मी रुग्णवाहिका
I Ambulance
मी रुग्णवाहिका
काळजी असते रूग्णांची,
अपेक्षित रूग्णालयात
घाई करते पाेहचवण्याची...
मी रुग्णवाहिका
चाेवीस तास सदा सेवेसाठी,
मी ओळखली जाते
नियाेजनात्मक तत्परतेसाठी...
मी रुग्णवाहिका
सायरन हीच ओळख माझी,
मला पाहताच द्या वाट
काळजी वाहते मी सर्वांची...
मी रुग्णवाहिका
जीवदान देणं माझं काम,
वापरा माझं माध्यम
अखंड सेवेसाठीच माझं नाम...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment