name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): निरर्थक
निरर्थक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निरर्थक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

स्वप्नांचा पाठलाग (Chasing dreams)

स्वप्नांचा पाठलाग...
Chasing dreams

Chasing dreams

स्वप्नांचा पाठलाग 
करा जीव तोडून, 
कल्पनाशक्तीत रमा,
सचित्र उभे करून... 

स्वप्नांचा पाठलाग 
त्याला कष्टाची जाेड, 
वास्तवात जगा,
नाही त्याला ताेड... 

स्वप्नांचा पाठलाग 
स्वप्न भंगते कधी, 
लागू नका तुम्ही, 
निरर्थक वादी...

स्वप्नांचा पाठलाग 
चिकाटी हवी, 
स्वप्न पाहा नेहमी, 
नाविन्याची नवी... 

© दीपक अहिरे,नाशिक

ओझे...(Burden)

ओझे 
Burden

Ojhe

ओझे जन्माजन्माचे, 
वाहून ते न्यायचे, 
अधिक ते जमा करायचे,
निरपेक्षपणे वाहायचे...

ओझे अपेक्षेचे
स्नेहाने वागवायचे, 
जनमाणसात मिरवायचे 
डोक्यावर ते घ्यायचे...

ओझे निरर्थक प्रश्नाचे 
उत्तरे ते सोडवायचे, 
कोड्यात मग पाडायचे 
निर्विकार बघत राहायचे...

ओझे समाजमनाचे
वागवत असे राहायचे, 
आयुष्यभर ओझ्याखाली
दबून असे राहायचे...


© दीपक अहिरे, 
नाशिक 

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...