
 
कोरड्या डोळ्यांचा आजार हा डोळ्यांच्या बाह्य किंवा पृष्ठभागाचा रोग आहे. ज्यामुळे डोळ्यांचे अश्रू कमी तयार होतात. किंवा ते बाष्पीभवनाने लवकर सुकतात. यामुळे अश्रूंचा ओलावा कमी होऊन डोळ्याचा नैसर्गिक तोल बिघडतो. व डोळ्यांना चुरचुरते. डोळ्यांचा कोरडेपणा समजून घेण्यासाठी अश्रूंची माहिती घेणे किंवा डोळ्यांचा ओलावा जाणून घेणे आवश्यक आहे. डोळ्यातील पाण्याचा किंवा अश्रूंचा थर हा डोळ्यावर कायम समतल ओलावा ठेवतो. अश्रूच्या ओलाव्याचे तीन थर असतात. सर्वात वर तैलकट थर, मधला जलीय किंवा पाण्याचा थर जो ओलाव्याचा ९५ टक्के भाग असतो. व सर्वात तळाशी असतो तो म्युसिन किंवा निसरडा थर. 

दोन मुख्य प्रकारचा डोळ्यांचा कोरडेपणा असतो. एकात कमी अश्रू तयार होतात व  दुसऱ्या प्रकारात अश्रुंचे बाष्पीभवन लवकर होते ह्यामुळे हा दुसऱ्या प्रकारचा कोरडेपणा जो अश्रुंचे लवकर बाष्पीभवन झाल्यामुळे ज्यात सर्वात वरचा तेलकट लिपिड द्रव्याचा थर कमी झाल्या कारणामुळे अश्रुंचे बाष्पीभवन लवकर होते व कोरडेपणाचे ठिपके बुब्बुळावर तयार होतात. एकंदरीत हा तेलकट थर अश्रूंचा सरंक्षित थरच असतो. डोळ्यांच्या कोरडेपणात डोळ्यातील अश्रूंचा थर व पृष्टभागावर बदल होतो. व त्यामुळे डोळ्यांची जळजळ व दृष्टी अस्पष्ट होते. 
आजच्या युगात असे आढळून येते कि मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप खुप लोक वापरतात. व जी एक जीवनावश्यक गोष्ट आपल्याला स्वीकारावीच लागेल. बऱ्याच वेळा कामाचा भाग किंवा सोशल मीडियावरच्या टाईमपासमुळे स्क्रिनचा वापर खूपच वाढला आहे. स्क्रीन वापरतांना आपण त्यात इतके एकाग्र होतो कि डोळ्यांची उघडझाप कमी व्हायला लागते. किंवा अर्धवट होते. खूप वेळ डोळे उघडे राहिल्यामुळे अश्रूंचा सरंक्षित तेलकट थर अस्थिर होतो. या प्रकारच्या कोरड्या डोळ्यांवर सर्वसामान्य  टीअर सप्लिमेंट्स किंवा डोळ्यांचा ओलावा वाढवणारे ड्रॉप्स वापरून त्रास कमी करता येतो. 
२०-२०-२० चा नियम- दिवसभर स्क्रिन वापरणाऱ्या लोकांसाठी हा नियम कोरडेपणा टाळण्यासाठी खूप उपयोगाचा आहे. यात दर २० मिनिट स्क्रिनवर काम केल्यावर २० सेकंदासाठी २० फूट दूरवर दृष्टी फिरवायची ज्यामुळे डोळ्यांचा ताण पण कमी होतो. काम करताना डोळ्यांची पूर्ण उघडझाप ही मिनिटात ३०-४० वेळा जाणीवपूर्वक करावी. स्क्रिन हा डोळ्यांच्या लेव्हलच्या खाली असावा. ज्यामुळे डोळे पूर्ण उघडावे लागत नाहीत. स्क्रिन उंचावर असल्यास डोळे पूर्ण उघडावे लागतात. त्यामुळे ते लवकर कोरडे पडतात. एअरकंडीशनर किंवा पंख्याचा झोत चेहऱ्यावर येऊ नये याची काळजीपण घेणे आवश्यक असते. 
डोळ्यांच्या वरच्या व खालच्या पापण्यात जवळपास एकूण ८० ते १०० मेबोमियन ग्रंथी असतात. ज्या तेलकट सरंक्षित स्त्राव पापण्यांच्या कडेवर सोडतात या डोळे ओले ठेवण्याचे खूप महत्त्वाचे कार्य करतात. या ग्रंथीवर डोळ्यांचा ताण पडल्याने किंवा ग्रंथीवर सूज येऊन त्यांचे कार्य बिघडू शकते. त्यासाठी डोळ्यांना गरम शेक,  मसाज, काही एन्टीबायोटीक्स वापरून या ग्रंथीचे कार्य नियमित करता येऊ शकते. 

कोरड्या डोळ्यांचा उपचार हा वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. उपचार हे कोरडेपणा कधीपासून आहे त्याची तीव्रता व कोणत्या कारणामुळे कोरडेपणा आला, वय, शारीरिक आजार, जीवनशैली, आहार इ. यासारख्या अनेक बदलांवर अवलंबून असतात. आता प्रगत तंत्रज्ञानाने कोरडेपणचे निदान, अश्रूंच्या तीन थरांचा कॉम्पुटर तपशील किंवा एनालिसिस व उपचार हे शक्य झाल्यामुळे  या त्रासांपासून सुटका होणे शक्य झालेय. फक्त मोजक्या नेत्र रुग्णालयात किंवा फक्त काही नेत्र रोग तज्ज्ञ हे उपचार करतात कारण ही कॉम्पुटर टेकनॉलॉजी खर्चिक असल्यामुळे I R P L ( intense requalated pulsed light) या नवीन उपचार पद्धतीत विशिष्ट लाईट लहरींनी डोळ्याच्या पापण्यातील मेबोबियन  ग्रंथीचा आजार नाहीसा करून त्यांची कार्यक्षमता वाढवता येते. ज्यामुळे बाष्पीभवन जास्त झाल्याने (अश्रूंचा सर्वात वरचा संरक्षित तेलकट थर) कमी झाल्याने होणारा कोरडेपणा काही तासातच कमी करता येतो. या उपचारात काही मिनिटातच कोणताही त्रास न होता रुग्णास डोळ्यांचा कोरडेपणा नियंत्रीत करता येतो. (पारंपरिक पद्धतीत खूप महिने डोळ्यांना शेक, औषध, मसाज खूप काळ किंवा महिने करावा लागतो) 
डोळ्यांच्या कोरडेपणा घालविण्याचे 
घरगुती उपाय : 
१) उन्हात व वाऱ्यात जातांना डोळा साईडने झाकणारे गॉगल्स वापरावे. 
२) डोळ्यांचा ओलावा वाढविणारे आर्टीफिसिएल टियर ड्रॉप्स वापरावे. 
३) डोळ्यांची उघडझाप आठवणीने करावी. 
४) २० मिनिटांनी स्क्रिन वरून २० सेकंद लांबवर/दूरवर बघा.
५) भरपूर पाणी प्या 
६) ओमेगा ३ फॅटी ऍसिड- अक्रोड, जवस जेवणात घ्या. 
७) डोळ्यांना सकाळ, संध्याकाळी गरम शेक द्या व पापण्यांचा मसाज करा. 
८) व्हिटॅमिन ए, बी व डी चे सेवन करा. 
९) नियमित योगासनांनी डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. 
१०) स्क्रिनचा अतिवापर टाळा.

डॉ. शरद पाटील (मेडिकल डायरेक्टर)
सुशील आय केअर, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे केंद्र, नाशिक

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...