मी खंबीर आहे
I am firm
मी खंबीर आहे
नाही कमजोर,
म्हणून राहताे मी
मस्त आणि बिनघाेर...
मी खंबीर आहे
म्हणून ना लाचार,
करू कशाला मी आता
माझ्या क्षेत्री भ्रष्ट आचार...
मी खंबीर आहे
तुटलाे मी कित्येक वेळा,
आता कुठे बसवला मी
बिनधास्त क्षणांचा मेळा...
मी खंबीर आहे
म्हणून नाही अवलंबून,
पडलाे जरी प्रयत्न करता
पुन्हा उठून उभा राहिन...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment