केव्हातरी पहाटे
sometime in the morning
केव्हातरी पहाटे,
हलकेच जाग आली,
जागेपणी मी,
माझीच स्वप्न पेरली..
केव्हातरी पहाटे,
स्वप्नांना मुलामा दिला,
स्वप्नांचा आढावा,
हळूच शिकवून गेला...
केव्हातरी पहाटे,
स्वप्न मी आठवले,
स्वप्नांनी उडवली झाेप,
हे मला आता कळले...
केव्हातरी पहाटे,
स्वप्न समजावून गेली,
स्वप्नांचा अर्थ काढून,
पहाट माझी ढळली...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा