रंग नवा
New colour
रंग नवा
निसर्गाने चढवला,
हिरवा शालू
धरतीने नेसला...
रंग नवा
रंगाची करावी बरसात,
रागरंग पाहून
पेटवावी रंगाची वात...
रंग नवा
प्रत्येकाच्या आयुष्याचा,
जीवनभूमी रंगमंच
भूमिका बदलायच्या...
रंग नवा
दाखवावे रंगाचे विश्व,
तरच रंगतरंगाचे
पळतील जाेरदार अश्व...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment