काय बदलले
What changed
काय बदलले
नका आता पाहू,
अंतरंग बदला
लागेल जाणवू...
काय बदलले
झाली उलथापालथ,
प्रत्येकाच्या नशीबी
हीच आहे गत...
काय बदलले
खूपच झाला बदल,
कशी दैवाने घडवली
जन्माची ही अद्दल...
काय बदलले
बदल माेजू नका,
बसेल आपल्याला
आश्चर्याचा धक्का....
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment