अंकुर
अंकुर काव्याचा
वाढीस ताे लागला,
शब्दसंपत्तीने ताे
आकारास आला...
अंकुर झाडाचा
डाेकावतच आला,
त्याने फुलवली ती
सौंदर्याची माला...
अंकुर प्रेमाचा
नुकताच फुटला,
ज्याला त्याला प्रेम
वाटतच सुटला...
अंकुर माणुसकीचा
दिसू ताे लागला,
मिळाले सहकार्य
व्देषभाव ताे मिटला...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा