name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): June 2021

आयुष्याचं पुस्तक (The book of life)

आयुष्याचं पुस्तक  
The book of life

The book of life

आयुष्याचं पुस्तक
उघडून जरा चाळा,
   दिसतील आनंदाच्या 
    सुखासुखी माळा...   

आयुष्याचं पुस्तक      
स्वतः करा परीक्षण, 
आपले प्रश्न साेडवून
करावे जरा चिंतन...

आयुष्याचं पुस्तक
भविष्याचे रंग चितार,
याने फिरेल जीवनात 
सकारात्मक विचार...

आयुष्याचं पुस्तक    
असावे साधे सरळ, 
नसते जीवनात सल
पाळावी अचूक वेळ... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

भावनांचा ओलावा (The moisture of emotions)

भावनांचा ओलावा 
The moisture of emotions

Emotions

भावनांचा ओलावा
शाेषून घ्यावा कधीतरी,
जाणून घ्यावी एकदा 
भावभावनांची वारी...

भावनांचा ओलावा
प्रकट हाेताे क्षणाेक्षणी, 
भावना घ्याव्या समजून
त्याची गावी भाव गाणी...

भावनांचा ओलावा
भाव विविध दर्शवतो,
आपण कसा भावनेला 
प्रतिसाद काय देताे...

भावनांचा ओलावा
नसताे रूक्ष व्यवहार, 
ताे बनवताे आपला
आचार आणि विचार... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

देखावा (scenery)

देखावा
scenery


देखावा निसर्गरम्य 
बघण्याचा याेग आला,
अष्टविनायक तिर्थी
रमला हा साेहळा...

Scenery


देखावा रामाेजीचा
डाेळ्याचे पारणे फेडणारा, 
भव्य ती फिल्मसिटी
काय सांगू ताे नजारा...

देखावा  पर्यटनाचा
सुखद ती अनुभूती,
कसे वर्णू मी आता
अष्टविनायकाची महती..

देखावा आयुष्याचा
किती सजवू त्याला, 
वरचेवर करू आता
दाद द्यावी पर्यटनाला... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कधी येशील (when will you come)

कधी येशील
when will you come

When will you come

कधी येशील
तू परतून,
मी वाट पाहताे
तुला आठवून...

कधी येशील
तुला खूप मर्यादा
विसरू नकाे
येण्याचा वादा...

कधी येशील
मन दुःखी हाेते,
तुझ्या आठवणीत
जास्तच वहावते...

कधी येशील   
नक्की काय माहिती,
आठवणीत तुझे
सर्व गुण गाती... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

पाेकळी (proximity)

पाेकळी
proximity

Proximity

जवळच्या लाेकांमुळे
निर्माण हाेते पाेकळी, 
तुटून जाते आपोआप
ही जीवनाची साखळी.. 

तुटून जाते ही फुलाची
एकसंघ असणारी पाकळी, 
त्यामुळे दुसऱ्याच्या
उचलाव्या लागतात वाकळी.. 

संकटाची मालिकाही येते
धुमशान अशी वादळी, 
प्रवाहीत हाेणारे जीवन
धरत असते काजळी.... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

अंकुर (sprout)

अंकुर
sprout


Sprout

अंकुर काव्याचा
वाढीस ताे लागला,
शब्दसंपत्तीने ताे
आकारास आला...

अंकुर झाडाचा
डाेकावतच आला, 
त्याने फुलवली ती
सौंदर्याची माला...

अंकुर प्रेमाचा
नुकताच फुटला,
ज्याला त्याला प्रेम
वाटतच सुटला...

अंकुर माणुसकीचा
दिसू ताे लागला, 
मिळाले सहकार्य
व्देषभाव ताे मिटला... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

बाप माझा (My Father)

बाप माझा
My Father


Baap maza


बाप माझा

मी बापाचा,

बापावरच माझा

अनुवंशिक साचा...


बाप माझा

आदर्श शिक्षक,

वकृत्वाची खाण

सुजाण वाचक...


बाप माझा

प्रेमळ नी दिलदार,

अनंत जन्माचे

साेसलेय त्यांनी वार...


बाप माझा

माणुसकी ठायी ठायी,

मार्गदर्शन अनमाेल

जगणं सर्वस्वी...


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


रंग नवा (New colour)

रंग नवा
New colour

Colour

रंग नवा
निसर्गाने चढवला,
हिरवा शालू
धरतीने नेसला...

रंग नवा
रंगाची करावी बरसात, 
रागरंग पाहून
पेटवावी रंगाची वात...

रंग नवा
प्रत्येकाच्या आयुष्याचा,
जीवनभूमी रंगमंच
भूमिका बदलायच्या...

रंग नवा
दाखवावे रंगाचे विश्व, 
तरच रंगतरंगाचे
पळतील जाेरदार अश्व... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

काय बदलले (What changed)

काय बदलले
What changed


Changed

काय बदलले
नका आता पाहू,
अंतरंग बदला
लागेल जाणवू...

काय बदलले
झाली उलथापालथ,
प्रत्येकाच्या नशीबी 
हीच आहे गत...

काय बदलले
खूपच झाला बदल,
कशी दैवाने घडवली 
जन्माची ही अद्दल... 

काय बदलले
बदल माेजू नका, 
बसेल आपल्याला
आश्चर्याचा धक्का.... 
        
© दीपक केदू अहिरे, नाशिक


साेपं आहे...(It's easy)

साेपं आहे...
It's easy

It's easy

साेपं आहे उत्तर
अभ्यास साेडला,
घरटे बनवायला
पक्षी असा वळला...

साेपं आहे म्हणून
करू जरा नंतर, 
कारणाने बिघडलं
जगण्याचं तंतर...

साेपं आहे म्हणून
हाेतं जरा  दुर्लक्ष,
भटकतं इकडे मन
दुसरीकडे जाते लक्ष...

साेपं आहे म्हणून
करू नका दुर्लक्ष
आजही जग देते
या गोष्टींची साक्ष...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

रक्ताची नाती...(Blood Relationship)

रक्ताची नाती 
Blood Relationship

Blood Relationship

रक्ताची नाती
असतात हक्काची,
जाणीव ठेवा
त्यांच्या कर्तव्याची...

रक्ताची नाती
असतात भारलेली, 
असावा सुसंवाद
हाेतात बहरलेली...

रक्ताची नाती
असतात आवश्यक,
नात्यात फुंका प्राण
असावी ती आश्वासक... 

रक्ताची नाती
विश्वासाने परस्परपूरक, 
कधी नातं वाचावं
तर कधी व्हावे प्रेक्षक..

© दीपक केदू अहिरे, नाशिक

ओंजळ...(Flood)

ओंजळ
Flood

ओंजळ

ओंजळ पाण्याची

तहान भागवते,

ओंजळीने ओंजळीने

धन बघा साचते...


ओंजळ माणुसकीची

मी पुढ्यात भरताे,

कशी मला तुडवून

ऊर कसा बडवताे...


ओंजळ फुलांची

सुवास कसा देते,

ओंजळभर पुण्य

दिवसभरात साचते..


ओंजळ माझी सदा

पराेपकाराने भरलेली,

ओंजळीने ओंजळीने

मी कर्तव्य बजावली...


© दीपक केदू अहिरे, नाशिक



पहाटे पहाटे...(Fresh morning)

पहाटे पहाटे  
Fresh morning


पहाटे पहाटे

पहाटे पहाटे
अनेक स्वप्न पडतात,
ताडकन झाेपेतून
तीच जागी करतात...

पहाटे पहाटे
पक्ष्याचा सुंदर आरव,
पावश्या देताे जाणीव
पेरते व्हाचा मनव....

पहाटे पहाटे
मन असते ताजे फ्रेश,
त्यामुळे उलटावी
अपेक्षित कामाची वेस...

पहाटे पहाटे
निसर्ग हा बहरला, 
नित्यनेमाने हा निसर्ग
कामात नाही चुकला... 

© श्री. दीपक केदू अहिरे, नाशिक

ऑनलाईन शाळा...(Online school)

ऑनलाईन शाळा...
Online school 

ऑनलाईन

ऑनलाईन शाळा, 
या शाळेसाठी हाेऊ गाेळा
माेबाईल त्यासाठी साधन, 
वेचू आपण ज्ञानाचे कण... 

ऑनलाईन शाळा, 
आता शिकण्याची वेळ पाळा
विनाअडथळा हाेऊ एकाग्र, 
याने बुद्धी हाेईल कुशाग्र... 

ऑनलाईन शाळा, 
राेज साेयीस्कर शिकणं, 
घरातल्या घरात हाेईल 
आता वाचन, लेखन नी पाहणं... 

ऑनलाईन शाळा, 
आता फुलेल ज्ञानाचा मळा... 
छंदासाठी मिळेल पुरेसा वेळ, 
बसेल आता सुलभ शिक्षणाचा मेळ... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

आला साेसाट्याचा वारा..(A fair wind came)

आला साेसाट्याचा वारा...
 A fair wind came


Fair wind

आला साेसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा, 

काेसळतात चिंब धारा... 
आला साेसाट्याचा वारा, 

लाेंबकळल्या विजेच्या तारा, 
आसमंत भिजला त्यात सारा... 

आला साेसाट्याचा वारा, 
त्यात गारपिटीचा मारा, 

शेतीला नाही ताे सहारा... 
आला साेसाट्याचा वारा, 

चढला उन्हाने ताे पारा, 
पर्जन्याने पाडला फवारा... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

मी चिंब भिजावे...(I should soak the chimb)

मी चिंब भिजावे...
I should soak the chimb

Chimb

मी चिंब भिजावे
म्हणून पडताे पाऊस,
पडू नकाे धाे-धाे
रानात आहे ऊस...

मी चिंब भिजावे
नुसता ओलवून जा, 
राेपे गेली नासवून
कशी झाली ती वजा...

मी चिंब भिजावे
पड जरा भिजपाऊस,
कशी अचानक बदलताे 
पावसाची वेगळी कूस... 

मी चिंब भिजावे
पडत जा शांत जरा,
डाेलू दे पिक जाेमात
माझी काळजी घे ईश्वरा... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

मी खंबीर आहे...(I am firm)

मी खंबीर आहे 
I am firm

Strong

मी खंबीर आहे

नाही कमजोर,

म्हणून राहताे मी

मस्त आणि बिनघाेर...


मी खंबीर आहे

म्हणून ना लाचार,

करू कशाला मी आता

माझ्या क्षेत्री  भ्रष्ट आचार...


मी खंबीर आहे

तुटलाे मी कित्येक वेळा,

आता कुठे बसवला मी 

बिनधास्त क्षणांचा मेळा...


मी खंबीर आहे

म्हणून नाही अवलंबून,

पडलाे जरी प्रयत्न करता

पुन्हा उठून उभा राहिन...


© दीपक केदू अहिरे, नाशिक



शाेध मैत्रीचा...(Search friendship)

शाेध मैत्रीचा
Search friendship

Maitri

शाेध मैत्रीचा

निखळ अनुभूतीचा,

द्यावा नी घ्यावा

परामर्श आनंदाचा...


शाेध मैत्रीचा

गाेडवा चाखण्याचा,

मिसळून

एकमेकात राहण्याचा...


शाेध मैत्रीचा

न आटणाऱ्या झऱ्याचा,

परामर्श घ्यावा

अंतरंगी समाधानाचा...


शाेध मैत्रीचा

परस्पर विश्वासाचा,

जाेडून घ्यावा

वसा सहकार्याचा...


© दीपक केदू अहिरे, नाशिक


झाडे वाचवा...(Save the trees)

झाडे वाचवा...
Save the trees

Trees

झाडे वाचवा हा, 
संदेश तसा पुर्वापार 
त्यावाचून अडते, 
पर्यावरणाची मदार... 

झाडे वाचवा सत्वर, 
अंमलबजावणी करा... 
वृक्षसंवर्धन करा, 
मग वाचेल ही धरा... 

© दीपक अहिरे, नाशिक

ओढ मातीची...(The stream is soil)

ओढ मातीची
 The stream is soil
 


माती

ओढ मातीची

स्वस्थ बसू देत नाही,

गावाकडे फेरफटका

नेमाने हाेतच राही...


ओढ मातीची

जन्माने ती चिकटते,

गंध मातीचा 

हुंगतच राहावेसे वाटते...


ओढ मातीची

ऋणानुबंध कुणब्याचे,

मशागत तिची

अव्याहतपणे चालायचे...


ओढ मातीची

आणते जीवनात प्राण,

तिच्या सहवासाने

वाटते जीवनात छान...


©दीपक के.अहिरे,

नाशिक


ती जाणीव सतत राहावी... (That awareness should be constant)

ती जाणीव सतत राहावी
That awareness should be constant
That awareness should be constant

ती जाणीव सतत राहावी
म्हणून मी असताे संपर्कात,
म्हणून तुझ्या उर्जेच्या दिव्याला 
मी नेहमी करताे तेलवात... 

ती जाणीव सतत राहावी
म्हणून मी मुद्दाम असा वागताे, 
गरिबीतून आलाेय मी वर
म्हणूनच तुझं आशिष मी मागताे... 

ती जाणीव सतत राहावी
याची जाण मी ठेवताे वारंवार, 
म्हणूनच टिकून आहे ही
आप्तस्वकीयांमध्ये प्रेमाची धार... 

ती जाणीव सतत राहावी
या जाणीवेचा माझ्यात संचार, 
या जाणीवेपाेटी मी करेल 
माझा समृद्ध भवसागर पार... 

© दीपक के.अहिरे, नाशिक

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...