शाेध मैत्रीचा
Search friendship
शाेध मैत्रीचा
निखळ अनुभूतीचा,
द्यावा नी घ्यावा
परामर्श आनंदाचा...
शाेध मैत्रीचा
गाेडवा चाखण्याचा,
मिसळून
एकमेकात राहण्याचा...
शाेध मैत्रीचा
न आटणाऱ्या झऱ्याचा,
परामर्श घ्यावा
अंतरंगी समाधानाचा...
शाेध मैत्रीचा
परस्पर विश्वासाचा,
जाेडून घ्यावा
वसा सहकार्याचा...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment