name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

सुरगाणा येथील स्ट्रॉबेरी शेती l surgana strawberry farming

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील स्ट्रॉबेरी शेती

Surgana Strawberry Farming – आदिवासी भागातील यशस्वी शेतीपूरक व्यवसाय


surgana yethil strawbery sheti

प्रस्तावना

    नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका हा आदिवासी, डोंगराळ व पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या या भागात गेल्या १५–२० वर्षांत स्ट्रॉबेरी शेतीने आर्थिक परिवर्तन घडवून आणले आहे. एकेकाळी रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करणारे आदिवासी शेतकरी आज गावातच नगदी व फायदेशीर शेती करून आत्मनिर्भर झाले आहेत.


पारंपरिक शेतीतून आधुनिक पीकाकडे वाटचाल

पूर्वी सुरगाणा तालुक्यात:

  • भात

  • नागली

  • मका

  • भुईमूग

  • कुळीथ

  • उडीद

अशी पारंपरिक जिरायती पिके घेतली जात. दिवाळी संपली की रोजगारासाठी स्थलांतर अटळ असायचे. ही वणवण थांबवण्यासाठी २००२ नंतर काही प्रयोगशील शेतकरी पुढे आले.


स्ट्रॉबेरी – सक्षम शेतीपूरक पर्याय


surgana yethil strawberi sheti

स्ट्रॉबेरीसाठी आवश्यक असलेले:

  • समशीतोष्ण हवामान

  • भरपूर सूर्यप्रकाश

  • ६०–७०% आर्द्रता

  • थंड व डोंगराळ वातावरण

हे सर्व घटक सुरगाण्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध असल्याने स्ट्रॉबेरी पीक येथे चांगले फोफावले.

प्रारंभिक योगदान

या प्रयोगशील वाटचालीत:

  • श्रीराम गायकवाड

  • रमेश महाले

यांचे योगदान मोलाचे ठरले. सुरुवातीला अनेक अडचणी, भांडवलाचा अभाव, बाजारपेठेचा अनुभव नसणे यावर मात करत शेतकऱ्यांनी एकमेकांना आधार दिला.


महाबळेश्वरनंतर सुरगाणा – नवा स्ट्रॉबेरी पट्टा

एकेकाळी महाबळेश्वरचा मक्ता असलेली स्ट्रॉबेरी आज:

  • सुरगाणा

  • कळवण

  • पश्चिम घाटमाथा

येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक बनली आहे.


सुरगाणा तालुक्यातील स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्र

सध्या स्ट्रॉबेरी लागवड प्रामुख्याने:

  • बोरगाव

  • घागबारी

  • पळसदर खोरे

  • सुकापूर

अशा १०–१५ गावांत मोठ्या प्रमाणात केली जाते.


🌱 स्ट्रॉबेरी लागवड – सविस्तर मार्गदर्शन

१) हवामान व जमीन

  • थंड व समशीतोष्ण हवामान

  • हलकी ते मध्यम काळी, गाळाची जमीन

  • चांगला निचरा होणारी जमीन

  • pH: ५.५ ते ६.५


२) जमीन तयारी

  • उभी-आडवी खोल नांगरट

  • जुने पिकांचे अवशेष व तण नष्ट करणे

  • सेंद्रिय खतांचा भरपूर वापर


३) गादीवाफे तयार करणे

  • रुंदी: ९० से.मी.

  • उंची: ३०–४५ से.मी.

  • दोन ओळी पद्धत


४) रोपांची निवड

  • महाबळेश्वर परिसरातून दर्जेदार रोपे

  • ४–५ पाने असलेली निरोगी रोपे

  • प्लास्टिक पिशवीतील रोपे अधिक उपयुक्त


५) लागवड कालावधी

  • ऑक्टोबर ते मार्च

  • या काळातील हवामान सर्वाधिक पोषक


६) लागवड पद्धत

  • अंतर: १ फूट × १ फूट

  • प्रत्येक खड्ड्यात:

    • २०० ग्रॅम कुजलेले शेणखत

    • फोरेट

    • शिफारस केलेली रासायनिक खते


७) वापरात असलेले वाण

सुरगाण्यात प्रामुख्याने:

  • स्वीट चार्ली

  • कॅमेरोझा

  • सेल्वा

  • डग्लस

  • पजारो

  • विंटर डॉन (सर्वाधिक लोकप्रिय)


८) पाणी व खत व्यवस्थापन

  • ठिबक सिंचन सर्वोत्तम

  • आठवड्याला सेंद्रिय द्रवरूप खत

  • संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक


९) रोग व कीड नियंत्रण

  • पानांवरील डाग

  • मावा

  • बुरशीजन्य रोग

➡️ प्रतिबंधासाठी:

  • स्वच्छता

  • योग्य अंतर

  • सेंद्रिय कीडनाशके


🍓 स्ट्रॉबेरी उत्पादन व काढणी

  • लागवडीनंतर ६०–७० दिवसांत फळधारणा

  • लाल चुटूक, आकर्षक फळे

  • डिसेंबर ते मार्च प्रमुख हंगाम


‘बोरगाव स्ट्रॉबेरी’ – एक ब्रँड


surgana yethil strawbery sheti

सुरगाण्यातील स्ट्रॉबेरी:

  • लाल चुटूक

  • आंबट-गोड चव

  • टिकाऊपणा

यामुळे “बोरगाव स्ट्रॉबेरी” हा ब्रँड तयार झाला आहे.


बाजारपेठ व विक्री

पूर्वी:

  • मुंबई

  • अहमदाबाद

  • बडोदा

आता:

  • पुणे

  • बंगळूर

  • हैदराबाद

  • चेन्नई

पर्यटकांसाठी:

  • वणी

  • सप्तशृंगी गड

  • सापुतारा रोड

येथे थेट विक्री.


दर व प्रक्रिया उद्योग

  • जानेवारीत दर जास्त

  • मार्चनंतर दर कमी

  • द्वितीय दर्जाचा माल:

    • प्रक्रिया उद्योगांना ₹३०/kg


साप्रो शेतकरी उत्पादक कंपनी

  • शेतकऱ्यांची संघटना

  • हमीभाव व देयक सुरक्षा

  • स्थानिक रोजगार निर्मिती


आदिवासी भागातील परिवर्तन

  • स्थलांतर थांबले

  • गावात रोजगार

  • महिला सहभाग वाढला

  • कृषी विभागाची “विकेल ते पिकेल” संकल्पना


निष्कर्ष

सुरगाणा स्ट्रॉबेरी शेती ही:

  • आदिवासी भागातील यशस्वी शेतीकथा

  • नगदी, शाश्वत व बाजाराभिमुख शेती

  • इतर आदिवासी तालुक्यांसाठी आदर्श


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

युवा मनावर प्रभाव टाकणारी : श्यामची आई | Influencer on Young Minds

युवा मनावर प्रभाव टाकणारी : श्यामची आई
Influencer on Young Minds : Shyam's mother 

  

yuva manavar prabhav takanari shyamchi Aai


  चांगली पुस्तके ख-या मित्राप्रमाणे असतात. ती प्रेरणा ठरतात. मनाला उभारी देतात. मार्गदर्शन करतात. 

      भावविश्वाच्या कल्पनेत, दुनियेत वावरणारे युवा मन कधी कधी गोंधळते. व्यवहारी जीवनातील अडचणीमुळे निराश, वैफल्यग्रस्त होते. अशा वेळी मार्गदर्शक ठरतात ती अशी पुस्तके, मनाची मरगळ झटकून टाकणारी, प्रेमाने पाठीवरून हात फिरविण्याबरोबरच ममतेच्या मायेची उब देतात. "श्यामची आई" हे साने गुरुजीचे पुस्तक मुलांप्रमाणेच अनेक युवकांना प्रेरणा देणारे, संस्कार घडविणारे व जीवनाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास शिकविणारे आहे. दीपक अहिरे या युवकांवरही असाच प्रभाव या पुस्तकाचा आहे. 

मी भाग्यवान 

   मी भाग्यवान आहे, खरंच मी भाग्यवान आहे! कारण श्यामच्या आईला मी पाहिले आहे. तिच्या अंगा खांद्यावर खेळलो आहे. तिने भरवलेले घास मी मिटक्या मारीत खाल्ले आहेत. आपल्या कुशीत अंगाई म्हणत तिने मला झोपवले आहे. तिनेच मला जग दाखविले आहे. व जगात वागायचे कसे हेही शिकविले आहे. 

          माझी आई पूर्वजन्मी श्यामची आई होती. तेच प्रेम, तेच वात्सल्य, तोच त्याग आणि तेच गुण घेऊन ती ह्या जन्मी माझी आई झाली आहे. पण मला फार उशिरा समजले. माझ्या सुदैवाने "श्यामची आई" हे मातृप्रेमाचे अमर काव्य मी वाचले आणि आईचे हृदय मला उमगले. माझ्या आईची मला ओळख झाली. 

प्रेमाचा महासागर 

  "श्यामची आई" आईच्या हृदयाची ती कथा आणि व्यथा आहे. म्हणूनच त्या कथेत जीव आहे. आपल्या पोरावर प्रेम तर सगळ्याच माता करतात. श्यामची आई तर प्रेमाचा महासागर आहे. महासागराला जसा अंत नाही तसा तिच्या प्रेमालाही अंत नाही. 

   आपल्या सानिध्यात येणाऱ्या सर्वाना ती प्रेम लुटत आली आहे. त्यातून मोरू गाय, मनी मांजरीण सुद्धा सुटलेली नाही. यशोदा सारख्या कांडपिणीच्या आजारपणात तिने तिला औषधपाणी व खाऊपिऊ घातले आहे. आणि म्हणूनच यशोदा म्हणते, "देवमाणूस आहे माउली" 

मुलांवर चांगले संस्कार 

   केवळ प्रेमपूर्ती म्हणून मला श्यामची आई आवडली नाही तर प्रेमाबरोबरच आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी ती सतत धडपडत राहिली. माझी मुले मोठी झाली नाही तरी चालतील पण ती गुणी होवू देत. असे तिला सतत वाटायचे " पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप या तिच्या उद्गगारावरून तिच्या संस्काराची कल्पना येते. 

  गुरुजींच्या जीवनात आचाराचे व विचाराचे जे सौन्दर्य दिसते ते तिच्यामुळेच आपल्या मुलांना थोपटून थोपटून कौतुकाने आणि प्रसंगी शिक्षाही करून तिने आकार दिला आहे. 

श्रमदेवता

   श्यामची आई श्रमदेवता होती. सासरी आल्यापासून तिला कधीच उसंत मिळाली नाही. घरादारातले काम, सर्वांचे आजारपण व सर्वांची सेवा करण्यातच तिचे आयुष्य गेले.  आळशीपणाने बसून राहणे वाईट असे ती समजत असे. आपल्या मुलांना तिने कष्टाची सवय लावली. 

    श्यामने पत्रावळ लावली नाही म्हणून तिने त्याला जेवण दिले नाही.  श्याम दळणे, धुणी धुणे, भांडे घासणे ही कामे आवडीने करीत असे. माणसाने पाप करावयास लाजावे, काम करतांना लाजू नये हे तिनेच माझ्या मनावर बिंबवले. श्रीमंत व भिकारी हे दोघेही समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत. कारण ते काम करीत नाहीत. श्रमातच आत्मोद्धार आहे असे तिला वाटत असे. 

    आपल्या माणसासाठी तर कष्टाची फिकर तिने कुठेच केलेली आहे असे दिसत नाही. दादाचे पाय चेपण्यासाठी श्याम गेला नाही तेव्हा सर्व पसारा टाकून ती गेली आहे. यशवंताला ती लहानपणी मांडीवर घेऊन बसत असे. यशवंत जेव्हा म्हणतो, "आई तुझी मांडी दुखत असेल तेव्हा तिच्यातील माता उत्तर देते, उलट तुलाच माझ्या मांडीचे हाडे खुपत असतील.  आपल्या नवऱ्याला देवाला फुले आणण्यासाठी ते दूर गावी पाठवते आणि कष्टाचे पाठ देते 

स्वाभिमानाचे प्रतीक 

  आदर्श, स्वाभिमानी व्यक्तीचे नाव सांगा असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी तत्क्षणी सांगेन "श्यामची आई" गरीबीबरोबर लाचारी येत असते. पण गरिबीत सुद्धा स्वाभिमान न सोडणारी श्यामची आई होती. लग्नामध्ये श्यामने दक्षिणा घेतली तेव्हा गृहस्थाने जगास द्यावे. जगापासून घेऊ नये, हे तिनेच शामला पटवून दिले. माहेरच्या घरात लाचारीने जगण्यापेक्षा स्वतःचे दागिने विकून तिने नवऱ्यास घर बांधावयास लावले व ती झोपडी तिला स्वर्गापेक्षा प्रिय वाटली. सावकाराच्या कारकुनाचे कुजके अभद्र बोलणे ऐकण्यापेक्षा घरदार जप्त झाले तरी चालेल, मजुरी करता येईल" हे तिचे विचार तिच्या स्वाभिमानी स्वभावाचेच प्रतीक आहे.  

पती हाच दागिना 

       सीता व सावित्री यांच्या देशात पतिव्रता स्त्रियांची परंपरा अजून चालू आहे. हे श्यामच्या आईवरून मला दिसून आले. आपल्या पतीवर तिचे जिवापाड प्रेम आहे. पती हाच दागिना असे ती मानत असे. व त्याची सेवा करीत असे. भाऊबीजेच्या पैशातून स्वतःसाठी लुगडी न आणता तिने नवऱ्यासाठी धोतरे आणली. नवऱ्याचा अपमान करणाऱ्या स्वतःच्या बापाला सुद्धा तिने हाकलून दिले यावरून तिची पतीनिष्ठा दिसून येते. प्रसंगी पतीलाही ध्येयवादाचे धडे द्यावयास तिने कमी केले नाही. आपल्या माघारी त्यांची हेळसांड होईल याची तिला काळजी वाटत होती. त्यांना जपा असा उपदेश तिने मुलांना केला होता. तुमच्या मांडीवर मरण येणे याहून दुसरे भाग्य कोणते? हा तिचा प्रश्न तिची प्रतिनिष्ठा दाखवून देतो. 

विकासाची प्रेरणा 

      श्यामची आई आपल्या मुलांसाठीच जास्त जगली असे म्हणायला हरकत नाही. सर्व अपमान, गैरसमज, लोकनिंदा स्वतः सहन करून ती मुलांना निवारा देत राहिली. आपल्या प्रेमळ पंखाखाली आपले पिलांना घेऊन त्यांना विकासाची प्रेरणा देत राहिली. जगामध्ये जे जे सुंदर उदात्त व मंगल आहे त्याच्यावर प्रेम करायला तिने आपल्या मुलांना शिकवले. तिची सारी धडपड मुलांच्यावर चांगली संस्कार व्हावेत यासाठीच होती. खरी सौंदर्य सदगुणांचे, स्वच्छतेचे आहे असे ती मानत असे. मरतांना ती म्हणते, तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे आता मला काळजी नाही पण तरीही तिची काळजी संपलेली नव्हती आपल्या लहानग्या पुरुषोत्तमाचे कसे होईल ही काळजी तिला होतीच   

   आजच्या मातांनी आदर्श माता होण्यासाठी श्यामच्या आईचा आदर्श पुढे ठेवावा असे मला वाटते.  कारण मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आई-बापांवर अवलंबून असतो. सूर्य चंद्राच्या किरणांनी जशा कळ्या उमलतात. तशा आईबापांच्या कृत्याने मुलांच्या जीवनकळ्या उमलत असतात. गुरुजींना त्यांच्या आईनेच घडवले आहे. तितकेच त्यांना जगावर, निसर्गावर प्रेम करायला शिकवले.  निस्वार्थी सेवेचे व समर्पणाचे धडे तिनेच दिले आहेत. तिनेच गुरुजींना मोठे केले. लेखक, कवी, देशभक्त, समाजसेवक बनवले. आज आपल्या देशाला अशा हजारो आईंची गरज आहे असे मला वाटते व अशी आई तयार होण्यासाठी "श्यामची आई" शिवाय पर्याय नाही याची मला खात्री आहे. 

अनंत उपकार 

      श्यामच्या आईचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, कारण तिच्यामुळे मला माझ्या आईची ओळख पटली. प्रत्येक माता आपल्या लेकरासाठी कायावाचामनाने झिजत असते पण आमच्या सारख्या करंट्यांना (युवा पिढीला) तिच्या प्रेमाचे, त्यागाचे मोलच समजत नाही व परिणामी आम्ही जीवनात अयशस्वी होतो. "श्यामची आई" वाचत असताना हट्टी चंचल श्यामच्या जागी मला मीच दिसत होतो व परिणामी दुःखी होत होतो. गहिवरत होतो व अधिकाधिक मातेकडे ओढला जात होतो. माझ्यासारख्या लाखो मराठी मुलांना आई आणि तिचं हृदय समजावून देण्याचे काम श्यामच्या आईने केले आहे. यातच तिच्या जीवनाची सार्थकता आहे असे मानावे लागेल कारण ती तर अवघ्या विश्वाची माता होती. 

yuva manavar prabhav taknari shyamchi Aai

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

किसान दिवस 23 डिसेंबर | Kisan Diwas in Marathi | शेतकऱ्यांचा गौरव आणि कृषी विकास

🌾 किसान दिवस 23 डिसेंबर | शेतकऱ्यांचा गौरव आणि कृषी विकासाचा संकल्प

किसान दिवस 23 डिसेंबर – भारतीय शेतकऱ्यांचा गौरव

प्रस्तावना

    भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि समाजव्यवस्था या सगळ्यांचा कणा म्हणजे शेतकरी. आपल्या रक्त-घामाच्या मेहनतीतून तो आपल्यासाठी अन्न पिकवतो. या शेतकऱ्यांच्या त्याग, कष्ट आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस (Kisan Diwas / National Farmers Day) साजरा केला जातो.

    हा दिवस केवळ उत्सव नसून, शेतकऱ्यांच्या समस्या, संधी आणि भविष्यातील कृषी धोरणांवर विचार करण्याचा दिवस आहे.


🌱 किसान दिवस का साजरा केला जातो?

चौधरी चरणसिंह – किसान दिवस 23 डिसेंबर

23 डिसेंबर हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस आहे.
    चौधरी चरणसिंह हे शेतकरी वर्गाचे खंदे समर्थक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत शेतकरी, ग्रामीण भाग आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काम केले.

👉 त्यांच्या सन्मानार्थ आणि शेतकऱ्यांच्या योगदानाच्या गौरवासाठी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो.


👨‍🌾 चौधरी चरणसिंह – शेतकऱ्यांचा नेता

चौधरी चरणसिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेशात झाला.
त्यांना “शेतकऱ्यांचा पंतप्रधान” असेही म्हटले जाते.

त्यांचे प्रमुख योगदान:

  • शेतकऱ्यांसाठी जमीन सुधारणा कायदे

  • जमीनदारशाही विरोधात ठाम भूमिका

  • लघु व मध्यम शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा

  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी

त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू एकच होता –
“भारताचा खरा विकास गाव आणि शेतकरी मजबूत झाल्याशिवाय होऊ शकत नाही.”


🌾 शेतकऱ्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व

भारतीय शेती आणि शेतकरी जीवन

  1. अन्नसुरक्षेचा कणा
    देशातील 140 कोटी लोकसंख्येला अन्न पुरवण्याचे काम शेतकरी करतो.

  2. रोजगार निर्मिती
    भारतातील सुमारे 50% पेक्षा जास्त लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे.

  3. ग्रामीण विकास
    शेती मजबूत असेल तरच ग्रामीण भागाचा विकास होतो.

  4. निर्यात व परकीय चलन
    कापूस, तांदूळ, गहू, मसाले यांची निर्यात करून शेतकरी देशाला परकीय चलन मिळवून देतो.


🚜 आधुनिक काळातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने

आधुनिक शेती तंत्रज्ञान भारत

आजचा शेतकरी केवळ शेती करणारा नसून, तो निसर्ग, बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाशी झुंज देणारा योद्धा आहे.

प्रमुख समस्या:

  • हवामान बदल आणि अनियमित पाऊस

  • वाढता उत्पादन खर्च

  • बाजारभावातील चढ-उतार

  • कर्जबाजारीपणा

  • नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट)

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव

👉 किसान दिवस या सगळ्या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधतो.


🌿 शासनाच्या योजना व किसान दिवसाचे महत्त्व

किसान दिवस साजरा करताना शेतकरी सन्मान

    किसान दिवसानिमित्त केंद्र व राज्य सरकार विविध योजना, कार्यक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन करतात.

काही महत्त्वाच्या योजना:

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

  • पीक विमा योजना

  • मृदा आरोग्य कार्ड

  • ई-नाम (e-NAM) बाजार

  • कृषी यांत्रिकीकरण योजना

या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच किसान दिवसाचा मुख्य उद्देश आहे.


🌾 शाश्वत शेती आणि भविष्यातील शेतकरी

आज गरज आहे ती शाश्वत (Sustainable) शेतीची.

भविष्यासाठी आवश्यक बदल:

  • सेंद्रिय शेतीचा अवलंब

  • पाणी व्यवस्थापन

  • आधुनिक तंत्रज्ञान (ड्रोन, AI, स्मार्ट शेती)

  • कृषी पर्यटन (Agro Tourism)

  • प्रक्रिया उद्योग व थेट विक्री

शेतकरी जर उद्योजक बनला, तर शेती नक्कीच फायदेशीर होईल.


🌱 युवक आणि शेती – नवीन संधी

आज अनेक तरुण शेतीकडे पाठ फिरवत आहेत. पण योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ मिळाल्यास शेतीत मोठ्या संधी आहेत.

👉 किसान दिवस युवकांना शेतीकडे आकर्षित करण्याचे काम करतो.


🌼 किसान दिवस कसा साजरा केला जातो?

  • शेतकरी मेळावे

  • कृषी प्रदर्शन

  • चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबिरे

  • पुरस्कार वितरण

  • कृषी नवोपक्रमांचे सादरीकरण

हा दिवस आनंद, सन्मान आणि आत्मचिंतनाचा असतो.


🙏 समाजाची जबाबदारी

फक्त सरकारच नाही, तर समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे.

  • शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देणे

  • स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी

  • अन्नाची नासाडी टाळणे

  • शेतकऱ्यांचा सन्मान करणे

परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा | Parasitic Friendly Insect Trichogramma – जैविक किड नियंत्रणातील प्रभावी उपाय

🌱 परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा (Trichogramma)

paropjivi mitra kitak : tricograma

    परोपजीवी मित्रकिटकांपैकी ट्रायकोग्रामा हा एक अत्यंत महत्वाचा मित्रकिटक असून तो अळीवर्गीय हानिकारक किडींच्या अंड्यावर उपजीविका करतो. जैविक किड नियंत्रणामध्ये या किटकाचा वापर सर्वप्रथम १९२५ पासून सुरू झाला.


🌱 जैविक किड नियंत्रणामध्ये ट्रायकोग्रामाचे महत्व

Importance of Trichogramma in Biological Pest Control

    ट्रायकोग्रामा किडींच्या अंडी अवस्थेतच नाश करतो. त्यामुळे पुढे होणारे पिकांचे नुकसान टाळता येते. रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी करून पर्यावरणस्नेही शेतीसाठी हा किटक अत्यंत उपयुक्त आहे.


🌱 ट्रायकोग्रामाच्या जाती
Species of Trichogramma

    भारतामध्ये ट्रायकोग्रामाच्या एकूण २६ जाती आढळतात. त्यापैकी महत्वाच्या जाती:

  • ट्रायकोग्रामा चिलानीस

  • ट्रायकोग्रामा जापोनिकम

  • ट्रायकोग्रामा अकाई

  • ट्रायकोग्रामा नागरकट्टी

    या जातींचा वापर विविध पिकांवरील पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो.


🌱 ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम
Life Cycle of Trichogramma

Paropjivi mitra kitak: Trichograma

ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो.

  • अंडी अवस्था : १६–२४ तास

  • अळी अवस्था : २–३ दिवस

  • कोष अवस्था : ४–५ दिवस

  • प्रौढ आयुष्य : २४–४८ तास

उन्हाळ्यात जीवनक्रम ८–१० दिवसांचा तर हिवाळ्यात १०–१२ दिवसांचा असतो.


🌱 प्रयोगशाळेत ट्रायकोग्रामाची निर्मिती
Laboratory Production of Trichogramma

    प्रयोगशाळेत ट्रायकोग्रामाची निर्मिती भातावरील फुलपाखराच्या अंड्यांवर केली जाते. अंडी स्वच्छ करून अतिनील किरणांच्या प्रकाशात ठेवली जातात, जेणेकरून त्यातून किडी बाहेर पडणार नाहीत.


🌱 ट्रायकोकार्डवरील माहिती
Information on Trichocard

    ट्रायकोकार्ड हे पोस्टकार्डच्या आकाराचे असून त्यावर सुमारे २० छोटे चौकोन असतात. एका ट्रायकोकार्डवर १८,००० ते २०,००० ट्रायकोग्रामा असतात. हे कार्ड १०°C तापमानात ३० दिवस साठवता येते.


🌱 ट्रायकोग्रामा शेतात सोडण्याची पद्धत
How to Release Trichogramma in Field


  • ट्रायकोकार्डचे २० तुकडे करावेत

  • पानाच्या मागील बाजूस बांधावेत

  • सकाळच्या वेळेत सोडावेत

  • किटकनाशक फवारणी टाळावी


Dosage of Trichogramma
🌱 ट्रायकोग्रामा वापरण्याचे प्रमाण

  • भात, ऊस : ५०,००० (६ वेळा)

  • कापूस : १,५०,००० (८–१० वेळा)

  • टोमॅटो : ५०,००० (६ वेळा)

  • मका : ७५,००० (६ वेळा)

  • सूर्यफूल : १,००,००० (४–६ वेळा)


🌱 ट्रायकोग्रामा वापरण्याचे फायदे
Benefits of Trichogramma

  1. हानिकारक किडींच्या अंड्यांचा नाश

  2. किटकनाशकांवरील खर्चात बचत

  3. पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त शेती

  4. मानव व पाळीव प्राण्यांस सुरक्षित

  5. इतर मित्रकिटकांना हानी नाही

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2: Milk Processing Unit Scheme, Eligibility, Benefits & Application Process

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi ...