name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Progressive farmer
Progressive farmer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Progressive farmer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जनार्दन अडसूळ : बीजोत्पादनात विक्रमी यश मिळवणारे प्रगतिशील शेतकरी (Janardan Adsul: Progressive farmer who achieved record success in seed production)



जनार्दन अडसूळ : बीजोत्पादनात विक्रमी यश मिळवणारे प्रगतिशील शेतकरी
 Janardan Adsul: Progressive farmer who achieved record success in seed production

Janardhan adsul : bijopadnat vikrami yash

    

    सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव या गावात राहणारे श्री. जनार्दन संतराम अडसूळ हे नाव आज ग्रामीण भागात शेतीत नावीन्य आणणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक आहे. 

     त्यांच्या १२ एकर शेतीत त्यांनी पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा दृष्टिकोन स्वीकारला आहे. सातत्य, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांनी शेतीत यशस्वी प्रयोग केले आहेत.


🌾 बीजोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

   जनार्दन अडसूळ यांनी सोयाबीन आणि गहू बीजोत्पादन या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. फलटण तालुक्यात बीजोत्पादनासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. २०२२-२३ या वर्षी त्यांनी महाबीज सोयाबीन पीक स्पर्धेत भाग घेतला. 

     सोयाबीनच्या ‘किमया’ या जातीचे एकरी २४ क्विंटल उत्पादन घेऊन त्यांनी विक्रमी कामगिरी केली आणि स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही कामगिरी केवळ त्यांच्या मेहनतीचे फळ नाही, तर योग्य जमिनीचे आराखडे, सिंचन व्यवस्थापन, आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती केल्याचा परिणाम आहे.

Janardan adsul : bijopadnat vikrami yash

🌾 गहू बीजोत्पादनात विक्रमी यश

   सोयाबीननंतर त्यांनी गहू पिकातही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी खपली गव्हाचा सीड प्लॉट घेतला आणि एकरी २० क्विंटल उत्पादन मिळवले. हे बियाणे त्यांनी ₹१०० प्रति किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध केले, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही गुणवत्तापूर्ण बियाणे मिळाले आणि त्यांचा आर्थिक लाभ झाला.  

     राज्य गहू पीक स्पर्धेत त्यांनी एकरी २७.२ क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे ते राज्यातील सर्वोत्तम गहू उत्पादक शेतकऱ्यांपैकी एक ठरले. 


🐄 दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाला उत्पादन

   बीजोत्पादनाशिवाय जनार्दन अडसूळ यांनी दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाला उत्पादन यांच्याकडेही लक्ष दिले आहे. यामुळे शेतीतील उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण झाले आहेत.  

      शेतीतून मिळणारे अवशेष ते दुधाळ जनावरांच्या आहारासाठी वापरतात आणि त्या शेणखतातून सेंद्रिय खताची निर्मिती करून शेती अधिक सुपीक बनवतात. अशा प्रकारे शेती आणि दुग्ध व्यवसायाचा संगम घडवून त्यांनी "शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे" हा आदर्श मार्ग दाखवला आहे.


🚜 इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

    श्री. अडसूळ केवळ स्वतःच प्रगत नाहीत, तर इतर शेतकऱ्यांनाही प्रगतीकडे नेण्याचे काम ते करत आहेत. ते ग्राम बीजोत्पादन गटाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी आज बीजोत्पादन आणि उच्च उत्पादनाच्या क्षेत्रात काम करत आहेत. ते शिवार फेऱ्या, अभ्यास दौरे, कृषी पर्यटन अशा उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना नवे ज्ञान देतात आणि शेतीबद्दल सकारात्मक दृष्टी निर्माण करतात.


🏆 राज्यस्तरीय सन्मान आणि पुरस्कार

    त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्यांना "वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१८" प्रदान करण्यात आला आहे. तसेच "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार" यांचेही  ते मानकरी ठरले आहेत. हे पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, प्रयोगशील वृत्तीचे आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत.


🌻 आधुनिक शेतीचा आदर्श

  जनार्दन अडसूळ यांनी दाखवून दिले आहे की शेती केवळ उपजीविकेचे साधन नसून ती एक यशस्वी व्यवसायाची संधी आहे. त्यांनी वैज्ञानिक शेती, योग्य नियोजन, आणि नवकल्पनांच्या साहाय्याने केवळ उत्पादन वाढवले नाही, तर ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी उदाहरण दिले.


💬 निष्कर्ष

  आजच्या यांत्रिकीकरणाच्या आणि हवामान बदलाच्या काळात जनार्दन अडसूळ यांची कार्यपद्धती सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या शेतीतून एकच संदेश मिळतो-- "शेतीत यश मिळवायचं असेल, तर मेहनतीसोबत नियोजन, नवकल्पना आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत."

  अशा प्रेरणादायी शेतकऱ्यामुळेच महाराष्ट्राची माती अधिक सुपीक, सक्षम आणि समृद्ध होत आहे. 🌾


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा | Progressive Farmer Mahendra Singh Pardeshi Success Story

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा | Progressive Farmer Mahendra Singh Pardeshi Success Story

Pragatshil shetkari mahendrasingh pardeshi yanchi yashogatha
पिंपळनारे(वडनेरभैरव) येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग परदेशी यांची पपई फळबाग 

 चांदवड तालुक्यातील पिंपळनारे येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी या शेतकऱ्याने एक एकर पपईची लागवड केली आहे. पिंपळनारे येथील हे शेतकरी अत्यंत कष्टाळू व आधुनिकतेची कास बाळगलेले शेतकरी म्हणून अवघ्या नाशिक जिल्ह्यात विशेषत: चांदवड, निफाड, दिंडोरी या तीन तालुक्यात तर नक्कीच परिचित आहेत. 


        पूर्वी पिंपळनारे हे नागवेलीच्या पानासाठी अतिशय प्रसिद्ध गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव म्हणजे चांदवड तालुक्यातले काश्मीर म्हणूनही या भागाची पूर्वपार ओळख आहे. याच पिंपळणारे गावातील श्री महेंद्रसिंग परदेशी यांनी द्राक्ष, टोमॅटो शेतीबरोबरच नगदी पीक म्हणून पपई या पिकाची लागवड केली.

       

     पपई या पिकाबाबत फारशी माहिती नव्हती. परंतु लागवडीचा त्यांनी निर्धार केला. नर्सरीतून साधारणत: १० रुपये नगाने "नंबर १५" या पपई पिकाचे हजार रोपे  विकत आणून शेतात लागवड केली. ही लागवड करताना आठ बाय सहा फूट हे अंतर त्यांनी ठेवले ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल नळी टाकून ठिबक सिंचनावरच ही पपईची शेती सुरू केली. पपई रोपे लावल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांच्याकडे पपई उत्पादन सुरू झाले.

        

     पपईचा माल तयार झाल्यानंतर अनेक व्यापारी शेतात येऊन गेले. श्री.परदेशी यांनी स्थानिक मार्केटला   १० रुपयांपासून ते ३५ रुपये किलोपर्यंत पपई विक्री केली आहे. नाशिक मार्केटमध्ये सुद्धा त्यांनी पपईची विक्री केली. साधारणत: एक एकर क्षेत्रात १००० झाडे त्यांनी लावली. संपूर्ण खर्च त्यांचा हा लागवडीपासून मशागत, पावडर यावर सुमारे पन्नास हजार रुपयांच्या आत आलेला आहे तर श्री. परदेशी यांना सरासरी २५ रु. किलो बाजारभावाने एक झाड १०० किलोच्या आसपास बसते यानुसार त्यांना सुमारे साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पादन एक एकरातून मिळालेले आहे.  एक वर्षाची बाग झालेली आहे अजून सहा महिने ही बाग चालेल असे श्री.परदेशी म्हणणं आहे. 

       

   पहिल्यापासूनच परदेशी परिवार हा चिकाटीने शेती करणार असल्याकारणाने या पपई फळबाग शेतीत सुद्धा त्यांना चांगले आर्थिक उत्पादन मिळालेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार द्राक्षबागा आणि टोमॅटो या शेतीमध्ये जितके पैसे होतात. तितकेच पैसे कमी श्रमामध्ये त्या मानाने पपई  शेतीत होत आहे.


     पपईचा किलोचा भाव हा १० रुपयांच्या वरती असला तर आपल्याला काढणी, पॅकिंग आणि मार्केट वाहतूक  परवडते. जेव्हा १० रुपयांच्या आत बाजारभाव आला तेव्हा मी मार्केटमध्ये माल न नेता तो खुडून टाकला. जेव्हा चांगला भाव आला तेव्हा मी मार्केटमध्ये माल घेऊन जायला लागलो असल्याचे श्री.परदेशी म्हणतात. आता मात्र भाव चांगले आहे. सरासरी १० रु. ते जास्तीत जास्त ३५ रुपये किलोपर्यंत मला बाजारभाव मिळाला असल्याचे श्री. परदेशी यांनी स्पष्ट केले. मशागतीच्या बाबतीत द्राक्षबाग आणि टोमॅटोची शेती पेक्षा पपई शेतीला कमी श्रम लागतात.तुलनेने कमी श्रमात तितकेच पैसे या प्लॉटने मला दिलेले असल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. 


     वडनेरभैरव  परिसरात आता द्राक्ष व टोमॅटो या पिकाबरोबरच अनेक तरुण शेतकरी हे डाळिंब, पेरू आणि पपई पिकाकडे वळलेले आहे ही स्थित्यंतराची पहिली पायरी मानली जाते. कारण वडनेरभैरव सह परिसरातील गावे ही द्राक्ष बागांसाठी व टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जगाच्या अनेक देशात इथली द्राक्ष व टोमॅटो त्याचबरोबर कांदा निर्यात केला जातो. सध्या तरी पपई या पिकाला देशांतर्गतच मार्केट बाजारभाव मिळाल्याने निर्यातीबाबत तसा विचार केला नसल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. 

Pragatshil shetkari mahendrasingh pardeshi yanchi yashogatha
पिंपळनारे (वडनेर भैरव) येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांच्या पपई फळबाग भेटी प्रसंगी श्री. नितीन माळी, श्री.संतोष पवार, श्री.सुरेश सलादे व श्री. मिस्तरी

श्री. नितीन दौलतबाबा माळी यांचे मनोगत

  मी फळे व भाजीपाला वाहतूक करणारा शेतकरी असून श्री. परदेशी परिवार हा शेतीनिष्ठ परिवार असून नवीन प्रयोग शेतीमध्ये करणाऱ्यांपैकी ते एक आहेत 

    श्री. महेंद्रसिंग परदेशी यांनी पपई फळबाग उभी केली त्याचा त्यांना नक्कीच चांगला आर्थिक लाभ देखील झालेला आहे. द्राक्षशेती ही आता भूषणावह शेती म्हणून प्रसिद्ध आहे. 

श्री. संतोष आबा पवार यांचे मनोगत

   आज महेंद्रसिंग परदेशी यांच्या पपई फळबागेला भेट दिली. झाडांची उत्पादनक्षमता आणि मिळालेला भाव यामुळे त्यांना त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. तरुण शेतकरी हे आता विविध व्यापारी तत्त्वावर फळबागांकडे वळत आहे. नक्कीच हा बदल शेती मधला सकारात्मक बदल म्हणता येईल. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दोन पैसे शेतकऱ्याच्या हातात मिळण्यास नक्कीच पपई फळबाग उपयोगी पडेल असे जाणवले. 


     पपई फळबाग उत्पादक श्री. महेंद्रसिंग परदेशी पिंपळनारे, वडनेरभैरव परिसरात आमच्याकडे द्राक्षबाग व टोमॅटो आणि कांदे यासारखे नगदी पिकं आम्ही घेत असतो एक प्रयोग म्हणून एक एकर शेतात पपई या फळबागेची लागवड केली. फारसा अनुभव त्यात नव्हता परंतु असे जाणवत आहे की द्राक्ष, टोमॅटो या बागेपेक्षा कमी मेहनतीत योग्य बाजारभाव मिळाला तर नक्कीच या पिकाला चांगले दिवस आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

उपक्रमशील संशोधक शेतकरी : श्री. गणू दादा चौधरी—नवकल्पना आणि प्रगत शेतीचे आदर्श उदाहरण | Enterprising Researcher Farmer: Shri. Ganu Dada Chaudhary

उपक्रमशील संशोधक शेतकरी : श्री. गणू दादा चौधरी — नवकल्पना आणि प्रगत शेतीचे आदर्श उदाहरण | Enterprising Researcher Farmer: Shri. Ganu Dada Chaudhary


upkramshil sansodhak shetkari : shri ganu dada choudhari

    धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील श्री. रमाकांत काशिनाथ बागूल उर्फ गणूदादा चौधरी हे संशोधक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन  हेक्टर जमीन असून त्यात ते नारळ, मका, टरबूज,  कोथंबीर अशी पिके घेतात. शेतीसाठी त्यांच्याकडे आज ट्रॕक्टर व अनुषंगिक यंत्रसामग्री नांगर, रोटाव्हेटर, ट्रिलर, टँकर, ट्रॉली आहे.

upkramshil sansodhak shetkari : shri ganu dada choudhari

संशोधक, उद्योगी वृत्ती

       
    श्री. गणू दादा यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. शिक्षण घेत असताना काही अपवादात्मक परिस्थितीमुळे आयटीआय शिक्षण अर्ध्यावरच सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी कंपनीमध्ये जॉब शोधला. आयुष्यामध्ये स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला 

    पण मुळातच संशोधक, उद्योगी वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या उद्योगी वृत्तीमुळे आपण स्वतःचा विकास करत नसून आपण धनदांडग्या व्यवस्थेला पोसत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आणि त्यांनी नोकरी सोडली मग वडिलोपार्जित शेती हा चांगला पर्याय त्यांनी अवलंबला. अर्थातच त्यांचे वडील शेतकरी असल्यामुळे शेतीचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले.

शेतीला जोडधंदा ट्रॅक्टर व्यवसाय केला सुरू

      आपल्या प्रयोगशील वृत्तीने शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करावे या ध्येयाने प्रेरित होऊन नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्याकरीता सोपा नव्हता असे श्री. गणू दादा यांनी सांगितले कारण शेतमालाला अस्थिर बाजारपेठ व्यापारी वर्गाचे पिळवणूकीचे ध्येयधोरण, अवकाळी पावसाचा मार व उत्पादन वाढीव खर्च या सर्व गोष्टी बघता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल याचा साक्षात्कार त्यांना झाला. 

    मुळातच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा स्वभावगुण असल्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग चालू केले. पण अनेकवेळा नफा अपेक्षित असून तोटाच झाला. मग शेतीला जोडधंदा असावा हे लक्षात आले मग त्यासाठी ट्रॅक्टर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.  ट्रॅक्टर व्यवसाय करत असताना नाविन्यपूर्ण अशा यंत्रसामग्रीचा शोधही लावला. त्यासाठी स्वत:च्या छोटेखानी वर्कशॉपची स्थापना केली.  या माध्यमातून विवीध नाविन्यपूर्ण शेतीपूरक यंत्राची निर्मीती केली.

Upkramshil sansodhak shetkari : shri Ganu dada choudhari

यंत्रसामग्री निर्मिती केली

   श्री. गणू दादा यांनी स्वनिर्मित यंत्रसामग्री निर्मिती केली असून यात कांदावाफा खाचेयंत्र,  वाफाशेरी यंत्र, राईट अँगल शेरी यंत्र, विवीध बेड रेझर, सॉइल रेझर, पारंपारिक पध्दतीवर आधारीत बैलजोडी पास(वखरणी, डवरणीसाठी), वाफायंत्र, ऊस पेरणीयंत्र, टोचन यंत्र, शेतातील खतटाकणी लहान ट्रॕक्टर  बकेट, अल्पखर्ची पिस्टन फवारणी अशा विवीध प्रकारच्या ट्रॕक्टरचलीत यंत्रसामग्रीची त्यांनी निर्मिती केली.

फळपिकांची लागवड

   यंत्रसामग्री निर्मितीबरोबर शेतीमध्ये डाळिंब, लिंबू अशा वेगवेगळ्या फळपिकांची लागवड करून आधुनिक असे शोधही लावले, प्रयोगही केले. तेल्यामुक्त डाळिंबाची संकल्पना त्यांनी आपल्या शेतात राबवली आणि त्यांची बाग तेल्यामुक्त होती हे विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे
      या नंतर श्री. गणू दादा यांनी मजूरमुक्त शेतीच्या माध्यमातून सलग सेंद्रिय नारळबागेची संकल्पना उदयास आणली. सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे ठरवले जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी मी शाश्वत शेती त्याला वारसाने देऊ शकतो असे गणू दादा यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांना धुळे येथील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची फार मोलाची मदत झाली.  तेथील विविध कार्यशाळा प्रशिक्षण शिबिरं यांना त्यांनी हजेरी लावली. त्यातून मोलाचे ज्ञान मिळाले आणि त्या ज्ञानाचा फायदा त्यांनी स्वतः साठी तसेच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केला. या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली. शाळा, महाविद्यालय येथे व्याख्यानासाठी, चर्चासाठी आमंत्रण येऊ लागले.  शाश्वत शेतीचा प्रचार त्यांनी सुरू केला.

Upkramshil sansodhak shetkari : shri Ganu dada choudhari

विविध शेती उपक्रमांची सुरुवात

  सर्व काही सरकारने करावे या अपेक्षेवर अवलंबून न राहता त्यांनी शेतामध्ये "पाणी आडवा पाणी जिरवा" या माध्यमातून दहा ते बारा लाख लिटर पाणी क्षमतेचा कोल्हापूर टाईप बंधाऱ्याची निर्मिती केली व इतर शेतकऱ्यांना हा संदेश दिला की आपण स्वतःही काही करू शकतो प्रत्येक वेळेस सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
    
    त्यांच्या विविध प्रयोगांना मग ते सेंद्रिय असो किंवा यांत्रिकी असो कृषी विभाग धुळे, कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी त्यांच्या प्रयोगास वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन केले. कृषी विभागाशी समन्वय साधून आज त्यांची सेंद्रिय शेतीशी व आधुनिक यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी नाळ जोडली आहे.

मजूरमुक्त शेती संकल्पना

    आजकाल शेतीला मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. मजूर टंचाईवर प्रभावी उपाययोजना करावी यादृष्टीने श्री. गणू दादा यांनी शेती १०० टक्के यांत्रिकीकरणाखाली कशा पध्दतीने येऊ शकते यासाठी मजूरमुक्त शेती संकल्पनेच्या माध्यमातून यांत्रिकीकरणावर भर दिला.
 
    टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना स्विकारली. यात मानवचलीत खतटाकणी यंत्र , लिंबू तोडणी यंत्र, विविध प्रकारे बेड मेकर यंत्र ,फळबागेसाठी सॉईल रेझर, कांदावाफा  खाचेयंत्र, वाफाशेरी यंत्र, हातकोळपे, विद्राव्य खतासाठी अतिशय स्वस्त ठिबक, व्हेंचूरी राईट टू अँगल शेरी सपोर्ट सिस्टिम नैसर्गिक संसाधन वापरून ऑर्गेनीक चूल अशा अनेक प्रयोगांची व यंत्रांची मालिका त्यांनी सादर करून निर्मिती केली आहे.

सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार

    सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा. या माध्यमातून ते स्वतः सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरीच बनवितात तसेच इतरही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे  मार्गदर्शन करतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे ज्ञान अवगत व्हावे यासाठीही गणू दादा यांनी शालेय आवारातील कचरा व शालेय पोषण आहारातील उष्टे व खरकटे अन्न यावर प्रक्रिया करून गांडूळ खत निर्मिती व्हावी यासाठी  स्वखर्चाने शालेय आवारात गांडूळ खत निर्मितीचा उपक्रम राबवितात. 

    विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व अवगत व्हावे या अनुषंगाने सेंद्रिय व शाश्वत शेतीचे मोलाचे मार्गदर्शनही ते करतात. यासंदर्भात त्यांचा मंत्रालयाशीही पत्रव्यवहार चालू आहे जेणेकरून ह्या प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय आवारात एक कोपरा सेंद्रिय  निविष्ठांचा किंवा "गणुदादांचा शालेय सेंद्रिय उपक्रम" राबवावा यासाठी त्यांचे प्रयत्न शासनदरबारीही चालू आहेत. विविध मोठ्या संस्थांमध्येही सेंद्रिय निविष्ठांचा वापर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात करावा यासाठी ते प्रयत्न करतात. शासनाच्या विवीध विभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांना या प्रकल्पाविषयी माहिती देण्याचे काम गणू दादा करत असतात.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

राज्यस्तरीय लेखन सेवा पुरस्कार विजेते 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...