ऑनलाईन शाळा...
Online school
ऑनलाईन शाळा,
या शाळेसाठी हाेऊ गाेळा
माेबाईल त्यासाठी साधन,
वेचू आपण ज्ञानाचे कण...
ऑनलाईन शाळा,
आता शिकण्याची वेळ पाळा
विनाअडथळा हाेऊ एकाग्र,
याने बुद्धी हाेईल कुशाग्र...
ऑनलाईन शाळा,
राेज साेयीस्कर शिकणं,
घरातल्या घरात हाेईल
आता वाचन, लेखन नी पाहणं...
ऑनलाईन शाळा,
आता फुलेल ज्ञानाचा मळा...
छंदासाठी मिळेल पुरेसा वेळ,
बसेल आता सुलभ शिक्षणाचा मेळ...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment