सैनिक...
Soldier
सैनिक
आमचा अभिमान,
सैनिक
आमच्या देशाचे पान...
सैनिक
आमच्या काळजाचा तुकडा,
शाबूत ठेवताे
प्रत्येकाचा मुखडा....
सैनिक
आमची आन बाण शान,
देशवासीयांच्या ओठावर
त्याचेच मंगल गान...
सैनिक
आमचा ज्वाज्वल्य राष्ट्रवाद,
कधी दाखवत नाही
वृथा उन्माद...
सैनिक
आमच्या देशाची वीण,
आठवताे त्यास
आजच्या लष्कर दिन...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment