रक्ताची नाती
Blood Relationship
रक्ताची नाती
असतात हक्काची,
जाणीव ठेवा
त्यांच्या कर्तव्याची...
रक्ताची नाती
असतात भारलेली,
असावा सुसंवाद
हाेतात बहरलेली...
रक्ताची नाती
असतात आवश्यक,
नात्यात फुंका प्राण
असावी ती आश्वासक...
रक्ताची नाती
विश्वासाने परस्परपूरक,
कधी नातं वाचावं
तर कधी व्हावे प्रेक्षक...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment