पाेकळी
proximity
जवळच्या लाेकांमुळे
निर्माण हाेते पाेकळी,
तुटून जाते आपोआप
ही जीवनाची साखळी..
तुटून जाते ही फुलाची
एकसंघ असणारी पाकळी,
त्यामुळे दुसऱ्याच्या
उचलाव्या लागतात वाकळी..
संकटाची मालिकाही येते
धुमशान अशी वादळी,
प्रवाहीत हाेणारे जीवन
धरत असते काजळी....
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment