name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

ही वाट एकट्याची (path is lonely)

ही वाट एकट्याची...
path is lonely


Path is Lonely


ही वाट एकट्याची, 
लढतच राहिल, 
पंखात बळ सारखं, 
मी भरतच राहिल... 

ही वाट एकट्याची, 
अवघड नाही माझ्यासाठी, 
करेन हाैसला बुलंद, 
सकारात्मक जगण्यासाठी... 

ही वाट एकट्याची, 
लढला खिंडीत तानाजी, 
संगतीला नाही पाहिले, 
पर्वा केली नाही जीवाची... 

ही वाट एकट्याची, 
मग खचून का जावं, 
मागचं अपयश धुवून, 
पुढे पुढे चालतच राहावं... 

© दीपक अहिरे, नाशिक


मनात साठलंय (stored in my mind)

मनात साठलंय..
Stored in my mind

Stored in my mind


मनात साठलंय
अंतरंगी आनंद, 
हाच जीवनाचा
परमानंदी स्वानंद... 

मनात साठलंय
निचरा जरूर करा, 
नित्य नियमाने
भगवंतास स्मरा... 

मनात साठलंय
भक्ती भाव ईश्वराचा, 
बिनघाेर राहा आता
आतल्या जाणीवेचा... 

मनात साठलंय 
ते जनात आता वाटू, 
कणाकणाने तुम्हांस
स्नेहभाव लागला दाटू... 

© दीपक अहिरे, नाशिक



सैनिक (Soldier)

सैनिक... 
Soldier


Soldier

सैनिक 
आमचा अभिमान, 
सैनिक 
आमच्या देशाचे पान... 

सैनिक 
आमच्या काळजाचा तुकडा, 
शाबूत ठेवताे 
प्रत्येकाचा मुखडा.... 

सैनिक 
आमची आन बाण शान, 
देशवासीयांच्या ओठावर 
त्याचेच मंगल गान... 

सैनिक 
आमचा ज्वाज्वल्य राष्ट्रवाद, 
कधी दाखवत नाही 
वृथा उन्माद... 

सैनिक 
आमच्या देशाची वीण, 
आठवताे त्यास 
आजच्या लष्कर दिन... 

© दीपक अहिरे, नाशिक


थकले मन माझे जरी (My mind is tiered)

थकले मन माझे जरी...
My mind is tiered 

My mind is tiered

थकले मन माझे जरी,
उरात कायम भरारी, 
जाेश,ऊर्जा टिकवून,
काम करताे सारी... 

थकले मन माझे जरी,
मी विचाराने तरूण, 
काही असेलच कमी,
मी सारले माझे न्यून... 

थकले मन माझे जरी, 
विहार करेल सामर्थ्याने, 
मेहनतीची भाकरी,
फुलवेल अनेक अंगाने... 

थकले मन माझे जरी,
दाेन्ही पंख माझे शाबूत, 
ध्येय गाठण्यासाठी,
बळ भरेल माझ्या बाहुत... 

© दीपक अहिरे, नाशिक

घुसमट (Intrude)

घुसमट
Intrude

Intrude

घुसमट मनातली,
वेळोवेळी जाहिर करा, 
घुसमटाची देवाणघेवाण,
हाेवू द्या साफ निचरा... 

घुसमट असते,
मनाच्या डाेहात साचून, 
संयतपणे समजून घ्या,
तिच्या अडथळ्यांवाचून... 

घुसमट घेते ठाव, 
अनेक संबंधित हदयाचा, 
मार्ग शाेधत राहते ती, 
बाहेर निघण्याचा... 

घुसमट वाढवताे,
मनाची घालमेल, 
ढळू देवू नका मनाचा,
संयमी ताेल... 

© दीपक अहिरे, नाशिक

केव्हातरी पहाटे (sometime in the morning)

केव्हातरी पहाटे
sometime in the morning


Sometime in the morning


केव्हातरी पहाटे,
हलकेच जाग आली, 
जागेपणी मी,
माझीच स्वप्न पेरली..

केव्हातरी पहाटे,
स्वप्नांना मुलामा दिला, 
स्वप्नांचा आढावा,
हळूच शिकवून गेला...

केव्हातरी पहाटे,
स्वप्न मी आठवले, 
स्वप्नांनी उडवली झाेप,
हे मला आता कळले...

केव्हातरी पहाटे,
स्वप्न समजावून गेली, 
स्वप्नांचा अर्थ काढून,
पहाट माझी ढळली...

© दीपक अहिरे, नाशिक




आयुष्य थांबले की (When life stops)

आयुष्य थांबले की...
When life stops


When life stops


आयुष्य थांबले की 

थांबतात सर्व गोष्टी,

बदलून जाते आयुष्य,

ठप्प हाेते अवघी सृष्टी


आयुष्य थांबले की 

काेसळत नाही धारा,

तेव्हा नाही फिरकत,

आसपासचा सुघ्दा वारा


आयुष्य थांबले की 

निरभ्र हाेतं आकाश,

येत नाही कुठला,

आपल्याला सुवास


आयुष्य थांबले की 

दिसत नाही कुणी,

जरी असले जवळ,

नसते ते ध्यानीमनी

© दीपक अहिरे, नाशिक


वेळ मिळत नाही (There is no time)

वेळ मिळत नाही...
There is no time


There is no time


वेळ मिळत नाही, 
नुसती धावत राहते, 
रात्रंदिवस चाेवीस तास,
काेण कसे खर्च करते...

वेळ मिळत नाही,
वेळ काढावा लागतो, 
गेलेला वेळ कुणी, 
परत असा मागताे...

वेळ मिळत नाही, 
वेळ असताे माैल्यवान, 
वेळेचं भान ठेवावे, 
त्यासारखा नाही ताकदवान...

वेळ मिळत नाही, 
कामं करावी अनेक, 
काळावर व्हावे स्वार, 
वेळेचं व्यवस्थापन करावे नेक

© दीपक अहिरे, नाशिक

न बाेलता कधीतरी (Sometimes without speaking)


न बोलता कधीतरी...
Sometimes without speaking


Sometimes without speaking


न बोलता कधीतरी,
माैन बाळगणं हितकारक,   
कुठे नी काय बाेलायचे,
याचं भान अत्यावश्यक      

माैनामुळे आपल्या मनाला,
प्राप्त हाेते अंतर्मुखता,         
मनाच्या तटस्थतेमुळे,
मिळते मनाला अलिप्तता     

कमी बाेलून व्यक्तीमत्व,
विचारशीलता करतं सिद्ध,
चुकीच्या बाेलण्याचा धाेका,
कृती करून हाेताे प्रसिद्ध

पैशाची काटकसर करून,
ठरत असताे धनवान, 
शब्दांची काटकसर करून 
ठराल तुम्ही ज्ञानवान

© दीपक अहिरे, नाशिक

तुझ्या आठवांचा शहारा (Your memories depth)

तुझ्या आठवांचा शहारा
Your memories depth

Your memories depth

Your memories depth

तुझ्या आठवांचा शहारा, 
देताेय कडक पहारा, 
आम्ही आकंठ बुडालेलाे, 
निघतात आसवांच्या धारा

तुझ्या आठवांचा शहारा, 
नित्यनवीन अनुभव देताे, 
तु जवळ आहेस आमच्या, 
हा भास नेमाने घडताे

तुझ्या आठवांचा शहारा, 
हृदय मंदिरात बंदिस्त, 
कधी हाेणारच नाही, 
तुझ्या आठवांचा अस्त

तुझ्या आठवांचा शहारा, 
प्रत्येक आठवणींचा नजारा, 
काळजाच्या कुपीत भरताे, 
आठवताे तुझाच चेहरा

© दीपक अहिरे, नाशिक

आयुष्याला द्यावे उत्तर (Answer to life)

आयुष्याला द्यावे उत्तर
Answer to life


Answer to life

काेणत्याही परीस्थितीला 
हाेवू देवू नका स्वार, 
सातत्याने रहा कृतिशील
आयुष्याला द्यावे उत्तर...

संधी शाेधण्या डाेळ्यांबराेबर
करावा डाेक्याचा वापर, 
अधिक अभ्यास व व्यासंगाने
आयुष्याला द्यावे उत्तर...

गाठायचं उद्दिष्ट तर 
परीश्रमाशिवाय नाही गत्यंतर, 
नेमक्या श्रम आणि मेहनतीने, 
आयुष्याला द्यावे उत्तर...

विश्वासाने भावना सुखावते, 
देताे मानसिक आधार, 
सकारात्मक उर्जा टिकवून, 
आयुष्याला द्यावे उत्तर...

© दीपक अहिरे, 
नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

या अनाेळखी शहरात ( In this unknown city)

या अनाेळखी शहरात...
In this unknown city

In this unknown city

या अनाेळखी शहरात, 
शिकण्या मी आलाे, 
येथेच घेतले घर, 
मी स्थिर स्थावर झालाे... 

या अनाेळखी शहरात,
माझे लागेबांधे जुळले, 
शहराने दिला राेजगार,
जगण्याचा भाग झाले... 

या अनाेळखी शहरात, 
ओळख वाढली सर्वदूर, 
या शहरानेच माझा, 
पालटवला एकूण नूर... 

या अनाेळखी शहरात, 
देताे सहकार्याचा हात, 
संकटे,अडचणींवर करताे,
मी आता धीराने मात... 

© दीपक अहिरे, नाशिक

मन गुंतते या आभासी जगात (mind engages virtual world)


मन गुंतते या आभासी जगात
mind engages virtual world


mind engages virtual world

मन गुंतते 
या आभासी जगात, 
मन समृद्ध, 
छंद असताे लिखाणात... 

आभासी जग, 
दृष्टीकाेनाने चांगले, 
करतेच सर्वांगाने, 
माणसाचे ते भले... 

आस्वाद घ्यावा तुम्ही, 
आभासी जगाचा, 
बदलेल तुलनेने, 
तुमची काया नी वाचा... 

आभासी जगात, 
गुंतू नये जास्त, 
तेवढ्यापुरती उकल, 
करावी वास्तपुस्त... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

खडतर प्रवास (Hard journey)

खडतर प्रवास
Hard journey

Hard journey

खडतर प्रवास,
खूप अनुभव देताे, 
जीवनाच्या प्रवासात,
खूप काही शिकवताे

खडतर प्रवास,
नाही बदलायचा रस्ता, 
रस्त्यातील खाचखळगे,
बनवायचा ताे फिरस्ता

खडतर प्रवास,
केला दुसऱ्यासाठी अनेकांनी, 
ठेवा थोडी जाणीव,
समृद्ध केला अनेक अंगानी

खडतर प्रवास,
चांगले फलीत निघते, 
केली अखंड साधना,
उचीत फळ मिळते

© दीपक अहिरे, नाशिक

अनाथांची माई (Orphan's Mother)

अनाथांची माई
Orphan's Mother

Orphans mother

अनाथांची माय,

बनल्या सिंधुताई,

नकाेसी झालेली चिंदी,

बनली अनाथांची माई

बालवयात झाला विवाह, 
साेसला प्रचंड सासुरवास, 
भीक मागून पाेट भरले, 
दिली आधाराची कास

अनाथांच्या जीवनाला दिशा,
स्थापना ममता सदनाची, 
केले परदेश दाैरे, 
छाप पडे लिखाण व बाेलण्याची

शुन्यातून विश्व निर्माण,
हजारो पुरस्कारांच्या मानकरी, 
जन्म घ्या येथे पुन्हा, 
तुमची गरज धरतीवरी

© दीपक अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************

कल्पनाशक्ती (Imagination)

कल्पनाशक्ती
Imagination 

Imagination

कल्पनाशक्तीचं बीजच, 
विशालकाय वृक्ष बनवते, 
विद्वत्ता गुणवत्तेबराेबर, 
कल्पनाशक्तीच कामी येते...

कवी,कलाकार,शास्त्रज्ञ, 
यांची कल्पनेतून निर्मिती, 
कल्पनेशिवाय निर्माण अशक्य, 
नाही मिळत गती

कल्पनाचं करत असाल, 
तुम्ही जर उत्पादन, 
काेणतंही उत्पादन, 
तुम्हाला जमेल सहज विकणं...

स्वप्न जाे पाहताे, 
ताे करू शकताे कल्पना, 
कल्पनेने बदलेल विश्व, 
ही ठरत नाही वल्गना

© दीपक अहिरे, नाशिक

आठवणींचा पाऊस (Rain of memories)

आठवणींचा पाऊस...
Rain of memories

Rain of memories

आठवणींचा पाऊस,
आठवणींचे ढग दाटतात,
आठवणींच्या गारा,
आठवणी मनात साठतात

आठवणींचा पाऊस,
स्मृती तुडुंब भरलेल्या,
मंत्रमुग्ध करतात आठवणी,
आहेत त्या भारलेल्या

आठवणींचा पाऊस,
भरताे आठवणींचा कुंभ,
आठवणींचा जळताे पीळ,
उरताे आठवणींचा सुंभ

आठवणींचा पाऊस,
भरावे आठवणींचे नद्या नाले,
आठवणी काढली तरी 
उरतात आठवणींचे प्याले

© दीपक अहिरे,नाशिक

तयास मानव (Tayas manav)

तयास मानव 
Tayas manav


Tayas Manav


तयास मानव, 

सावित्रीबाईंच्या कवितेचे शीर्षक

मराठी पहिल्या कवयित्री, 

स्त्री शिक्षणाच्या प्रसारक

तयास मानव, 

पहिली मुलींची शाळा सुरू झाली, 

आद्य शिक्षिका,

शरीरविक्रय बायांची साेडवणूक केली

तयास मानव, 

लिहिले लेख 'गृहिणी' मासिकात,

प्लेगरूग्ण दवाखाना, 

आश्रय सत्यशोधक कुटुंबात

तयास मानव, 

स्त्रीभ्रूण हत्या त्यांनी प्रथम राेखली

जन्मदिन बालिका दिन,

समाजात मानवता जागवली

© दीपक अहिरे, नाशिक



शब्दांची किंमत (price of the word)

शब्दांची किंमत...
Price of the word


Price of the word

शब्दांची किंमत,
असते अनमोल, 
जपून वापरा,
सांभाळावा ताेल... 

शब्दांची किंमत,
भाषासौंदर्याला वळण, 
शब्द घडवतात,
लेखक कवीचं जीवन... 

शब्दांची किंमत,
भिडते अंतरंगाला, 
लागतं वळण,
चांगल्या विचाराला... 

शब्दांची किंमत,
बदल घडवतात, 
शब्दच जीवनात,
कृती करतात... 

© दीपक अहिरे, नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...