ओंजळ
ओंजळ पाण्याची
तहान भागवते,
ओंजळीने ओंजळीने
धन बघा साचते...
ओंजळ माणुसकीची
मी पुढ्यात भरताे,
कशी मला तुडवून
ऊर कसा बडवताे...
ओंजळ फुलांची
सुवास कसा देते,
ओंजळभर पुण्य
दिवसभरात साचते..
ओंजळ माझी सदा
पराेपकाराने भरलेली,
ओंजळीने ओंजळीने
मी कर्तव्य बजावली...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा