ओढ मातीची
The stream is soil
ओढ मातीची
स्वस्थ बसू देत नाही,
गावाकडे फेरफटका
नेमाने हाेतच राही...
ओढ मातीची
जन्माने ती चिकटते,
गंध मातीचा
हुंगतच राहावेसे वाटते...
ओढ मातीची
ऋणानुबंध कुणब्याचे,
मशागत तिची
अव्याहतपणे चालायचे...
ओढ मातीची
आणते जीवनात प्राण,
तिच्या सहवासाने
वाटते जीवनात छान...
©दीपक के.अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment