मनात साठलंय..
Stored in my mind
मनात साठलंय
अंतरंगी आनंद,
हाच जीवनाचा
परमानंदी स्वानंद...
मनात साठलंय
निचरा जरूर करा,
नित्य नियमाने
भगवंतास स्मरा...
मनात साठलंय
भक्ती भाव ईश्वराचा,
बिनघाेर राहा आता
आतल्या जाणीवेचा...
मनात साठलंय
ते जनात आता वाटू,
कणाकणाने तुम्हांस
स्नेहभाव लागला दाटू...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment