name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): या अनाेळखी शहरात ( In this unknown city)

या अनाेळखी शहरात ( In this unknown city)

या अनाेळखी शहरात...
In this unknown city

In this unknown city

या अनाेळखी शहरात, 
शिकण्या मी आलाे, 
येथेच घेतले घर, 
मी स्थिर स्थावर झालाे... 

या अनाेळखी शहरात,
माझे लागेबांधे जुळले, 
शहराने दिला राेजगार,
जगण्याचा भाग झाले... 

या अनाेळखी शहरात, 
ओळख वाढली सर्वदूर, 
या शहरानेच माझा, 
पालटवला एकूण नूर... 

या अनाेळखी शहरात, 
देताे सहकार्याचा हात, 
संकटे,अडचणींवर करताे,
मी आता धीराने मात... 

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...